युद्धाच्या पार्श्वभूमीवर केंद्राने साखर कारखान्यांचा इथेनॉल कोटा वाढवावा- हर्षवर्धन पाटील-साखर निर्यातीसाठीही मदतीची गरज
इंदापूर:- सध्या आखाती देशात चालु असलेल्या युद्धामुळे क्रूड ऑइलच्या दरात वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर पेट्रोलियम नैसर्गिक वायू मंत्रालयाने जाहीर केलेल्या दि. 1 एप्रिलपासूनच्या नवीन धोरणानुसार पेट्रोलमध्ये 20 टक्के इथेनॉल मिश्रणासाठी साखर कारखान्यांना इथेनॉलचा कोटा तातडीने वाढवून द्यावा, परिणामी, इथेनॉल मिश्रणामुळे पेट्रोल दरवाढीसंदर्भात जनतेला काही प्रमाणात दिलासा मिळु शकेल. तसेच साखरेच्या निर्याती संदर्भातही केंद्र सरकारकडून मदतीची गरज असल्याचे प्रतिपादन राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ नवी दिल्लीचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी बुधवारी केले. राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाने पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांचेकडे देशातील साखर कारखान्यासंदर्भात विविध मागण्या करून तातडीने निर्णय घ्यावेत, अशी विनंती केली आहे, असे हर्षवर्धन पाटील य...