शासकीय निवासी शाळेत जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा. इंदापूर येथील सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलांचे शासकीय निवासी शाळा तरंगवाडी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली . यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी पोवाडे गायन व भाषणे केली .या कार्यक्रमास प्रमुख वक्ते म्हणून सोमनाथ ढोले सर हे उपस्थित होते. यावेळी ढोले यांनी शिवाजी महाराजांच्या जीवनातील लढायां सांगून रोमांचित केले तसेच शिवाजी महाराज यांच्या जीवन कार्याविषयी विस्तृतपणे माहिती विद्यार्थ्यांना सांगण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक कुकडे आर आर यांनी भूषविले.शिवाजी महाराजांसाठी लोक जीव द्यायला का तयार होते ?याविषयीचे विवेचन त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात केले. या शिवजयंती उत्सव कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती लाभलेले गृहपाल हेळकर सर यांनी शिवचरित्रातून काय शिकावे ? याविषयी मार्गदर्शन केले . सावंत मॅडम यांनी शिवजयंती निमित्त इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेचे पॅड वाटप केले .या कार्यक्रमास झाटेराव मॅडम , मरळे सर , ...
SHIVSRUSTHI NEWS