इंदापूर:- नितीन क्षीरसागर यांच्या कडुन कालठण क्रमांक एक ता. इंदापूर येथे औट घटकेचा राजा ठरलेला नवसाचा श्रीयाळ सेठ उत्सव श्री जगन्नाथ क्षीरसागर व लक्ष्मीबाई क्षीरसागर यांच्या निवासस्थानी तर मानाचा श्रीयाळ सेठ उत्सव श्री.देवीदास पाटील यांच्या घरी धार्मिक परंपरा कायम ठेवत 60 वे वर्षी साजरा केला.माजी सरपंच अर्जुन कुंभार व महादेव कुंभार यांनी तयार केलेल्या श्रीयाळ सेठ उत्सव मिरवणूक मान प्रथेप्रमाणे श्री बाळासाहेब मांढरे यांना मिळाला. भाविकांनी दर्शन घेऊन नवस पूर्ण करत इडा पिडा टळू दे बळीच राज्य येऊ दे अशी प्रार्थना केली.कै लक्ष्मीबाई चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आयोजित केलेल्या हळदीकुंकू पानसुपारी श्रीयाळ सेठ उत्सव गीत फुगडी आदी सामाजिक उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. नागपंचमी निमित्त नाभिक समाजाच्या वतीने नागोबाची प्रतीमा केली.या सामाजिक उपक्रमांचे आयोजन श्री तुकाराम पांडुळे हनुमंत पांडुळे साहेबराव पांडुळे संतोष पांडुळे यांनी केले. श्रीयाळ सेठ उत्सवावेळी श्री.पोपट कोळेकर, संजय माने, हरीचंद्र गटकुळ, प्रा सतीश शिंदे, हनुमंत जाधव , हनुमंत पाटी...
SHIVSRUSTHI NEWS