मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

वाल्हे नजीक रेल्वे रुळावर आढळला मृतदेह

वाल्हे प्रतिनिधी :सिकंदर नदाफ वाल्हे ( ता.पुरंदर ) ते दौंडज दरम्यान रेल्वेच्या पोल क्र.६९ /२६ जवळील रेल्वे रुळावर मंगळवारी (दि.१ जुलै) सायंकाळी अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार पुण्याहून मिरजकडे निघालेल्या हमसफर एक्सप्रेसचे लोकोपायलट सुमन कुमार यांना मंगळवारी सायंकाळी ८ च्या सुमारास वाल्हे हद्दीतील रेल्वेच्या पोल क्र.६९/२६ जवळील रेल्वे रुळावर अज्ञात व्यक्तीचा रेल्वे अपघात झाल्याचे निदर्शनास आले होते. यावेळी घटनेची माहिती मिळाल्यावर वाल्हे पोलीस चौकीचे हवालदार प्रशांत पवार यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली .त्या ठिकाणी पोलिसांना एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत आढळून आला.या दरम्यान पंचनामा करताना मयत व्यक्तीचे वय अंदाजे ३५ त्याची उंची साधारण ५ फुट ३ इंच रंग सावळा अंगात निळा शर्ट व काळ्या रंगाची हाफ पँट असल्याचे वर्णनात नमूद करण्यात आले आहे. या घटनेची खबर ट्रॅकमन अमोल भुजबळ यांनी वाल्हे पोलीस चौकीला दिली आहे.तर या प्रकरणाचा अधिक तपास जेजुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्...

योगीराज श्री संतराज पालखी सोहळ्याच्या आगमनाने व श्री संत गुलाब बाबा पालखी प्रस्थानने रेडा नगरीला पंढरपुराचे स्वरूप

इंदापूर तालुक्यातील रेडा या गावातून श्री संत गुलाबबाबा पालखी सोहळ्याचे प्रस्थान ठीक चार वाजून बत्तीस मिनिटांनी (दि.३०) जून रोजी झाले. रेडा पंचक्रोशीतील आणि महाराष्ट्रातील तसेच देशातील विविध राज्यातून श्री संत गुलाब बाबा भक्तांचे पालखी प्रस्थान साठी आगमन झाले होते.  त्याच बरोबर गेले ५८ वर्ष योगीराज संतराज पालखी सोहळा रेडा गावी मुक्कामी येत असतो. एका पालखी सोहळ्याचे प्रस्थान आणि दुसऱ्या पालखी सोहळ्याचा आगमन यामुळे रेडा गावाला पंढरपूरचे स्वरूप आले होते.  दोन संतांच्या भेटीचा अनुभव हाजारो वारकऱ्यांनी ह्याची देही ह्याची डोळा घेतल्याचा चेहऱ्यावर प्रत्येकाच्या भाव दिसत होता. श्री संत गुलाबबाबा मंदिरातून श्री संत गुलाब बाबा पालखी सोहळ्याचे प्रस्थान झाले आणि योगीराज संतराज महाराज पालखी सोहळा रेडा गावी आगमन होताच रेडा ग्रामस्थांच्या वतीने तोफांची सलामी देऊन स्वागत करण्यात आले.  रेडा गावाच्या वतीने योगीराज संतराज पालखी सोहळ्याचे जंगी स्वागत करण्यात आले आणि श्री संत गुलाब बाबा पालखी सोहळा जंगी प्रस्थान करण्यात आले. दोन्ही पालखी सोहळ्याच्या भेटीचा क्षण हजारो वारकऱ्यांनी ...

टेंभुर्णी येथे आषाढी वारी निमित्त पंढरपुर कडे जाणाऱ्या भाविकांना मोफत चहा नाष्टा व पाणी वाटप

टेंभूर्णी:- वारी म्हणजे महाराष्ट्रातील विविध गावांपासून सुरू होऊन पंढरपूर येथे संपणारी सामुदायिक एक पदयात्रा होय. वारी ही महाराष्ट्रातील एक धार्मिक व सांस्कृतिक परंपरा आहे. ही वारी आषाढ आणि कार्तिक महिन्यातील शुद्ध एकादशी अशा दोन्ही वेळा होते.वारकरी संप्रदायात लहान मोठा हा भेद नाही. तसेच नामजपाने पुण्य मिळते हा भाव आहे. ’पंढरीचा वास, चंद्रभागेस्नान, आणिक दर्शन विठोबाचे’ या इच्छेपोटी वारकरी वारी चुकवत नाहीत, अशी भागवत संप्रदायाची धारणा आहे. त्यामुळेच आषाढी वारी ही प्रत्येक वारकरी महिलापुरुषांच्या मनात आदराचे आणि श्रद्धेचे स्थान बाळगून आहे असे मानले जाते. सोलापूर जिल्ह्य़ातील टेंभुर्णी येथे आषाढी वारी निमित्त पंढरपुर कडे जाणाऱ्या भाविकांना मोफत चहा नाष्टा व पाणी वाटप.करण्यात आला. महालक्ष्मी गारमेंट्स चे मालक महादेव शेठ जमदाडे यांच्या तर्फे सालाबादप्रमाणे हा उपक्रम राबवण्यात आला  त्यांचे सर्व सहकारी व मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते. वैभव भैय्या महाडिक, अक्षय भाऊ ढवळे पै. आप्पा महाडिक, विठ्ठल महाडिक (चेअरमन) गोकुळ तात्या कोकरे, किशोर कडाळे, हनुमंत जमदाडे, महावीर ...

नामा ऍग्री इनपुट मनुफॅक्चरर्स ऑफ इंडिया कृषी क्षेत्रात काम करणाऱ्या कंपन्यांन मार्फत संत तुकाराम महाराजांची सेवा

 इंदापूर:- नामा ऍग्री इनपुट मनुफॅक्चरर्स ऑफ इंडिया कृषी क्षेत्रात काम करणाऱ्या कंपन्यांनी संत तुकाराम महाराज यांची सेवा गेली चार वर्षापासून कार्यरत आहे,हे असोशियन कृषी क्षेत्रात काम करणाऱ्या विविध कंपन्या आणि विविध विक्रेत्या यांचे एक विशाल संघटन आहे हे संपूर्ण महाराष्ट्र व इतर राज्यात हे काम करते या सोबतच सामाजिक सलोखा संभाळत विविध सामाजिक कार्यात देखील सक्रिय असते जेव्हा संत तुकाराम महाराजांची पालखी बारामती मुक्कामी येथे तेव्हा वारी मधील सर्व माऊलींची सेवा करण्याचे वारकऱ्यांना जीवन आवश्यक वस्तूंचे वाटप व फराळाचे वाटप व स्वच्छता विविध उपक्रम व शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याचे काम ही संघटना करते मागील चार वर्षापासून सतत कार्यरत आहे यावेळी उपस्थित संस्थेचे महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष दिलीप घोडके, सचिव नितीन आटोळे,डायरेक्टर रामदास चव्हाण ,सागर पार्लेकर, दादासाहेब करे ,कुमार काकडे, नवनाथ हगारे ,शेलार साहेब, विजय कदम ,डी.व्ही शिंदे, किशोर गर्जे व इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते

वारकऱ्यांवर होमिओपॅथिक औषधोपचार काळाची गरज : मा.भरतशेठ शहा

इंदापूर, डॉ. संदेश शहा. अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संचलित पुणे जिल्हा व इंदापूर तालुका मराठी पत्रकार संघ, आरोग्य संदेश बहुद्देशीय समाजसेवी प्रतिष्ठान, समाजभूषण शरदकुमार माणिकचंद शहा ट्रस्ट तसेच सकल जैन समाजाच्या वतीने इंदापूर येथील सुश्रुत हॉस्पिटल मध्ये आयोजित मोफत होमिओपॅथिक शिबीराचा लाभ १२१ वारकरी रुग्णांनी घेतला. उपक्रमाचे हे बत्तीसावे वर्ष आहे.  मोफत होमिओपॅथिक औषधोपचार शिबीराचे उद्घाटन कर्मयोगी कारखान्याचे उपाध्यक्ष भरत शहा यांनी केले. यावेळी भरत शहा म्हणाले, सध्या आधुनिक चिकित्सा, भारतीय आयुर्वेद, होमिओपॅथी, सिद्ध, युनानी औषधोपचार पद्धतीस जनमान्यता आहे. मात्र पालखी वारकऱ्यांना फक्त आधुनिक चिकित्सा पद्धतीव्दारे उपचार करण्यात येतात. काहींना त्याचे दुष्परिणाम जाणवतात. त्यामुळे त्यांच्यावर सुरक्षित उपचार करण्यासाठी होमिओपॅथिक उपाययोजना पालखी सोहळ्यात करणे गरजेचे आहे.  यावेळी बाळासाहेब मोरे, पोपटराव पवार, शकील सय्यद, प्रमोद राऊत, आरशाद सय्यद, सुनील तळेकर, अशोक चव्हाण, श्री. माने हे प्रमुख मान्यवर उपस्थित होते. यावेळी डॉ. संदेश शहा, डॉ...

कामठवाडीच्या विहिरीत आढळला अनोळखी इसमाचा मृतदेह

वाल्हे प्रतिनिधी- सिकंदर नदाफ पुणे पंढरपूर पालखी महामार्गावरील कामठवाडी ( ता. पुरंदर) येथील करंज नाल्याजवळील एका विहिरीत अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आला .मात्र या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवार (दि.३० जून) रोजी सुरज दशरथ दुर्गाडे (रा. कामठवाडी) हे नेहमी प्रमाणे सकाळी आपल्या शेताकडे फेरफटका मारायला गेले असता त्यांना करंज नाला शेजारील अंकुश दुर्गाडे यांच्या शेतातील ( गट क्र.५८७४) पाणी पुरवठ्याच्या विहिरी जवळ कुबट व दुर्गंधीचा उग्र वास आला .अशावेळी त्यांनी विहिरीत डोकावले असता त्यांना एका अनोळखी इसमाचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत पाण्यावर तरंगताना निदर्शनास आला.या घटनेची तात्काळ खबर त्यांनी वाल्हे पोलीस चौकीला दिली. त्यानुसार पोलीसांनी घटनास्थळाची पाहणी करून मयताचा पंचनामा केला असता मयत इसमाची उंची साडे पाच फूट रंग निमगोरा शरीरावर क्रीम कलरचा शर्ट काळ्या रंगाची विजार काळपट बनियान गळ्यात व कमरेला काळा करगोटा उजव्या हाताला लाल रंगाचा धागा तसेच करंगळी शेजारील बोटात धातूची अंगठी आढळून आली आहे. या घटनेचा...

*इंदापूरच्या आश्रमशाळेत पालखी सोहळा उत्साहात*

*इंदापूर : पंढरीच्या वारीची परंपरा ही आपली वारकरी संस्कृती आहे. यातून सामाजिक ऐक्य, सर्व धर्म समभाव ही विचारधारा विद्यार्थ्यांमध्ये रुजावी या उद्देशाने मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्ट इंदापूर संचलित प्राथमिक,माध्यमिक, उच्च माध्यमिक आश्रमशाळा तसेच मुलांचे आणि मुलींचे अनुदानित वसतिगृह यांच्या संयुक्त विद्यमाने संस्थेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर शैक्षणिक संकुलाच्या प्रांगणात शालेय पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.  या वेळी शालेय वारकऱ्यांमध्ये प्रचंड उत्साह दिसत होता. यात विद्यार्थी विविध संतांच्या,वारकऱ्यांच्या वेशभूषेत सहभागी झाले.विठ्ठल-रुक्मिणी, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत मुक्ताबाई आदी संतांच्या वेशभूषा विद्यार्थ्यांनी साकारल्या होत्या. या वेशभूषा केलेल्या विद्यार्थ्यांनी लक्ष वेधले होते.विठ्ठल–विठ्ठल, ज्ञानोबा- माऊलीच्या गजरात विद्यार्थ्यांनी पालखीचा आनंद अनुभवला.  शिक्षक हिरालाल चंदनशिवे, नानासाहेब सानप यांनी वारी, दिंडीच्या परंपरेचा परिचय विद्यार्थ्यांना करून दिला. संस्थेच्या अध्यक्षा शकुंतला मखरे(काकी),सचिव ॲड. समीर मख...