मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंती उत्सवानिमित्त इंदापूर शहर नागरी संघर्ष समितीच्या वतीने ह.भ.प. श्यामसुंदर महाराज सोंन्नर यांचे हरिनाम कीर्तन

 इंदापूर;- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंती उत्सवानिमित्त इंदापूर शहर नागरी संघर्ष समितीच्या वतीने महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार ज्येष्ठ पत्रकार ह.भ.प. श्यामसुंदर महाराज सोंन्नर यांचे हरिनाम कीर्तन  तसेच दक्षिण आफ्रिकेतील कॉम्रेड मॅरेथॉन या ९० किमी अंतराच्या जागतिक दर्जाच्या स्पर्धेमध्ये विशेष प्राविण्य मिळवल्याबद्दल श्री संतोष वाघचौरे, श्री गोपीनाथ मोरे, श्री जाधव संदीप यांचा नागरी सत्कार समारंभ होणार आहे तरी आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे.आशी माहीती प्रा.कृष्णाजी ताटे यांनी दिली. या वेळी हमीदभाई आत्तार, महादेव चव्हाण सर सह इतर मान्यवर उपस्थित होते.हा कार्यक्रम शुक्रवार दिनांक 27 जून 2025 रोजी सायंकाळी सात वाजता श्रीराम मंदिर रामवेस येथे होणार असून कार्यक्रमानंतर महाप्रसादाचे आयोजन केले आहे.या कार्यक्रमाचे आयोजन  इंदापूर शहर नागरी संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आले आहे

*इंदापूरच्या आश्रमशाळेत लोकराजा राजर्षी शाहू महाराजांची जयंती साजरी*

इंदापूरच्या भिमाई आश्रमशाळेत राजर्षी शाहू महाराज यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त सामाजिक न्याय दिन साजरा  करण्यात आला. यावेळी मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्ट इंदापूर या शिक्षण संस्थेच्या अंकित असणाऱ्या प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक आश्रमशाळा तसेच मुलांचे आणि मुलींचे अनुदानित वसतिगृह यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर शैक्षणिक संकुलात राजर्षी शाहू महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी सामाजिक कार्यकर्ते माऊली नाचण यांच्या हस्ते राजर्षी शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार, तथागत गौतम बुद्धांच्या मूर्तीस व दिवंगत रत्नाकर (तात्या) मखरे यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांची भाषणं झाली. प्रा. जावेद शेख यांनी भाषणातून शाहू महाराजांच्या जीवन कार्यावर विचार व्यक्त करत त्यांच्या कार्याला उजाळा दिला. माऊली नाचण यांनी शाहू महाराजांवर स्वतः लिहिलेली कविता उपस्थितांसमोर सादर केली.यावेळी संस्थेचे सचिव ॲड.समीर मखरे, मुख्याध्यापक साहेबराव पवार, प्राचार्या अनिता साळवे, संच...

संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यानिमित्त इंदापूर नगरपरिषद प्रशासनामार्फत पालखीच्या स्वागताची जय्यत तयारी

  इंदापूर शहरात जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांच्‍या पालखीचे रविवार,२९ जून रोजी आगमन होणार आहे. जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यानिमित्त इंदापूर नगरपरिषद प्रशासनामार्फत पालखीच्या स्वागताची जय्यत तयारी केली असून उत्तम अशा प्रकारे  पूर्वनियोजन करण्यात आले आहे.                पालखी मार्गातील व शहरातील रस्त्यातील खड्डे बुजवणे,पालखी मार्ग तसेच शहरातील सर्व रस्ते यांची स्वच्छता करणे ,सर्व सार्वजनिक शौचालये यांची दुरुस्ती तसेच स्वच्छता करणे ,पालखी मार्गावरील सर्व अतिक्रमणे काढून घेणे ,पालखी मार्गावरील राडारोडा ,अस्ताव्यस्त पडलेले बांधकाम साहित्य काढून घेणे यासारखी कामे करण्यात येत आहेत.शहरात १३ सार्वजनिक शौचालये असून पालखी कालावधीसाठी निर्मलवारी अंतर्गत  अतिरीक्त‍ १२०० मोबाईल टॉयलेट उपलब्ध  करण्यात आले आहेत.शहरातील रिंगण सोहळा ते पालखी मुक्कामाचे ठिकाण, परतीचा मार्ग व शहरातील सर्व ठिकाणचे रस्ते,सर्व सार्वजनिक शौचालये,मोबाईल टॉयलेट दिवे दुरुस्त करून चालू  करण्यात आले आहेत.        ...

वाल्हेत शरदचंद्र पवार गटाकडून वारकऱ्यांसाठी महाप्रसादाचे आयोजन

वाल्हे प्रतिनिधी-सिकंदर नदाफ  महर्षी वाल्मीकी ऋषींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या वाल्हे नगरीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून पायी वारी करणाऱ्या लाखो वारकऱ्यांसाठी महाप्रसादाची अप्रतिम व्यवस्था करण्यात आल्याने वाल्हेकर ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे. यावेळी राष्ट्रवादी अध्यात्मिक व वारकरी आघाडी तर्फे वाल्हे नजीक सुकलवाडी फाट्यावर भव्य महाप्रसाद छत्राची उभारणी करण्यात आली होती. यामध्ये संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यात पायी वारी करणाऱ्या वारकऱ्यांना महाप्रसाद म्हणून चपाती भाजी फोडणीचा भात व बदामाचा शिरा पोटभर देण्यात आला. त्यामुळे वारकरी संप्रदायात देखील आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. या दरम्यान राष्ट्रवादी अध्यात्मिक व वारकरी आघाडीचे राज्य प्रमुख ह.भ. प. विठ्ठल( आबा) मोरे म्हणाले माऊलींचा पालखी सोहळा महाराष्ट्रातून येणाऱ्या वारकऱ्यांसाठी भक्तियोग असतो.त्यामुळे पंढरीच्या वाटेवर पाऊल टाकणाऱ्या वारकऱ्यांना सकस ताजे पौष्टीक भोजन देण्यासाठी शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वच पदाधिकारी मनोभावे प्रयत्न करत आहोत. या प्रसंगी अवधूत खाडे राम कोळपकर सुरेश पंडित ...

खेळाडूंच्या पाठीमागे राज्यशासन खंबीरपणे उभे- क्रीडा व युवक कल्याणमंत्री दत्तात्रय भरणे

क्रीडा मंत्र्यांच्या उपस्थितीत ऑलिम्पिक दिनानिमित्त पुण्यात कार्यक्रमाचे आयोजन पुणे, दि. २३: आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत राज्यातील विविध खेळाडूंनी पदके मिळविली असून त्यांचे स्मरण करुन, आदर्श डोळ्यासमोर ठेवून खेळाडूंनी कामगिरी करावी; खेळाडू, संघटनांना येणाऱ्या अडअडचणी सोडविण्यासोबतच त्यांना सुविधा उपलब्ध करून देण्यासोबतच खेळाडूंच्या पाठीमागे राज्यशासन खंबीरपणे उभे राहील, अशी ग्वाही राज्याचे क्रीडा व युवक कल्याणमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.  क्रीडा व युवक कल्याण संचालनालय आणि महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने ऑलिम्पिक दिनानिमित्त सर परशुराम महाविद्यालयाच्या लेडी रमाबाई सभागृहात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी क्रीडा व युवक सेवा आयुक्त शीतल तेली- उगले, सहसंचालक सुधीर मोरे, उपसंचालक उदय जाेशी, सुहास पाटील, विभागीय उपसंचालक युवराज नाईक, जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनील गायकवाड, महाराष्ट्र ऑलम्पिक संघटनेचे वरिष्ठ उपाध्यक्ष बाळासाहेब लांडगे, उपाध्यक्ष प्रदीप गंधे, महासचिव नामदेव शिरग...

राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाच्या पुढाकाराने “इंडिया-ब्राझिल शुगर ॲंड बायो एनर्जी मिशन” अभ्यास दौरा - हर्षवर्धन पाटील

इंदापूर:- राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाच्या पुढाकाराने आपण “इंडिया-ब्राझिल शुगर ॲंड बायो एनर्जी मिशन” हा अभ्यास दौरा आयोजित केलेला आहे. जगातील सर्वाधिक उत्कृष्ट व नियोजनबद्ध ऊस उत्पादन करणारा देश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ब्राझील येथे हा अभ्यास दौरा असून. या दौऱ्याचा उद्देश ऊस उत्पादक शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवून साखर व सहउत्पादनांच्या माध्यमातून उद्योगास उभारी देणे, तसेच नव्या तंत्रज्ञानाच्या मदतीने ऊस उत्पादकांना अधिक समृद्ध बनविणे हा आहे.आसे मत राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केले,     CANE COUNTRY या नावानेही ब्राझील ओळखला जातो. जागतिक ऊस लागवडी खालील क्षेत्रामध्ये ३३ टक्के, तर ऊस उत्पादनात ४० टक्के एवढा विक्रमी वाटा असणारा हा जगातील प्रथम क्रमांकाचा देश.       ब्राझीलमध्ये सुपीक जमिनी, अनुकूल हवामान व पर्जन्यमान, विस्तीर्ण क्षेत्रामुळे शेतीचे यांत्रिकीकरण, किमान सहा खोडवे, यांत्रिकी तोडीमुळे पाचटाचे आच्छादन, सुधारित ऊस जाती अशा सर्वच गुणवैशिष्ट्यांमुळे इतर देशांच्या तुलनेत येथील ऊ...

*जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते श्री संत तुकाराम महाराजांच्या पादुकांची शासकीय महापूजा*

पुणे, दि. १९: जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी गजानन पाटील यांच्या हस्ते इनामदार वाड्यात श्री संत तुकाराम महाराजांच्या पादुकांची शासकीय महापूजा संपन्न झाली. त्यांच्या हस्ते पादुकांचे पाद्य पूजन करून आरती झाली. यावेळी पोलीस सहआयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, उपविभागीय अधिकारी यशवंत माने, पोलीस उपायुक्त बापू बांगर, देहू नगर पंचायतीचे मुख्याधिकारी चेतन कोंडे, श्री संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष ह.भ.प. जालिंदर मोरे, पालखी सोहळा प्रमुख ह.भ.प. गणेश महाराज मोरे, ह.भ.प वैभव मोरे, ह.भ.प दिलीप मोरे, विश्वस्त ह.भ.प. विक्रमसिंह मोरे, ह.भ.प.उमेश मोरे, ह.भ.प. लक्ष्मण मोरे आदी उपस्थित होते. दर्शन व पूजेनंतर मान्यवरांचा मंदिर संस्थानच्यावतीने सत्कार करण्यात आला. महापुजेनंतर पालखीचे इनामदार वाड्यातून प्रस्थान झाले. देहू नगरीत सकाळपासूनच पावसाचा जोर होता. वारकऱ्यांचा उत्साह मात्र ओसंडून वाहत होता. टाळ-मृदुंगाच्या तालावर भक्तिरसात तल्लीन वारकरी.... 'ग्यानबा तुकाराम', 'माऊली, माऊली' चा गजर.... डोक्यावर...