१९फेब्रुवारी ला शिवजयंती उत्साहात साजरी होणार -रत्नाकर मखरे इंदापूर :- (प्रतिनिधी दि.११फेब्रु.२०२१) डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती ट्रस्टच्या वतीने भिमाई आश्रमशाळा इंदापूर येथील संस्थेच्या कार्यालयात जयंती समिती ट्रस्टचे अध्यक्ष रत्नाकर मखरे यांच्या अध्यक्षतेखाली बहुजन प्रतिपालक, कुळवाडी भूषण, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती संदर्भात आढावा बैठक (दि.११) गुरुवारी दु.३:०० वा. पार पडली. पत्रकार परिषदेत ट्रस्टचे अध्यक्ष रत्नाकर मखरे यांनी शिवजयंती निमित्त दि.१९ फेब्रु. व २० फेब्रु.२०२१ ला होणाऱ्या कार्यक्रमाची रूपरेषा स्पष्ट केली. यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर छत्रपती शिवाजी महाराज अश्वारुढ पुतळ्याची मिरवणूक काढली जाणार नाही, परंतु इतर सर्व कार्यक्रम मात्र नियोजित वेळेत नियोजनाप्रमाणे होतील असे यावेळी मखरे यांनी पत्रकार परिषदेत नमूद केले. यावेळी डॉ. संदेश शहा (जिल्हाध्यक्ष,अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संचलित इंदापूर तालुका मराठी पत्रकार संघाचे), पुणे जिल्हा संपर्क प्रमुख काकासाहेब मांढरे,इंदापूर तालुका सचिव ...
SHIVSRUSTHI NEWS