इंदापूर:प्रतिनिधी
दिनांक 9 फेब्रुवारी रोजी झालेल्या सरपंच पदाच्या निवडीमध्ये 39 जागेपैकी भाजपचे सर्वाधिक 27 सरपंच उपसरपंचाची निवड झाल्याने इंदापूर तालुक्यात भाजपने ग्रामपंचायतीवर निर्विवाद सत्ता स्थापन केली आहे. उर्वरित 21 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाची निवड उद्या दिनांक 10 फेब्रुवारी रोजी होणार आहे.
नीरा नरसिंहपूर, पिठेवाडी, गलांडवाडी नं.2, वरकुटे खुर्द, रेडा, सराफवाडी, पिटकेश्वर, निमसाखर, भिगवण, पोंधवडी, शेटफळगढे, अकोले, निंबोडी, पिंपळे, व्याहळी, गोतोंडी, निरवांगी, वालचंदनगर, कळंब,सपकळवाडी, लोणी देवकर,बळपुडी, चांडगाव, कुंभारगाव, हगारवाडी, गोंदी, भांडगाव या 27 ग्रामपंचायतीमध्ये भाजपचे सरपंच झाले आहेत.
या निवडणुकीत जनता कुणाच्या बाजूने कल देणार आहे या तर्कांना पूर्णविराम मिळाला असून इंदापूर तालुक्यातील जनता ठामपणे माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या पाठीमागे असल्याचे मतदारांनी दाखवून दिले आहे असे मत भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष ॲड. शरद जामदार यांनी व्यक्त केले.
विजयी सरपंच, उपसरपंच आणि सदस्यांचे हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते यथोचित सन्मान करण्यात आला.
कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्याच्या उपाध्यक्षा पद्माताई भोसले, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती आप्पासाहेब जगदाळे, निरा भिमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक उदयसिंह पाटील, राजवर्धन पाटील, निरा-भिमा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन लालासाहेब पवार, व्हाईस चेअरमन कांतीलाल झगडे, जिल्हा परिषद सदस्या अंकिता पाटील, भाजपचे तालुकाध्यक्ष शरद जामदार आदींनी विजयी सरपंच, उपसरपंचाचे अभिनंदन केले आहे.
टिप्पण्या