इंदापूरचे माजी नगराध्यक्ष स्मृतीशेष रत्नाकरजी मखरे यांचा उद्या पाचवा स्मृतीदिन; विविध कार्यक्रमांचे आयोजन
इंदापूर नगरीचे माजी नगराध्यक्ष आणि बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंदापूर नगरपरिषदेसमोरील पुतळ्यांचे प्रणेते, स्मृतीशेष पॅंथर रत्नाकरजी (तात्या) मखरे यांचा पाचवा स्मृतीदिन गुरुवार, दि. १४ मे २०२६ रोजी साजरा केला जाणार आहे.
रत्नाकरजी मखरे यांनी आपल्या कार्यकाळात इंदापूरच्या सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात मोलाचे योगदान दिले होते. ते मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्ट, इंदापूरचे अध्यक्ष तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीचेही (ट्रस्ट) अध्यक्ष होते. त्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ उद्या विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
काळ कसोटीचा आहे, पण आम्ही कसोटीलाही सांगतो.. वारसा संघर्षाचा आहे," या विचाराने प्रेरित होऊन मखरे परिवाराच्या वतीने या स्मृतीदिनाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन समस्त मखरे परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.
टिप्पण्या