सरडेवाडी येथे 'एक गाव, एक पोलीस' अंतर्गत पोलीस अंमलदारांची भेट; ग्रामस्थांना सुरक्षा व नवीन कायद्यांबाबत मार्गदर्शन
इंदापूर:राज्य शासनाच्या 'एक गाव, एक पोलीस' या संकल्पनेअंतर्गत इंदापूर पोलीस ठाण्याच्या पोलीस अंमलदार **कल्याणी विजय जाधव (ASI, ब. नं. 79)** यांनी दि. १ मे २०२६ रोजी सरडेवाडी गावाला भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी ग्रामस्थ, लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी यांच्याशी संवाद साधून गावच्या सुरक्षेबाबत विविध सूचना दिल्या.सकाळी ८:०० ते ८:३० या वेळेत झालेल्या या भेटीदरम्यान जाधव यांनी गावातील पोलीस पाटील, सरपंच, ग्रामसेवक, शिक्षक आणि ग्रामपंचायत सदस्यांशी सविस्तर चर्चा केली.
हिंगणगावचे पोलीस पाटील उपस्थित होते.यामध्ये प्रामुख्याने खालील मुद्द्यांवर भर देण्यात आला:
सीसीटीव्ही यंत्रणा:गावातील मुख्य चौक आणि गर्दीच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याबाबत सूचना दिल्या. सद्यस्थितीत ग्रामपंचायत कार्यालयासमोर कॅमेरे बसवण्यात आले असून, हायवे रोडवरील महत्त्वाच्या ठिकाणीही यंत्रणा कार्यान्वित करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या.
महिलांवरील अत्याचाराला प्रतिबंध करण्यासाठी प्रभावी उपाययोजना आणि जनजागृती करण्याबाबत चर्चा झाली.
केंद्र सरकारने लागू केलेल्या नवीन BNS (भारतीय न्याय संहिता)कायद्याच्या अनुषंगाने ग्रामस्थांना माहिती देऊन त्याबाबतच्या कायदेशीर तरतुदी समजावून सांगितल्या.
१ मे रोजी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून सरडेवाडी ग्रामपंचायत येथे सकाळी ८:०० वाजता उत्साहात झेंडावंदन पार पडले. गावात सध्या शांतता व सुव्यवस्था असून कोणतीही अनुचित घटना घडली नसल्याचे पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आले. आगामी धार्मिक सण आणि उत्सवांच्या पार्श्वभूमीवर गावात शांतता टिकवून ठेवण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले.
टिप्पण्या