मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

*जय भवानीगड विकास प्रतिष्ठान, संस्थेतील विद्यार्थिनींचे राष्ट्रीय पातळीवरील क्रिकेट स्पर्धेत घवघवीत यश*

 इंदापूर:- भारतीय युवा खेल परिषद अंतर्गत, घेण्यात आलेल्या राष्ट्रीय पातळीवरील लेदर क्रिकेट बॉल पेडम स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स मापसा गोवा या ठिकाणी दिनांक 20-01-2026 ते 23-01-2026 या दरम्यान संपन्न झाल्या यामध्ये विविध राज्यतील संघानी सहभाग नोंदवला असून महाराष्ट्रतील पुणे जिल्ह्याचे नेतृत्व करत *विद्यानिकेतन कॉलेज ऑफ फार्मसी* च्या संघाने प्रथम  क्रमांक तसेच *विद्यानिकेतन स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज& प्रेसिडेन्सी इंटरनॅशनल स्कूल वयोगट 14 वर्षाखालील मुलींनी सुद्धा प्रथम क्रमांक मिळवला* JBVP ,च्या इतिहासात पहिल्यांदाच दोन्ही मुलींचे संघ विजयी झाले 2025 वर्ष भारतीय महिला क्रिकेट ने तसेच 2026 वर्ष JBVP च्या मुलींनी खरोखरच गाजवुन दाखवले.     या नेत्रदीपक मिळवलेल्या यशाबद्दल व कामगिरी बद्दल संस्थेचे,*अध्यक्ष मा.श्रीमंत ढोले,उपाध्यक्ष चित्रलेखा ढोले,सचिव हर्षवर्धन खाडे ,मुख्य सल्लागार प्रदिप गुरव ,विद्या निकेतन स्कूल अ‍ॅण्ड जुनियर कॉलेजचे प्राचार्य गणेश पवार ,प्रेसिडेंसी इंटरनॅशनल स्कूल चे प्राचार्य राजेंद्र सरगर, विद्या निकेतन कॉलेज ऑफ फार्मसी चे सम्राट खेडकर...

२६जानेवार निमित्त वीर माता आणि वीर पत्नींचा नारी सन्मान सोहळा

इंदापूर:- सैनिक कृतज्ञता सोहळा26 जानेवारी 2026 प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून शहा हेल्थ क्लब, इंदापूर तालुका ज्युदो कराटे स्पोर्ट्स अकॅडमी आणि युवा क्रांती प्रतिष्ठान यांच्यावतीने इंदापूर तालुक्यातील भारत मातेचे सुपुत्र जयहिंद आजी माजी सैनिक संघटना बांधव यांच्या वीर माता आणि वीर पत्नींचा नारी सन्मान सोहळा आपण आयोजित केलेला आहे.या वेळी गुणवंत खेळाडूंचा सन्मान करण्यात येणार आहे.2025.26 मध्ये ज्युडो कराटे आणि कुराश मध्ये मेडल मिळवलेल्या इंदापूर तालुका ज्युडो कराटे असोसिएशन च्या खेळाडूंचा सन्मान कुराश वर्ल्ड चॅम्पियनशीपसाठी निवड झालेल्या कु. श्रावणी जयश्री प्रशांत शिताप हिचा वाढदिवसा निमित्त सत्कार आयोजित केला आहे.या कार्यक्रमाचे अध्यक्ष सौ. सारिका (मामी) दत्तात्रय भरणे (कृषिमंत्री) यांच्या सुविद्य पत्नीतर उद्घाटक म्हणून  सौ. अंकिताताई मुकुंदशेठ शहा माजी नगराध्यक्ष, इंदापूर नगरपरिषद,,श्री. भरत सुरेशदास शहा नगराध्यक्ष, इंदापूर नगरपरिषद,श्रीमती. रजिया हजरत शेख (नगरसेविका)सौ. सुनीता अमर नलवडे (नगरसेविका)सौ. दीप्तीताई राऊत (नगरसेविका)सौ. मयुरीताई उंबरे (नगरसेविका)सौ. सीमात...

जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेस बाजी मारणार - फडतरे

वाल्हे प्रतिनिधी- सिकंदर नदाफ आगामी जिल्हा परिषदेसह पंचायत समितीच्या निवडणुकीत जनशक्तीच्या जोरावर काँग्रेसच बाजी मारणार असल्याचा आशावाद काँग्रेस कमिटीचे नवनिर्वाचित तालुकाध्यक्ष साहेबराव फडतरे यांनी व्यक्त केला. वाल्हे ( ता. पुरंदर ) येथील महर्षी वाल्मीकी ऋषींच्या मंदिरात काँग्रेससह उध्दव बाळासाहेब ठाकरे तसेच आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांकडून साहेबराव फडतरे यांच्या निवडीबद्दल सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सत्काराला प्रतिउत्तर देताना फडतरे हे बोलत होते. ते पुढे म्हणाले आज मिळालेला सन्मान माझ्यासाठी खूप मोलाचा आहे. या सन्मानामुळे मला माझ्या कामाची जबाबदारी अधिक जाणवते. यापुढेही मी माझ्या कार्यातून समाजाची सेवा करण्याचा प्रयत्न करणार आहे. तसेच जिल्हा परिषदेसह पुरंदर पंचायत समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीतील इच्छुक उमेदवारांच्या प्रचारार्थ पूर्ण ताकतीने रिंगणात उतरणार आहे. याप्रसंगी काँग्रेस ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र बरकडे शिक्षक काँग्रेसचे विभागीय अध्यक्ष सचिन दुर्गाडे तसेच किरण कुमठेकर माजी सभापती गिरीश पवार सामाजिक कार्यकर्ते अतिश...

इंदापूरच्या भिमाई आश्रमशाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

इंदापूर येथील मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्ट इंदापूर संचलित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक आश्रमशाळा, मुलांचे आणि मुलींचे अनुदानित वसतिगृह यांच्या संयुक्त विद्यमाने संस्थेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर शैक्षणिक संकुलात वार्षिक स्नेहसंमेलन -२०२६ चे आयोजन करण्यात आले.आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी (दि.१६) शुक्रवारी सायंकाळी ८:०० वाजता कार्यक्रमास आरंभ झाला.या कार्यक्रमाचे उद्घाटन श्री.गोपीचंद गलांडे (माजी सरपंच, गलांडवाडी २) यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी तथागत गौतम बुद्ध, जिजाऊ माँसाहेब, अहिल्याबाई होळकर, सावित्रीबाई फुले, फातिमा शेख, माता भिमाई, माता रमाई, माजी नगराध्यक्ष दिवंगत रत्नाकर (तात्या)मखरे यांच्या प्रतिमांना मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.  वार्षिक स्नेहसंमेलनाची सुरुवात दीपप्रज्वलन व स्वागत गीताने करण्यात आली.मुख्याध्यापक साहेबराव पवार यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.  विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतं, नृत्यनाट्य, लोकनृत्य,लावण्या, कोळी गीतं,एकांकि...

*शाई पुसून गैरकृत्य करणाऱ्यास पुन्हा मतदान करता येणे शक्य नाही*

मुंबई, दि. 15 : बोटावर लावण्यात आलेली शाई पुसण्याचा प्रयत्न करून मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करणे हे गैरकृत्य आहे. त्याचबरोबर बोटावरची शाई पुसून एखादी व्यक्ती पुन्हा मतदान करण्यासाठी आल्याचे आढळल्यास त्यावर योग्य ती कायदेशीर कार्यवाही केली जाईल, असे स्पष्टीकरण राज्य निवडणूक आयोगाने केले आहे. बोटावरची शाई पुसून कोणी गैरकृत्य करण्याचा प्रयत्न केला तरी संबंधित मतदाराला पुन्हा मतदान करता येत नाही, याबाबतची दक्षता यापूर्वीच घेण्यात आली आहे. मतदाराने मतदान केल्यानंतर त्याबाबत नोंद घेण्यात आलेली असते. त्यामुळे केवळ शाई पुसून गैरकृत्य केलेल्या मतदाराला पुन्हा मतदान करता येत नाही. याबाबत सतर्कता बाळगण्याच्या सूचना पुन्हा एकदा सर्व संबंधिताना देण्यात आल्या आहेत.  मतदाराच्या बोटाला शाई लावण्याकरिता मार्कर पेनच्या वापराबाबत राज्य निवडणूक आयोगाने 19 नोव्हेंबर 2011 रोजी आणि 28 नोव्हेंबर 2011 रोजी आदेश निर्गमित केले आहेत. तेव्हापासून स्थानिक स्वराज्‍य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मतदाराच्या बोटाला शाई लावण्यासाठी मार्कर पेनचा वापर केला जात आहे. या आदेशानुसार मतदाराच्या...

इंदापूरच्या आश्रमशाळेत जिजाऊ जयंती उत्साहात साजरी.

इंदापूर*: (*दि.१२*) येथील मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्ट संचलित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक आश्रमशाळा, मुलांचे व मुलींचे अनुदानित वसतिगृह यांच्या संयुक्त विद्यमाने जिजाऊ माँसाहेबांच्या जयंतीचे आयोजन संस्थेच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर शैक्षणिक संकुलात करण्यात आले होते. यावेळी आश्रमशाळेतील मुलींनी जिजाऊंची वेशभूषा परिधान करून त्यांचा त्याग, कर्तृत्व आणि संस्कारांचे दर्शन घडवले. विद्यार्थ्यांनी तथागत गौतम बुद्ध, जिजाऊ माँसाहेब,संस्थेचे तत्कालीन अध्यक्ष दिवंगत रत्नाकर मखरेंच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.कार्यक्रमात जिजाऊंच्या जीवनकार्यावर आधारित विद्यार्थ्यांकडून भाषणे, अभिवाचन, पोवाडे व गीतं यांचे सादरीकरण करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांच्या या उपक्रमातून जिजाऊंच्या आदर्श विचारांची प्रेरणा मिळाल्याचे प्राचार्या अनिता साळवे यांनी नमूद केले. कार्यक्रमास संस्थेचे सचिव ॲड. समीर मखरे, संचालक गोरख तिकोटे, मुख्याध्यापक साहेबराव पवार, अधीक्षक, शिक्षक - शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यश कांबळे,संचित का...

लाखेवाडीच्या लोकनियुक्त सरपंच डॉ. सौ. चित्रलेखा श्रीमंत ढोले यांना पीएचडी पदवी प्रदान

 लाखेवाडी गावच्या लोकनियुक्त सरपंच व जय भवानीगड विकास प्रतिष्ठानच्या उपाध्यक्ष डॉ. सौ. चित्रलेखा श्रीमंत ढोले यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू मा. श्री विजय फुलारी यांच्या हस्ते विद्यावाचस्पती (पीएचडी) पदवी प्रदान करण्यात आली. जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षिका म्हणून कार्यरत असताना डॉ. सौ. ढोले यांनी अनेक विद्यार्थ्यांच्या जीवनाला नवी दिशा देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले. शिक्षणासोबतच राजकारण व समाजकारणाची यथायोग्य सांगड घालून त्यांनी समाजात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. मात्र ज्ञानग्रहणाची तळमळ त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. आपल्या ज्ञानाचा उपयोग समाजातील महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी व्हावा, या उद्देशाने त्यांनी पीएचडी अभ्यासास सुरुवात केली. चार वर्षांच्या अथक परिश्रमातून मा. डॉ. साहेबराव हिवाळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली “ग्रामीण महिलांच्या सामाजिक, आर्थिक व आरोग्यविषयक समस्यांचा समाजशास्त्रीय अभ्यास (विशेष संदर्भ : इंदापूर तालुका, जिल्हा पुणे)” या विषयावर संशोधन करून त्यांनी पीएचडी पदवी प्राप्त केली. त्यांच्या या शैक्षणिक यशामुळे तालुक्या...