इंदापूर येथील मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्ट इंदापूर संचलित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक आश्रमशाळा, मुलांचे आणि मुलींचे अनुदानित वसतिगृह यांच्या संयुक्त विद्यमाने संस्थेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर शैक्षणिक संकुलात वार्षिक स्नेहसंमेलन -२०२६ चे आयोजन करण्यात आले.आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी (दि.१६) शुक्रवारी सायंकाळी ८:०० वाजता कार्यक्रमास आरंभ झाला.या कार्यक्रमाचे उद्घाटन श्री.गोपीचंद गलांडे (माजी सरपंच, गलांडवाडी २) यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी तथागत गौतम बुद्ध, जिजाऊ माँसाहेब, अहिल्याबाई होळकर, सावित्रीबाई फुले, फातिमा शेख, माता भिमाई, माता रमाई, माजी नगराध्यक्ष दिवंगत रत्नाकर (तात्या)मखरे यांच्या प्रतिमांना मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. वार्षिक स्नेहसंमेलनाची सुरुवात दीपप्रज्वलन व स्वागत गीताने करण्यात आली.मुख्याध्यापक साहेबराव पवार यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतं, नृत्यनाट्य, लोकनृत्य,लावण्या, कोळी गीतं,एकांकि...
SHIVSRUSTHI NEWS