मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

जय भवानीगड विकास प्रतिष्ठान लाखेवाडीमध्ये भव्य ,दिव्य असा मल्हार महोत्सव आनंदमय वातावरणात संपन्न.

* सलग तीन दिवसीय मल्हार महोत्सवाचे भव्य असे आयोजन* जय भवानीगड विकास प्रतिष्ठान संचलित, विद्यानिकेतन स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज,प्रेसिडेन्सी इंटरनॅशनल स्कूल व विद्यानिकेतन कॉलेज ऑफ फार्मसी,विद्या निकेतन इन्स्टिटय़ूट ऑफ इंजिनिअरिंग अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी व JBVP  अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 28/डिसेंबर,2025,29/डिसेंबर 2025,30 डिसेंबर 2025 अशा सलग तीन दिवसीय मल्हार महोत्सव कार्यक्रमाचे आयोजन, नियोजन करण्यात आले.  विद्यार्थ्यांच्या अंगी असणाऱ्या सुप्त गुणांना वाव मिळावा,पुस्तकी ज्ञानाबरोबर सुसंस्कार ही मिळायला हवेत म्हणून प्रशालेमध्ये श्री महाकाल थीम मल्हार महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते नटराज मूर्तीचे पूजन व सरस्वती पूजन तिन्ही दिवस करण्यात आले. स्नेहसंमेलन म्हणजेच मुलांना घडवण्याची संधी आहे.स्नेहसंमेलन हा कार्यक्रम केवळ मनोरंजन म्हणून नाही तर एक संस्कार करण्याची संधी आहे म्हणूनच प्रशालेमध्ये अशा संस्कार महोत्सवाचेच आयोजन करण्यात आले. भारतात संस्कृती विकासाच्या सर्व अडथळ्यावर मात करत वेगवेगळ्या जाती-जमातींना एकत्र आणण्याचे काम नृत्य आण...

*इंदापूर बाजार समितीमध्ये हमीभाव दरात मका शेतमाल खरेदी केंद्र सुरु सभापती- श्री. तुषार जाधव*

          *बाजार समितीचे मुख्य बाजार इंदापूर येथे हमीभाव (आधारभुत दरात) शासकीय मका खरेदी केंद्राचे उद्घाटन PDCC बँकेचे संचालक तथा बाजार समितीचे संचालक मा.श्री. आप्पासाहेब जगदाळे यांच्या हस्ते राज्याचे कृषिमंत्री मा.श्री. दत्तात्रय(मामा) भरणेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली झाले.* शासकीय हमीभाव दरात मका शेतमाल विक्रीसाठी ऑनलाईन 419 शेतकऱ्यांनी 10086 क्विंटलची नोंद केलेली आहे. अशी माहिती बाजार समितीचे सभापती श्री. तुषार जाधव, उपसभापती श्री. मनोहर ढुके यांनी दिली.             हमीभाव दरात मका विक्रीसाठी नोंदणी दि. 31/12/2025 पर्यंत करणेत यावी. इंदापूर तालुक्यातील शेतकरी बांधवांनी मका शेतमाल हमीभाव योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन इंदापूर बाजार समितीचे सभापती श्री. तुषार जाधव, उपसभापती श्री. मनोहर ढुके, माजी सभापती मा. आप्पासाहेब जगदाळे यांनी केलेले आहे. यावेळी संचालक माजी आमदार श्री. यशवंत(तात्या) माने, श्री. विलासराव माने, श्री. दत्तात्रय फडतरे, श्री. मधुकर भरणे, श्री. रोहित मोहोळकर, श्री. संग्रामसिंह निंबाळकर, श्री. संद...

*विजयस्तंभ अभिवादन सोहळा शांततेत पार पाडण्याची सामूहिक जबाबदारी-प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे*

*सामाजिक न्याय विभागाच्या प्रधान सचिवांकडून विजयस्तंभाच्या प्रत्यक्ष जागेवर जाऊन तयारीची पाहणी* पुणे, दि. २६ (जिमाका वृत्तसेवा) : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या स्वातंत्र्य, समता व बंधुतेच्या मूल्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून विजयस्तंभ अभिवादन सोहळा शांततेत पार पाडणे, ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. यासाठी प्रशासन, सामाजिक संघटना व नागरिकांनी परस्पर समन्वय साधून सोहळा हा यशस्वी करावा. प्रशासनाच्यावतीने देण्यात येणाऱ्या सूचनांचे अनुयायांनी पालन करून सहकार्य करावे, असे आवाहान सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे यांनी केले.   हवेली तालुक्यातील पेरणे फाटा येथील विजयस्तंभ परिसरास भेट देऊन १ जानेवारी २०२६ रोजी साजरा होणाऱ्या विजयस्तंभ अभिवादन सोहळ्याच्या अनुषंगाने विविध विभागांकडून करण्यात येणाऱ्या पूर्वतयारीचा आढावा घेताना ते बोलत होते. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी)चे महासंचालक सुनील वारे, समाजकल्याण आयुक्त दिपा मुधोळ-मुंडे, पोलीस अधीक्षक संदीप गिल, पुणे शहरचे पोलीस उपायुक्त सोमय मुंडे, उत्पादक शुल्क अधीक्...

पनवेल पोलिसांची (फटाका) सायलेन्सर जप्ती.

 मुंबई प्रतिनिधी :(सतीश पाटील) पनवेलमध्ये बुलेटच्या सायलेन्सरमधून फटाक्यांसारखा आवाज काढून ध्वनिप्रदूषण करणाऱ्या बाईकस्वारांवर पनवेल शहर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे, ज्यात अनेक अवैध सायलेन्सर जप्त करून ते रोडरोलरखाली चिरडण्यात आले, यामुळे नियमभंग करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे आणि वाहतूक नियमांचे पालन करण्यासाठी जागरूकता निर्माण झाली आहे.  कारवाईचे मुख्य मुद्दे: ध्वनिप्रदूषणविरोधी मोहीम: पनवेल पोलिसांनी ध्वनीप्रदूषण रोखण्यासाठी ही विशेष मोहीम राबवली आहे. अवैध सायलेन्सर जप्त: बुलेट आणि इतर दुचाकींवर लावलेले फटाक्यांसारखा आवाज करणारे (मॉडिफाइड) सायलेन्सर जप्त करण्यात आले. सायलेन्सर नष्ट: जप्त केलेले सायलेन्सर रोडरोलरखाली दाबून नष्ट करण्यात आले, जेणेकरून त्यांचा पुन्हा वापर करता येणार नाही. दंड आणि कायदेशीर कारवाई: नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली गेली आणि सायलेन्सर बनवणाऱ्यांवरही कारवाईचा इशारा देण्यात आला. नागरिकांची मागणी: नागरिकांच्या तक्रारींनंतर ही कारवाई करण्यात आली, कारण अशा वाहनांमुळे खूप त्रास होत होता.  या कारवाईमुळे काय साध्य झाले? ...

*जय भवानीगड विकास प्रतिष्ठान, संस्थेतील विद्यार्थिनीचे राष्ट्रीय पातळीवरील कुराश स्पर्धेत घवघवीत यश*

भारतीय शालेय खेळ महासंघ {SGFI} तसेच उत्तर प्रदेश माध्यमिक शिक्षण विभाग, सहारनपूर(उत्तर प्रदेश),अंतर्गत घेण्यात आलेल्या राष्ट्रीय शालेय पातळीवरील कुराश स्पर्धा डॉ.भीमराव आंबेडकर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स सहारनपूर (उत्तर प्रदेश)                         या ठिकाणी सुरू असलेल्या राष्ट्रीय पातळीवरील कुराश स्पर्धेमध्ये भारतभरातून 20 राज्यातील खेळाडूंनी सहभाग नोंदवला असून महाराष्ट्र राज्यचे प्रतिनिधित्व करत असलेली,  1) *कु.पै.अण्वि बालाजी गायकवाड हिने -24kg वजन गटात महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करत ब्रांझ मेडल (कांस्य पदक) मिळवले. विशेष बाब म्हणजे अन्वी बालाजी गायकवाड हिने एकाच वर्षात दोन राष्ट्रीय स्पर्धा जिंकून स्पर्धेत ब्रांझ मेडल तसेच ऑल इंडिया प्लेयरचा सन्मान मिळवला आहे*                              या नेत्रदीपक कामगिरी बद्दल संस्थेचे,*अध्यक्ष मा.श्रीमंतजी ढोले (सर)उपाध्यक्ष सौ.डॉ.चित्रलेखा ढोले मॅडम,सचिव श्री.हर्षवर्धनजी खाडे (मा...

इंदापूर तालुक्याचे भाग्य विधाते. .. एक शेतकरी पुत्र ते कृषी मंत्री महाराष्ट्र राज्य..ना.दत्तामामा भरणे

वर्षपूर्ती च्या संध्येला एक मतदार म्हणून माझ्या आपल्या लोकप्रतिनिधींच्या कार्याचा आढावा  1) महाराष्ट्रातील तमाम शेतकरी बांधवा साठी आपण घेतलेला ऐतिहासिक कर्जमाफी चा निर्णय हा आपल्या कारकिर्दीतील एक मैलाचा दगड ठरेल मामा. 2.)2025 मध्ये कृषी मंत्री पदाचा पदभार सांभाळत असतानाच आती वृष्टी मुळे माझ्या शेतकरी कुटुंबाच कंबरडे मोडले असताना प्रसंगी गुडघाभर चिखलातून वाट काढत पायपीट करत मोटारसायकल वरून कोणता ही फौज फाटा बॉडी गार्ड न घेता हा शेतकरी पुत्र बळीराजाच्या शेताच्या बांधा वर जाऊन त्यांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळावी म्हणून जीवाच रान करीत होता. 3.) क्रीडा मंत्री पदाचा पद भार हस्तांतरित करीत असताना शेवटच्या क्षणाला इंदापूर तालुक्यातील युवा शक्ती साठी अद्यावत क्रीडा संकुलासाठी कोट्यवधी रुपयाचा निधी मंजूर करून घेतला.इंदापूर येथील तालुका क्रीडा संकुल येथे विविध कामे करण्यासाठी महाराष्ट्र राज्य क्रीडा विभागाच्या माध्यमातून तब्बल ५५ कोटींचा निधी मंजूर...          ग्रामीण भागातील खेळाडूंना खेळाच्या क्रीडा सुविधा उपलब्ध करून देणे व राष्ट्रीय व आंतरराष्...

नीरा भीमा कारखान्याकडून दुसऱ्या पंधरवड्याचे ऊस बिल रु. 3101 प्रमाणे बँकेत जमा-सौ.भाग्यश्री पाटील

 इंदापूर  शहाजीनगर (ता. इंदापूर) येथील नीरा भीमा सहकारी साखर कारखान्याकडून चालु सन 2025-26 च्या ऊस गळीत हंगामामध्ये गाळप झालेल्या दि. 16 ते 30 नोव्हेंबर या दुसऱ्या पंधरवड्याचा ऊस बिलाचा पहिला हप्ता हा विना कपात प्रती टन रु. 3101 प्रमाणे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये सोमवारी (दि.15) जमा करण्यात आला आहे, अशी माहीती कारखान्याच्या अध्यक्षा सौ.भाग्यश्री हर्षवर्धन पाटील यांनी दिली.      नीरा भीमा कारखान्याचे संस्थापक, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ नवी दिल्लीचे अध्यक्ष व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे नेतृत्वाखाली कारखान्याने उच्चांकी प्रति टन रु. 3101 प्रमाणे उचल देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार यापूर्वी दि. 1 ते 15 नोव्हेंबर या पंधरवड्यातील ऊस बिलाची रक्कम रु. 3101 प्रमाणे जमा करण्यात आली आहे. त्यानंतर आता दुसऱ्या पंधरवड्याची ऊस बिल रक्कम प्रति टन रु. 3101 प्रमाणे सोमवारी (दि. 15) बँकेत जमा करण्यात आल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. चालु ऊस गळीत हंगामामध्ये 7 लाख मे.टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट पूर्ण करणेच्या दृष्टीने कारखान्याची यशस्वीपणे ...