मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

*राज्यात यंदाचा गाळप हंगाम १ नोव्हेंबर पासून सुरू करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस*

मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी १० आणि पूरग्रस्तांच्या मदतीसाठी ५ रुपये कपातीचा निर्णय मुंबई, दि. ३०: राज्यातील बहुतांश भागात मुसळधार पावसाने नुकसान झाले आहे. तसेच अजूनही काही भागात पूरस्थिती आहे. त्यामुळे सन २०२५-२६ या वर्षीचा ऊस गाळप हंगाम राज्यात दि. १ नोव्हेंबर २०२५ पासून सुरू करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्री समितीच्या बैठकीत घेण्यात आला. यासह मुख्यमंत्री सहायता निधीसाठी प्रतिटन १० रुपये कपात आणि  पूरग्रस्तांच्या मदतीसाठी प्रतिटन ५ रुपये कपात करण्याचा निर्णयही घेण्यात आला. याबाबत आज मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित सन २०२४ -२५ ऊस गाळप हंगामाचा आढावा आणि सन २०२५-२६ मधील नवीन गाळप हंगामाचे धोरण ठरविण्यासाठी मंत्री समितीच्या बैठकीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, जलसंपदा मंत्री (विदर्भ,तापी आणि कोकण विकास महामंडळ) मंत्री गिरीश महाजन, जलसंपदा (गोदावरी आणि कृष्णा खोरे विकास महामंडळ) मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, ...

सरडेवाडी बामनस्थळ येथे चेअरमन विठ्ठल महाडिक व सौ. कोमलताई महाडिक यांच्या हस्ते देवीची आरती संपन्न

 इंदापूर तालुक्यातील सरडेवाडी बामनस्थळ येथे नवरात्र उत्सवानिमित्त दत्ता मामा भरणे विकास सेवा संस्थेचे चेअरमन श्री विठ्ठल महाडिक व त्यांच्या सौ. कोमलताई महाडिक यांच्या हस्ते देवीची आरती संपन्न त्यावेळी रघुनाथ (आण्णा) जमदाडे, मोहन (भाऊ) जामदार, नानासाहेब हरणावळ, बाळासाहेब जाधव, संतोष (दादा) सरडे, शिवाजी (तात्या) जमदाडे, ग्रामपंचायत सदस्य गोकुळ (तात्या) कोकरे, माजी उपसरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य हनुमंत (नाना) जमदाडे, नामदेव तोबरे, संजय जमदाडे, शहाजीराजे तोबरे, विजय तोबरे, बापूराव जमदाडे, अमोल जमदाडे, सुनिल तोबरे, किशोर कडाळे, ऋषिकेश शिंगाडे, अंबादास कुटे,शशीराज कदम, संदिप जमदाडे, हरिदास जमदाडे, परमेश्वर जमदाडे, नवनाथ जमदाडे, नितीन काळे, सोन्या भाऊ जमदाडे, संतोष कदम (चेअरमन, राहुल तरसे, कृष्णा हंबीरे, दादासाहेब काळे,आबासो काळे, नागेश काळे, गणेश जमदाडे, सागर जमदाडे, संतोष जामदार, दिपक हरणावळ, विठोबा सुर्यवंशी, विशाल जमदाडे, कुलदीप तोबरे,व आराधी मंडळ महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते,फराळाची सोय दिपकशेठ बोंगाणे यांच्या कडून करण्यात आली.

*तेजपृथ्वी ग्रुपच्या वतीने पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूचे किट तसेच उबदार कपड्याचे वाटप*

इंदापूर:- माढा तालुक्यातील उंदरगाव,लोंढेवस्ती, सावंत वस्ती येथे नेहमी सामाजिक कामात अग्रेसर असणाऱ्या तेजपृथ्वी ग्रुपच्या वतीने पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूचे किट (साखर, रवा , पोहे, चटणी, मीठ, चहा पावडर , तेल, बिस्किट पुडे, मटकी डाळ तसेच कपडे (चादर शाल) हे साहित्य वाटप करण्यात आले, यावेळी तेजपृथ्वी ग्रुपच्या संस्थापक अध्यक्षा सौ अनिताताई खरात म्हणाल्या की इथे आल्यानंतर खरंच जीवन जगणे काय असते हे कळत आहे या लोकांची माय माऊलींची अवस्था पाहून मनाला खूप वेदना होतात. माझी मायबाप सरकारला विनंती आहे जेवढं होईल तेवढं जास्तीत जास्त मदत आपण यांना करावी. सरकारने सध्या बाकी सगळं थांबवावं आणि कोणतेही निकष न लावता या माझ्या बांधवांना मदतीचा हात द्यावा येथे कोणीही कोणते राजकारण करू नये येथील अधिकारी वर्गानेही मनापासून काम करावे जर खरच तुम्हाला थोड्याफार पुण्याचं काम करायचं असेल तर तुम्ही या लोकांना मदत करून ते पूर्ण करावे तुम्हाला यांचे खूप आशीर्वाद लागतील तसेच महाराष्ट्रातील सामाजिक संस्थांनी मोठ्या उद्योगपतींनी किंवा मोठ्या कॉन्ट्रॅक्टरने या लोकांसाठी मदतीचा हात पुढे कर...

*इंदापूर शहरात झालेल्या पावसामुळे बाधित भागाची कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडून पाहणी*

पुणे, दि.२७ (जिमाका वृत्तसेवा): आज इंदापूर शहरात मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसामुळे इंद्रेश्वर मंदिर परिसरातील रस्त्यावर पाणी साचून नागरी वस्तीत पाणी शिरले होते, कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी या नागरी वस्तीला भेट देऊन नागरिकांशी संवाद साधला आणि प्रशासनाकडून संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेत आवश्यक त्या उपाययोजना तातडीने करण्याच्या सूचना दिल्या.  यावेळी इंदापूर नगरपरिषद मुख्याधिकारी रमेश ढगे, माजी उप नगराध्यक्ष भरतशेठ शहा, अशोक इजगुडे, माजी उपनगराध्यक्ष कृष्णा ताठे, माजी नगरसेवक, व्यापारी व नागरिक आणि नगरपरिषदेचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.  श्री. भरणे म्हणाले, इंदापूर शहर व परिसरात यापुढे अशा प्रकारची परिस्थिती उद्भवू नये, याकरिता पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी करावयाच्या उपाययोजनाबाबत नगरपरिषदेने तातडीने सविस्तर आराखडा तयार करावा. मान्सून काळात रोगराई पसरू नये, याकरिता प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात. संपूर्ण परिसरात साफसफाई राहील, याबाबत दक्षता घ्यावी. सद्यस्थितीत नागरिकांची काळजी घेण्यासाठी प्रशासनाने सतर्क राहण्याच्या त्यांनी सूचना दिल्या.  मुसळधार पावसाच...

लडाखमध्ये जमावाने भाजपा कार्यालय पेटवलं; राज्याचा दर्जा मिळावा यासाठी हिंसक आंदोलन, पोलिसांवर दगडफेक

दिनांक:२७सप्टेंबर २०२५ प्रतिनीधी मुंबई:  लडाखला स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळावा यासाठी बुधवारी (२४ सप्टेंबर) ठिकठिकाणी हिंसक आंदोलनं झाली. आंदोलकांनी भाजपाच्या कार्यालयावर हल्ला केला, तसेच कार्यालय पेटवलं. लडाखमध्ये पोलीस व आंदोलकांमध्ये झडप झाल्याचं पाहायला मिळालं. लडाखचा सहाव्या अनुसूचित समावेश करावा आणि केंद्रशासित प्रदेशाऐवजी राज्याचा दर्जा मिळावा अशी मागणी गेल्या काही महिन्यांपासून होत आहे. अलीकडेच ही मागणी घेऊन लडाखमधील नागरिकांनी ठिकठिकाणी आंदोलनं सुरू केली आहेत. या आंदोलनाने बुधवारी (२४ सप्टेंबर) हिंसक वळण घेतलं. संतप्त जमावाची पोलिसांबरोबर झडप झाली. तसेच जमावाने पोलिसांवर दगडफेकही केली. आंदोलकांनी लेह येथील भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयावर दगडफेक करत कार्यालय पेटवून दिल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. तसेच काही ठिकाणी पोलिसांना आंदोलकांवर लाठीहल्ला करावा लागला. सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या नेतृत्वाखाली लडाखमध्ये विद्यार्थी आंदोलन करत आहेत. विद्यार्थ्यांचं शांततेच्या मार्गाने चाललेलं आ...

नीरा भीमा कारखान्याचा ऊस बिलाचा रु. 100 चा हप्ता- भाग्यश्री पाटील

- 7 लाख मे.टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट   -वार्षिक सभा खेळीमेळीत संपन्न इंदापूर : प्रतिनिधी दि.26/9/25                          निरा भिमा सहकारी साखर कारखान्याकडून मागील सन 2024-25 च्या हंगामामध्ये गाळप झालेल्या ऊसाला दिवाळीपूर्वी प्रति टन रु. 100 प्रमाणे ऊस बिलाचा हप्ता येत्या दि. 10 ऑक्टोबर पूर्वी बँक खात्यामध्ये जमा केला जाणार आहे. कारखान्याने आगामी सन 2025-26 च्या गळीत हंगामामध्ये 7 लाख मे.टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे, अशी माहिती कारखान्याच्या अध्यक्षा सौ.भाग्यश्री हर्षवर्धन पाटील यांनी शुक्रवारी (दि.26) दिली.           शहाजीनगर (ता.इंदापूर ) येथील निरा भिमा सहकारी साखर कारखान्याची सन 2024-25 ची 27 वी वार्षिक सर्वसाधारण सभा कारखान्याच्या भाग्यरत्न सांस्कृतिक भवनमध्ये खेळीमेळीच्या वातावरणामध्ये संपन्न झाली. यावेळी सर्व विषयांना एकमताने मंजूरी देण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी कारखान्याच्या अध्यक्षा सौं.भाग्यश्री पाटील होत्या.         सौ...

*चेतना फार्मसी महाविद्यालयातर्फे उच्च शिक्षण व भविष्यातील करियर नियोजन विषयी तज्ज्ञांचे अनमोल मार्गदर्शन*

इंदापूर वार्ताहर: आज शुक्रवार दि. 26 सप्टेंबर 2025 रोजी चेतना फाउंडेशन संचालित चेतना कॉलेज ऑफ फार्मसी तर्फे आज सौ.कस्तुराबाई श्रीपती कदम विद्यालय व ज्युनिअर कॉलेज इंदापूर येथे करिअर मार्गदर्शनावर एक विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमात चेतना फार्मसी महाविद्यालय चे प्राचार्य डॉ. गणेश म्हस्के यांनी अकरावी व बारावी v विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांना स्पर्धेच्या काळात करिअर निवड ही विद्यार्थ्यांसाठी मोठे आव्हान असून, या पार्श्वभूमीवर करियर कसे निवडावे,  स्पर्धा परीक्षा तयारी कशी करणार, जीवनात कष्ट, आत्मविश्वास, चिकाटी कशी महत्त्वाची असते, उच्च शिक्षण घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे वेळेत पूर्ण करावीत असा विविध विचार व्यक्त केले. तसेच आपल्या अनुभवातून विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी, वैद्यकीय, फार्मसी, व्यवस्थापन, शासकीय सेवा तसेच विविध व्यावसायिक क्षेत्रांविषयी उपयुक्त माहिती दिली. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला असून, योग्य दिशेने पाऊल टाकण्यासाठी या व्याख्यानाचा नक्कीच फायदा होणार असल्याचे मत प्रा. विजय धेंडे सरांनी व्यक्त केले. ...