इंदापूर :-रस्ता सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या वाहतुकीच्या नियमांचे पालन व्हावे तसेच हेल्मेट व सीट बेल्ट याचा वापर वाहनधारकांनी करावा याविषयी विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती निर्माण करण्याकरिता विद्या प्रतिष्ठान पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये स्टुडन्ट मेंटेरिंग सिस्टीम अंतर्गत या कार्यक्रमाचे आयोजन दिनांक 7 जानेवारी 2025 रोजी करण्यात आले होते. उप प्रादेशिक परिवहन कार्यालय बारामती व विद्या प्रतिष्ठान पॉलिटेक्निक कॉलेज इंदापूर यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयातील सभागृहात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास मोटार वाहन निरीक्षक श्री. पद्माकर भालेकर, सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक श्री. तेजस मखरे व श्री. रोहित भोसले तसेच इंदापूर येथील पोलीस कॉन्स्टेबल श्री. सुहास करणे, श्री. अमोल खाडे ,श्री. अनिल नागरगोजे हे अधिकारी उपस्थित होते. या जनजागृती पर कार्यक्रमा मधून, सिग्नलचे पालन करा, गाडी चालवताना मोबाईल बोलू नका, कानाला हेडफोन लावू नका ,गाडी चालवताना वाहतुकीच्या नियमांचे पालन करा याविषयी विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली. या कार्यक्रमाचे आयोजन स्टुडन्ट मेंटेरिं...
SHIVSRUSTHI NEWS