इंदापूर:- पुणे जिल्हा माळी महासंघ अध्यक्ष विकास शिंदे यांच्या 39 व्या वाढदिवसानिमित्त इंदापूर उपजिल्हा रुग्णालय येथे सर्व रुग्णांना फळ वाटप करण्यात आले यावेळेस डॉक्टर चंदनशिवे आणि डॉक्टर थोरवे उपस्थित होते , भिमाई आश्रम शाळेत विद्यार्थी सर्व शिक्षक स्टाफ व समीर मखरे यांच्या समवेत साजरा करण्यात आला व शाल श्रीफळ देऊन विकास शिंदे यांचे स्वागत केल. आणि नंतर फळे वाटप करण्यात आली तसेच पुढील वाढदिवस अनाथ आश्रमांमध्ये मुलींनी गाणी म्हणून करडे सर व सर्व इतर सर्व विद्यार्थी मित्रपरिवारांच्या साक्षीने तिथे देखील वाढदिवस साजरा करण्यात आले व फळ वाटप करण्यात आले. पुढील वाढदिवस बालसंस्कार वर्ग येथे समीक्षा बहुउद्देशीय संस्थांचे अध्यक्ष . श्री रोहिणी राऊत यांच्या साक्षीने आणि मित्रपरिवार यांच्यावतीने. वाढदिवस साजरा करण्यात आला व तिथे शालेय साहित्य विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले. इंदापूर मध्ये दिवसभर त्यांचा असाच वाढदिवसाचा कार्यक्रम चालू मित्र परिवारांच्या वतीने राहिला. त्याबद्दल विकास त्यांनी सर्वांचे आभार मानले आणि बोलताना सांगितले की मन गहिवरून आले एवढे प्रेम आतापर्यंत कधीच मिळाले नव्हते. तसेच सर्व विद्यार्थी रुग्ण यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून. खूप एनर्जी आली व इथून पुढे चा वाढदिवस देखील असाच फालतू खर्च न करता अशा लोकांसाठी एक छोटीशी मदत म्हणून केला जाईल अशी त्यांनी आश्रम शाळेत देखील ग्वाही दिली व सर्वांचे आभार मानले. त्यादिवशी सर्व राजकीय पदाधिकारी सामाजिक संस्थेचे कार्यकर्ते अध्यक्ष विविध विभागातील सर्वांनी सोशल मीडियावर देखील खूप मोठी अशी जाहिरात केली व चौका चौकात बॅनर लावले होते त्या सर्व मित्रपरिवारच्या देखील आभार त्यांनी मानले. वाढदिवसाच्या एक निमित्त म्हणून त्यांनी हा कार्यक्रम घेतले परंतु वर्षभर त्यांचे हे समाजासाठी देणे चालूच असते प्रत्येक ठिकाणी अडचणीला ते धावून जातात रात्र अपरात्र ते कधीच आली तर ते ताबडतोब हजेरी लावतात. व त्याची कामे मार्गी लावतात. गेल्या वर्षी त्यांनी सत्यशोधक चित्रपट फ्री मध्ये व इतर सामाजिक उपक्रम राबवलेले होते.
त्यामुळे त्यांना कमी कालावधीत इतकी प्रसिद्धी मिळाली. त्यांची परिस्थिती मिडीयम वर्गात असून देखील एवढा समाजासाठी करतात त्यासाठी सर्वच स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे.: यावेळी त्यांच्यासोबत नागेश शिंदे युवराज शिंदे अनिकेत शिंदे, मोहण शिंदे, ललित शिंदे, सौरभ शिंदे, भाऊ पाटोळे सुरज शिंदे संदीप शिंदे रोहित माने अक्षय शिंदे गणेश राऊत किरण मंडले शंकर ढावरे निखिल भंडलकर अभी चव्हाण रफिक शेख सागर सोनवणे बाळासागर प्रेम अडसूळ मोहित शिंदे सुमित शिंदे हे सर्व उपस्थित होते
याप्रसंगी संस्थेच्या अध्यक्षा शकुंतला मखरे एडवोकेट समीर मखरे, नानासाहेब सानप सर व सर्व शिक्षक स्टाफ आणि महिला शिक्षक स्टाफ आणि विद्यार्थी.मोठ्या संख्येवर उपस्थित होते
टिप्पण्या