*इंदापूर महाविद्यालयात माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य आणि फळे वाटप*
इंदापूर कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या कनिष्ठ विभागाच्या वतीने राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष व संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे आणि फळांचे वाटप करण्यात आले. यावेळी कायदा , मुलींच्या सुरक्षितता व आचरण याविषयी इंदापूर पोलीस स्टेशनच्या हवालदार तसेच दामिनी पथकाच्या प्रमुख माधुरी लटकत यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक व राजकीय कार्याची माहिती यावेळी मान्यवरांनी आपल्या मनोगतात दिली. काव्यवाचन, रांगोळी, मैदानी खेळ तसेच स्पर्धा परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते यावेळी सन्मान करण्यात आला. यावेळी इंदापूर पोलीस स्टेशनच्या हवालदार, दामिनी पथकाच्या प्रमुख माधुरी लटकत यांनी विद्यार्थ्यांना मोबाईलचे दुष्परिणाम तसेच योग्य आचरण न केल्यास होणाऱ्या नुकसानीची माहिती दिली.आपल्याकडून होणारी थोडीशी चूक देखील खूप महागात पडू शकते...