*इंदापूर तालुक्याच्या आरोग्यदूतामुळे २३२ रुग्णांना मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून १ कोटी हून जास्त रुपयांचा मदतीचा हात!*
इंदापूर, डॉ. संदेश शहा.महाराष्ट्रातील गोरगरीब गरजू रुग्णांना वैद्यकीय उपचारांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाकडून मदत केली जाते. गेल्या २ वर्षात राज्यातील रुग्णांना ३०० कोटींची मदत वितरित करण्यात आली असून हा एक विश्वविक्रम राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व कक्ष प्रमुख मंगेश चिवटे यांच्या नावाने भविष्यात सुवर्णाक्षरांनी कोरला जाणार आहे. यापैकी चालू वर्षातील ऑगस्ट महिन्यात पुणे जिल्ह्यातील २३२ रुग्णांना शिवश्री भूषण सुर्वे यांच्या प्रयत्नाने १ कोटी ५ लाख ४५ हजार रुपयांची मदत तसेच २ वर्षांमध्ये १५० पेक्षा जास्त रुग्णांच्या बिला मधून ७० लाखापेक्षा जास्त सवलत मिळवून देण्यात यश आले आहे. यामुळे अनेक रुग्णांना जीवदान देण्यात यश आले आहे. पुणे जिल्ह्यातील अनेक रुग्णांचे मेंदूचे विकार, अपघातामुळे झालेल्या हाडांच्या शस्त्रक्रिया नवजात शिशु, भाजलेले रुग्ण, शेतामध्ये विजेचा करंट लागणे, हिप
यासंदर्भात शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे पुणे जिल्हा ग्रामीण कक्ष प्रमुख भूषण सुर्वे म्हणाले, आर्थिकदृष्ट्या सक्षम नसलेल्या अनेक रुग्णांना केवळ पैसे नसल्याने गंभीर आजारांवर उपचार घेताना अडचणी येतात. अशा रुग्णांसाठी आमचे मार्गदर्शक तथा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीचे कक्ष प्रमुख मंगेश चिवटे यांच्या पुढाकाराने आता रुग्णांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी मिळवणे अजून सोपे झाले आहे. गरजू रुग्णांनी ८६५०५६७५६७
( 8650 567 567 ) या टोल फ्री नंबर वरती संपर्क साधल्यास एका मिनिटाच्या आत मध्ये या योजनेचा फॉर्म त्यांना उपलब्ध होणार आहे. तसेच मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी ही प्रक्रिया संपूर्णपणे निशुल्क असून यामध्ये कोणी आर्थिक देवाण -घेवाण करू नये असे यावेळी भूषण सुर्वे यांनी आवर्जून सांगितले.
पुणे जिल्ह्यामध्ये रुग्णांना अधिकाधिक मदत मिळवून देण्या साठी पुणे जिल्हा कक्ष प्रमुख सुर्वे यांच्या बरोबर विशाल धुमाळ, सीमा कल्याणकर, सतीश गावडे, अर्जुन मंडलवार, मंगेश खताळ, शशिकला काळे, दुर्गा सोनवणे, नागेश जाधव, नीता कटके, सोमनाथ लांडगे, आनंद केकाण, सागर आवटे ही सर्व टीम संबंधित रुग्णांचा अर्ज भरून कागदपत्रांची संपूर्ण पूर्तता करण्यास सतत कार्यरत आहेत. विशेष म्हणजे ही सर्व टीम व प्रत्येक जण ही योजना निशुल्क आणि मोफत असल्याचे सांगून आपुलकीने पदरमोड करून अहोरात्र झटत आहेत. यापुढे पुणे जिल्ह्यातील रुग्णांना मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षा कडून मदत मिळवून देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मंगेश चिवटे यांच्या मार्गदर्शना खाली लोकांच्या सेवे साठी आम्ही कार्यरत राहू अशी ग्वाही शेवटी सुर्वे यांनी दिली.
टिप्पण्या