*युवाक्रांती प्रतिष्ठानचे संस्थापक प्रशांत शिताप यांचे हस्ते जिजाऊ इन्स्टिट्युट कालठण येथे ध्वजारोहण*
इंदापूर जिजाऊ इन्स्टिट्यूट ऑफ इंग्लिश मिडीयम आणि ज्युनिअर कॉलेजचे भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या ध्वजारोहनाचा मान सामान्य कार्यकर्त्याला मिळाला कॉलेजच्या प्रिन्सिपॉल राजश्री जगताप आणि शिक्षकांचे मी मना पासून आभार मानतो आमच्या गुरवर्या प्रा.जयश्री गटकुळ( माई) आणि गटकुळ सरांचा दिलेल्या सन्मान बद्दल मी ऋणी आहे.ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या गोर गरिबांच्या मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावं म्हणून या दांपत्याने उभारलेला हा ज्ञानयज्ञ कौतुकास पात्र ठरत आहे.
नृत्य लेझिम स्व संरक्षणार्थ कराटे लाठी काठी..हिंदी इंग्रजी मराठी भाषेतील प्रभुत्व वक्तृत्व शेतकऱ्यांच्या लहान लहान मुला मधील स्टेज डेअरिंग संभाषण कौशल्य खूपच प्रभावी पने विद्यार्थ्यांत रुजवले आहेत
निसर्ग सानिध्यात शांत वातावरणात भव्य अशी जीम , स्विमिंग पुल, सायन्स लॅब, सर्व सुविधासह जिजाऊ इन्स्टिट्युटची वास्तू आणि कोट्यवधी रुपयांची जमीन संस्थेला देऊन प्रा भास्कर गटकुळ यांनी शेतकऱ्याच्या मुलांचे भवितव्य घडविण्यासाठी जे कार्य केले आहे ते दीपस्तंभा सारखे आहे... प्रत्येक वेळी ध्वजवंदन सामजिक कार्यकर्ता, स्वातंत्र्यसैनिक, शेतकरी , महिला भगिनी आणि गुणवत्ताधारक विद्यार्थ्याच्या हातून करतात हा आदर्श आजच्या शिक्षणसम्राटांनी घेतला पाहिजे विद्यार्थ्याचे भवित्व्य आणि विद्यार्थी हिताची काळजी घेणारे प्रेमळ तितकेच शिस्त प्रिय शिक्षक आहेत
मुलांशी सवांद साधताना मी विद्यार्थ्यांनाआपल्या आई वडिलांच्या आपल्या गुरूंच्या नजरेतला चांगला मुलगा/मुलगी आदर्श विद्यार्थी बनायचं प्रामाणिक प्रयत्न करा... आणि भारतीय ही आपली सर्वात मोठी ओळख आहे ती जपू या...
ज्या दिवशी इथल्या मंदिर मस्जिद देवालय सर्व धर्मीय प्रार्थना स्थळा वर तिरंगा सर्वोच्य स्थानी फडकेल...
ज्या दिवशी जाती धर्म प्रांत याच्या वर आपल राष्ट्रीयत्व निर्विवाद असेल...
ज्या दिवशी आपण स्वताला फक्त आणि फक्त भारतीय मानू...
त्या दिवशी माझा तुमचा आपल्या सर्वांचा हा भारत देश जागतिक महासत्ता बनल्या शिवाय राहणार नाही..!🙏🏽
*चला भारतीय बनू !* अस आवाहन या उद्याच्या माझ्या देशाच्या तरुणाई ल आवाहन करीत मी माझा सवांद संपविला.
*एका गुरूने दिलेला सन्मान हा केवळ आणि केवळ युवा क्रांती प्रतिष्ठान चे सर्व सज्जन सहकाऱ्यांच्या सामाजिक कार्यास समर्पित*
*जय हिंद*🙏🏽🧡🤍💚🙏🏽
*Proud Indian*
प्रशांत उषा भानुदास शिताप
टिप्पण्या