पालखी मार्गावरील विहिरीची पाहणी करताना वैद्यकीय पथक इंदापूर, आषाढी वारीसाठी श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. या पार्श्वभूमीवर इंदापूरातील प्राथमिक आरोग्य केंद्र बिजवडीच्या वतीने वारकऱ्यांना पुरविण्यात येणाऱ्या सोयीसुविधांची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. आमदार दत्तात्रय भरणे मामा यांनी आढावा बैठकीत दिलेल्या सर्व सुचनांचे पालन करण्यात येत असल्याची माहिती केंद्राचे प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ. सुश्रुत श्रेणिक शहा यांनी दिली. पुणे जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी संतोष पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन देसाई, जिल्हा साथरोग नियंत्रण अधिकारी डॉ. अभय तिडके यांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार तसेच पंचायत समिती गटविकास अधिकारी सचिन खुडे, डॉ. सुरेखा पोळ, संतोष बाबर यांच्या नियंत्रणाखाली पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांसाठी पिण्याचे स्वच्छ पाणी, आरोग्य सेवा, योग्य औषधोपचार मिळावे यासाठी विशेष काळजी घेण्यात येत आहे. पालखी मार्गावर भाविकांना विविध सोयीसुविधा उपलब्ध व्हाव्यात याकरिता मार्गावरील विविध ग्रामपंचायत, हॉटेल्स, खाजगी ...
SHIVSRUSTHI NEWS