इंदापूर - मागील 20 वर्षापासून राजकारण, समाजकारणात सक्रिय आहे. चिंचवडचे आ. लक्ष्मण जगताप (चिंचवड) यांच्या निधानानंतर झालेल्या विधानसभेच्या पोटनिवडणुकीवेळीच निवडणूक लढविण्यासाठी मी तीव्र इच्छुक होतो. परंतु, पक्षश्रेष्टींच्या सूचनेनुसार माघार घेतली. आता निवडणूक लढविणारच, असा निर्धार भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य, माजी नगरसेवक चंद्रकांत नखाते यांनी केला.
ऑक्टोबरमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. त्यादृष्टीने इच्छुकांनी तयारी सुरु केली आहे. चिंचवडमधून निवडणूक लढविण्यासाठी नखाते यांनी मागील सहा महिन्यांपासून तयारी सुरु केली आहे. नखाते यांनी सांगितला.
नखाते म्हणाले, चिंचवड विधानसभा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला आहे. महापालिकेतील सत्तेच्या माध्यमातून चिंचवडचा कायापालट केला आहे. मतदार भाजपच्या पाठिशी ठामपणे उभा आहे. लोकसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांना चिंचवडमधून 74 हजार 765 चे मताधिक्य मिळाले आहे. मी तीनवेळा नगरसेवक म्हणून निवडून आलो आहे.
क्रीडा समितीचा पहिला सभापती होतो. पत्नीही एकवेळा नगरसेविका होती. गेल्या 20 वर्षांपासून आम्ही समाजकारणात आहोत. नगरसेवक असताना रहाटणी, काळेवाडी परिसराचा कायापालाट केला आहे. 2017 च्या चार सदस्यीय निवडणुकीत भाजपचा पॅनेल निवडून आणले. पुणे प्रदेश महानगर विकास प्राधिकरण (PMRDA) वर सदस्य म्हणूनही काम केले. तत्कालीन पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या अतिक्रमण कारवाईविरोधात तीव्र आंदोलन केले. या आंदोलनप्रकरणी माझ्यावर गुन्हे दाखल आहेत. न्यायालयापर्यंत लढाई लढलो. कारवाईला स्थगिती आणली. त्याचा रहाटणी, काळेवाडी, थेरगाव, वाकड, चिंचवड, वाल्हेकरवाडी परिसरातील बांधकामांना फायदा झाला. कारवाई थांबली.
विधानसभा निवडणूक लढविण्याची मागील सहा महिन्यांपासून तयारी सुरु केली आहे. मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. चिंचवडमधील मतदार भाजपच्या पाठिशी कायम आहेत. चिंचवड विधानसभेची पोटनिवडणूक लढविण्यासाठीच मी तीव्र इच्छुक होतो. परंतु, पक्षश्रेष्टींनी थांबण्याची सूचना केली. त्यांच्या आदेशाचे पालन करत माघार घेतली. परंतु, आता निवडणूक लढविणारच असून पक्षही माझ्या पाठिशी आहे. भाजपचे राज्यस्तरीय नेते उमेदवारी देतील, असा विश्वासही नखाते यांनी व्यक्त केला.
टिप्पण्या