इंदापूर:- विश्व प्रतिष्ठान संचलित जिजाऊ इन्स्टिट्यूट कालठण च्या अध्यक्षा प्रा.जयश्री गटकुळ यांनी वटपौर्णिमानिमित वृक्षारोपण करून "*माझ्या मैत्रिणींनो वडाच्या फांद्या तोडू नका, वडाच्या झाडाला दोरा गुंडाळून निसर्गाचा समतोल बिघडवू नका,चार झाडे लावून वटपौर्णिमा साजरी केल्याचा आनंद निश्चितच समाधानकारक आहे. वटपौर्णिमा निमित्त वृक्षारोपण करा*"असे आवाहन प्रा.जयश्री गटकुळ यांनी केले. या कार्यक्रमासाठी जिजाऊ इन्स्टिट्युटचे प्राचार्या राजश्री जगताप,रेखा जगताप, सारिका चोरमले, प्रतीक्षा कोळेकर, सोनाली महाडिक - जाधव अन्य मान्यवर उपस्थित होते
हिंदू पंचांगातील ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा हा दिवस "वटपौर्णिमा" म्हणून साजरा केला जातो. ह्या दिवशी स्त्रिया वटपौर्णिमा नावाचे व्रत करतात. या व्रतादरम्यान विवाहित स्त्रिया आपल्या पतीला उत्तम आरोग्य लाभावे, दीर्घायुष्य प्राप्त व्हावे म्हणून वडाच्या झाडाची पूजा करतातनिसर्गतःच दीर्घायुषी असणाऱ्या वृक्षांचे संवर्धन आणि जतन व्हावे अशा हेतूने वड, पिंपळ अशा वृक्षांची पूजा करण्याची कल्पना भारतीय संस्कृतीने स्वीकारली असावी. एखाद्या जातीचा वृक्ष एकदा पवित्र मानला की त्याची सहसा तोड होत नाही...आसे मत जयश्रीताई गटकुळ यांनी व्यक्त केले.
टिप्पण्या