वाल्हे प्रतिनिधी : सिकंदर नदाफ
वाल्हे ( ता.पुरंदर ) येथील माळवाडी जवळ गावठी दारूसाठी प्रसिद्ध असलेल्या महादेव नगरमधील दारूच्या अड्यावर पोलीसांनी अचानकपणे छापा टाकला.या कारवाईमध्ये एका दारू विक्रेत्या महिलेला पोलीसांनी रंगेहाथ पकडले असून तिच्या विरोधात दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.
यावेळी वाल्हे पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार वाल्हे हद्दीतील माळवाडी नजीकच्या रेल्वे रुळाजवळील पत्रा शेडच्या आडोशाला गावठी दारूची विक्री केली जात असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती .त्यानुसार या ठिकाणची पाहणी केली असता एका महिलेला प्लास्टिकच्या पिशवीतून गावठी (हातभट्टी) दारूची विक्री करताना रंगेहाथ पकडण्यात आले.
या बाबतची फिर्याद पोलीस नाईक प्रशांत रामदास पवार यांनी दिली आहे.त्यानुसार राणीबाई तानाजी राठोड ( वय ५० ) हिच्या विरोधात दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे .तर या प्रकरणाचा अधिक तपास जेजुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार रविराज कोकरे हे करीत आहेत.
टिप्पण्या