लोणी देवकर येथील २२ कोटी ७६ लाख रु.निधीच्या विविध विकास कामांचा १ फेब्रुवारी २०२४ रोजी ६.०० वा,भुमिपुजन व उद्घाटन आ.दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते होणार
इंदापूर:- तालुक्यातील लोणी देवकर या गावामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली २२ कोटी ६७ लाख रकमेची विविध विकासकामे मंजूर करण्यात आली असून या कामांचे भूमिपूजन आणि उद्घाटन हे माजी सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री आ. दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते व राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्या अध्यक्षतेखाली उद्या गुरुवारी दि.१ फेब्रुवारी रोजी करण्यात येणार आहे. याच दरम्यान सायंकाळी ६.०० वाजता जाहीर सभासुद्धा पार पडणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे इंदापूर तालुका अध्यक्ष हनुमंत कोकाटे यांनी दिली.आमदार भरणे यांच्या प्रयत्नातून मंजूर विकास निधीतून लोणी देवकर या भागातील रखडलेली कामे मार्गी लागली आहेत. चांगल्या दर्जाचे रस्त्यांचे जाळे निर्माण झाले आहे. त्यामुळे आसपासच्या गावांना सुद्धा याचा मोठ्या प्रमाणात फायदा झाला आहे.यावेळी तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मधुकर भरणे, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रताप पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य अभिजीत तांबिले, माजी जिल्हा परिषद सदस्य श्रीमंत ...