इंदापूर:-प्रतिनिधी दि.31/1/24 आमदार अनिल बाबर आमचे जिवलग मित्र होते. अत्यंत सकारात्मक विचाराने राजकारण, समाजकारण करणाऱ्या राज्यातील सुसंस्कृत नेत्यांपैकी एक होते. त्यांच्या जाण्याने तळागाळातील सर्वसामान्य माणसाचा नेता हरपला आहे, या शब्दात भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी आ.अनिल बाबर यांना श्रद्धांजली अर्पण केली. हर्षवर्धन पाटील म्हणाले, खानापूर-आटपाडी भागाचे विधिमंडळात लोकप्रतिनिधित्व करणारे आ.अनिल बाबर व आंम्ही अनेक वर्षे विधिमंडळात सहकारी म्हणून काम केले. खानापूर-आटपाडी भागातील शेतकऱ्यांना पाणी मिळावे म्हणून त्यांनी यशस्वी प्रयत्न केले. टेंभू योजनेचे ते जनक होते. अतिशय मनमिळाऊ व प्रेमळ असा त्यांचा स्वभाव होता. दोनच दिवसांपूर्वी सातारला मंत्री शंभूराजे देसाई यांच्या मुलाच्या लग्नात आमची भेट झाली, त्यावेळी आमच्या नेहमीप्रमाणे विविध विषयावर गप्पा झाल्या. मात्र आज अचानकपणे त्यांच्या निधनाचे वृत्त ऐकून आम्हांस धक्का बसला आहे. आ.अनिल बाबर यांच्या जाण्याने खानापूर-आटपाडी, सांगली जिल्ह्याचे नुकसान झाले असून महाराष्ट्राने एक सुसंस्कृत नेता गमावला आहे, या शब्दात हर्षवर्धन पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
इंदापूर जय भवानी गड विकास प्रतिष्ठान संचलित, विद्या निकेतन स्कूल अॅण्ड जुनियर कॉलेज व प्रेसिडेंसी इंटरनॅशनल स्कूल, विद्या निकेतन कॉलेज ऑफ फार्मसी व विद्यानिकेतन इन्स्टिटय़ूट ऑफ इंजिनिअरिंग अॅण्ड टेक्नॉलॉजी यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 05/12/2025 रोजी आठवडा बाजाराचे नियोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांंना बाजारातल्या व्यवहाराची माहिती देण्यासाठी आणि त्यांना प्रत्यक्ष अनुभव देण्यासाठी प्रशाले मध्ये आठवडा बाजार भरवला होता. बाजारातील खरेदी विक्रीची माहिती मिळावी, पैश्याचा वापर कसा करावा याची जाणीव असावी, या उद्देशाने या आठवडे बाजाराचे नियोजन करण्यात आले होते.विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढावा पैश्याचे महत्त्व समजावे . भाजीपाला विक्री सोबत फळभाज्या विविध फळे, विविध खाद्यपदार्थ यांच्या खवय्यांनी विद्यार्थ्यांनी मनसोक्त आनंद लुटला. फळे , भाजीपाला विक्री करताना विद्यार्थ्यांच्या चेहर्यावरचा आनंद ओसंडून वहात होता. बाजारातील उत्साह आणि लगबग पाहून संस्थेच्या उपाध्यक्षा चित्रलेखा ढोले यांनी विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले. सदर कार्यक्रमा...
टिप्पण्या