इंदापूर : इंदापूर तालुका भाजप युवा मोर्चा कोअर कमिटीचे प्रमुख, निरा भिमा व कर्मयोगी शंकरावजी पाटील कारखान्याचे संचालक राजवर्धनदादा पाटील हे वाढदिवसानिमित्त शुभेच्छा स्वीकारण्यासाठी तसेच ज्येष्ठांचे आशिर्वाद घेणेसाठी प्रति वर्षी प्रमाणे इंदापूर येथे दूधगंगा दूध संघाच्या कार्यालयामध्ये मंगळवारी (दि.३०) दुपारी २ ते ५ या वेळात उपलब्ध असणार आहेत, अशी माहिती इंदापूर तालुका भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष तुषार खराडे यांनी दिली.
इंदापूर तालुक्यामध्ये युवा नेते राजवर्धनदादा पाटील यांच्या गुरुवार दि.1 फेब्रुवारी रोजी असलेल्या वाढदिवसानिमित्त भाजप युवा मोर्चाच्या वतीने ठिकठिकाणी विविध समाजोपयोगी कार्यक्रम व उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहितीही यावेळी खराडे यांनी दिली.
टिप्पण्या