मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया A च्या इंदापूर तालुका संपर्क कार्यालयाचे उद्घाटन संस्थापक अध्यक्ष दिपक भाऊ निकाळजे यांच्या हस्ते संपन्न इंदापूर :-रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) पार्टीच्या इंदापूर तालुका संपर्क कार्यालयाचे उद्घाटन संस्थापक अध्यक्ष दिपक भाऊ निकाळजे यांच्या हस्ते नुकतेच सविधान दिना दिवशी संपन्न झाले, इंदापूर तालुकाध्यक्ष पदी शिवराज पवार तर इंदापूर शहराध्यक्ष अशोक देवकर यांची एकमताने निवड करण्यात आल दीपक भाऊ निकाळजे राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या सूचनेनुसार पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख गणेश दादा घुगे यांच्या सहीनिशी पदांचे वाटप करण्यात आले, यावेळी दिपक भाऊ निकाळजे म्हणाले की इंदापूर तालुक्यात पक्ष संघटन मजबूत करून सामान्य जनतेच्या हक्कासाठी या संघटनेशी एकनिष्ठ राहून पक्षसंघटना मजबूत करण्यासाठी भविष्यात मोठी फळी उभा करू,इंदापूर तालुक्यातील जनसामान्य लोकांतून शिवराज पवार व अशोक देवकर यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.दिपक निकाळजे म्हणाले की, आज संविधान दिन आहे आणि या दिवशी मला आपल्या सर्वांना एक सांगायचं की, बाबासाहेब आंबेडकर यांचे स्वप्न आहे की समाज ...

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

ऐतिहासिक इंदापूर तालुक्यात ऐतिहासिक किल्ला बनवणाऱ्या उद्धट येथील युवकांचे राजवर्धन पाटील यांनी केले कौतुक इंदापूर प्रतिनिधी-  दीपावलीच्या निमित्ताने उद्धट येथील युवकांनी ऐतिहासिक वारसा असणाऱ्या कलाकृतींचा अविष्कार किल्ल्याच्या रूपाने साकारलेल्या होता. निरा भिमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजवर्धन पाटील यांनी उद्धट येथे जावून युवकांनी साकारलेल्या ऐतिहासिक कल्पकतेचे भरभरून कौतुक करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचे महत्त्व लक्षात घेऊन वाटचाल करण्याचे युवकांना त्यांनी आवाहन केले.  उद्धट येथील श्रीनिवास संतोष काळे व त्यांचे सहकारी स्वामी जगदीश कुंभार,शुभम संजय पवार,मयूर शिवाजी कारभोळ,अमोल अनिल कणसे यांनी किल्ले पन्हाळा - पावनखिंड - विशालगड किल्ला साकारला. राजवर्धन पाटील यांनी या युवकाकडून किल्ल्याविषयी ची माहिती घेऊन त्यांचे कौतुक केले.

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

बावडा ग्रामस्थांसमवेत हर्षवर्धन पाटील यांचा दसरा ऊत्सहात  इंदापूर:            बावडा ग्रामस्थांसमवेत भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी दसऱ्याचा सण आनंदी व उत्साही वातावरणात शुक्रवारी (दि.15) सायंकाळी साजरा केला. यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी आपल्या रत्नाई निवासस्थानी परंपरेनुसार प्रतिवर्षीप्रमाणे  आयोजित कार्यक्रमात ग्रामस्थांना आपुलकीने आपट्याची पाने देत शुभेच्छा व्यक्त केल्या.                यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी ग्रामस्थांशी संवाद साधत विविध विषयावरती गप्पा गोष्टी केल्या. कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती आता सुधारत असल्याचे त्यांनी सांगितले. परतीच्या पावसाने शेतकरी व नागरिकांना दिलासा मिळाल्याचे हर्षवर्धन पाटील यांनी नमूद केले. यावेळी बावडा ग्रामस्थांबरोबरच परिसरातील पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. ___________________________

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

ज.मा. मोरे त्यांचा पार्थिवाचे दर्शन घेऊन हर्षवर्धन पाटील यांनी वाहीली भावपूर्ण श्रद्धांजली    इंदापूर:- पंचायत समितीचे माजी सभापती तालुक्याचे ज्येष्ठ मार्गदर्शक जगन्नाथ मारुतराव मोरे (आप्पा) यांचे आज सकाळी सहा वाजता निधन झाले. राज्याचे माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी त्यांचा पार्थिवाचे दर्शन घेऊन श्रद्धांजली वाहिली तसेच ते अंत्यसंस्कारासाठी उपस्थित होते.    कर्मयोगी शंकररावजी पाटील यांच्यासमवेत ज. मा.(आप्पा)मोरे यांनी कार्य केले असून तालुक्याच्या सामाजिक, राजकीय क्षेत्रात भरीव योगदान आहे. इंदापूर पंचायत समितीचे पहिले सभापती म्हणून त्यांची ओळख होती. तालुक्याच्या राजकीय, सामाजिक क्षेत्रात ज्येष्ठ मार्गदर्शक म्हणून त्यांचे कार्य होते.  मोरे कुटुंबीयांना या दुःखातून सावरण्याची परमेश्वराने शक्ती देवो अशी प्रतिक्रिया यावेळी त्यांनी व्यक्त केली.

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

वीज कोसळून नुकसान झालेल्या घराची हर्षवर्धन पाटील यांनी केली पाहणी जिवीतहानी नाही   इंदापूर प्रतिनिधी-    निमगाव केतकी येथील शेतकरी बबनराव पाटील यांच्या घरावरीत 1 ऑक्टोबर रोजी रात्री झालेल्या मुसळधार पावसात मोठा आवाज होऊन वीज कोसळल्याने घराचे मोठे नुकसान झाले होते आज राज्याचे माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी निमगाव केतकी येथील पाटील यांच्या घराची पाहणी करून त्यांना दिलासा दिला. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र विजेमुळे घराच्या स्लॅपचा काही भाग फुटून खाली आल्याने घराचे मोठे नुकसान झाले.    घरावर वीज कोसळल्याने बबनराव पाटील कुटुंबीय आणि परिसरातील नागरिक भयभीत झाले आहेत. राज्याचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी घराची पाहणी करून पाटील कुटुंबीयांना दिलासा दिला आहे.    यावेळी इंदापूर अर्बन बँकेचे चेअरमन देवराज जाधव आणि पाटील कुटुंबीय उपस्थित होते.

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

पीपल्स रिपब्लिकन पार्टी ( कवाडे गट) चे वतीने पुणे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील भीमानगर जि.सोलापूर येथे रास्ता रोको करणार-संजय सोनवणे  इंदापूर : विशेष प्रतिनिधी  दि. २१ सप्टेंबर पासून कार्यकारी अभियंता उजनी, यांच्या कार्यालयासमोर सुरु असलेल्या बेमुदत धरणे आंदोलनाची प्रशासनाकडून अद्याप दखल घेतली नाही. याच्या निषेधार्थ (दि. ३०) रोजी पुणे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील भीमानगर जि.सोलापूर येथे रास्ता रोको करण्यात येणार असल्याची माहिती पीपल्स रिपब्लिकन पक्ष ( कवाडे गटा) चे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संजय सोनवणे यांनी दिली आहे. मौजे रांझणी (ता. माढा जि. सोलापूर ) येथील बौद्ध समाजातील १५० भूमीहीन शेतकऱ्यांच्या मूळ जमिनी ह्या महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ, पुणे यांच्याकडे संपादित आहेत. हे शेतकरी उजनी धरणग्रस्त असून त्यांना त्या जमिनीच्या मोबदल्यात कुठलाही शासकीय मोबदला व घर,जमीन मिळाली नाही. त्या मूळ जमिनी सध्या पडीक आहेत. ती जमीन शासनाने त्याच्या उदरनिर्वाहासाठी ह्या शेतकऱ्यांना कसण्यास द्यावी. तसेच प्रशासनाकडून उजनी जलाशय पर्यटन विकास केंद्राच...

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

हर्षवर्धन पाटील यांचा कर्मयोगी कारखाना निवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल इंदापूर:            राज्याचे माजी मंत्री व भाजप नेते  हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूर तालुक्यातील महात्मा फुलेनगर (बिजवडी) येथील कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज गुरुवारी (दि.23) इंदापूर प्रशासकीय भवन येथे दाखल केला.             कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्याची निवडणूक प्रक्रिया सध्या चालू असून कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष, राज्याचे माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्ती उत्पादक कालठण गट आणि ब वर्ग संस्था सभासद प्रतिनिधी या दोन्ही मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. इंदापूरचे तहसीलदार व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी श्रीकांत पाटील, सहाय्यक निबंधक जिजाबा गावडे यांनी अर्ज स्वीकारला.            यावेळी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे, उदयसिंह पाटील, मयुरसिंह पाटील, लालासाहेब पवार,  राजवर्धन प...