बावडा ग्रामस्थांसमवेत हर्षवर्धन पाटील यांचा दसरा ऊत्सहात
इंदापूर:
बावडा ग्रामस्थांसमवेत भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी दसऱ्याचा सण आनंदी व उत्साही वातावरणात शुक्रवारी (दि.15) सायंकाळी साजरा केला. यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी आपल्या रत्नाई निवासस्थानी परंपरेनुसार प्रतिवर्षीप्रमाणे आयोजित कार्यक्रमात ग्रामस्थांना आपुलकीने आपट्याची पाने देत शुभेच्छा व्यक्त केल्या.
यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी ग्रामस्थांशी संवाद साधत विविध विषयावरती गप्पा गोष्टी केल्या. कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती आता सुधारत असल्याचे त्यांनी सांगितले. परतीच्या पावसाने शेतकरी व नागरिकांना दिलासा मिळाल्याचे हर्षवर्धन पाटील यांनी नमूद केले. यावेळी बावडा ग्रामस्थांबरोबरच परिसरातील पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
___________________________
टिप्पण्या