इंदापूर:- पंचायत समितीचे माजी सभापती तालुक्याचे ज्येष्ठ मार्गदर्शक जगन्नाथ मारुतराव मोरे (आप्पा) यांचे आज सकाळी सहा वाजता निधन झाले. राज्याचे माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी त्यांचा पार्थिवाचे दर्शन घेऊन श्रद्धांजली वाहिली तसेच ते अंत्यसंस्कारासाठी उपस्थित होते.
कर्मयोगी शंकररावजी पाटील यांच्यासमवेत ज. मा.(आप्पा)मोरे यांनी कार्य केले असून तालुक्याच्या सामाजिक, राजकीय क्षेत्रात भरीव योगदान आहे. इंदापूर पंचायत समितीचे पहिले सभापती म्हणून त्यांची ओळख होती. तालुक्याच्या राजकीय, सामाजिक क्षेत्रात ज्येष्ठ मार्गदर्शक म्हणून त्यांचे कार्य होते.
मोरे कुटुंबीयांना या दुःखातून सावरण्याची परमेश्वराने शक्ती देवो अशी प्रतिक्रिया यावेळी त्यांनी व्यक्त केली.
टिप्पण्या