इंदापूर :-रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) पार्टीच्या इंदापूर तालुका संपर्क कार्यालयाचे उद्घाटन संस्थापक अध्यक्ष दिपक भाऊ निकाळजे यांच्या हस्ते नुकतेच सविधान दिना दिवशी संपन्न झाले, इंदापूर तालुकाध्यक्ष पदी शिवराज पवार तर इंदापूर शहराध्यक्ष अशोक देवकर यांची एकमताने निवड करण्यात आल
दीपक भाऊ निकाळजे राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या सूचनेनुसार पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख गणेश दादा घुगे यांच्या सहीनिशी पदांचे वाटप करण्यात आले,
यावेळी दिपक भाऊ निकाळजे म्हणाले की इंदापूर तालुक्यात पक्ष संघटन मजबूत करून सामान्य जनतेच्या हक्कासाठी या संघटनेशी एकनिष्ठ राहून पक्षसंघटना मजबूत करण्यासाठी भविष्यात मोठी फळी उभा करू,इंदापूर तालुक्यातील जनसामान्य लोकांतून शिवराज पवार व अशोक देवकर यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.दिपक निकाळजे म्हणाले की, आज संविधान दिन आहे आणि या दिवशी मला आपल्या सर्वांना एक सांगायचं की, बाबासाहेब आंबेडकर यांचे स्वप्न आहे की समाज संघटित व्हा संघर्ष करा संघटित केला का आपण गेल्या दोन वर्षापूर्वी,सविधान जाळण्याचा प्रयत्न केला दिल्लीला काही समाज कंटकांनी, आपल्याला आस्तीत्व टिकवायचे असेल तर आपल्या सर्व लोकांना एकत्र येणे गरजेचे आहे,आपले लोक आमदार, खासदार राज्यसभेमध्ये विधानसभेमध्ये गेले पाहिजेत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाच्या माध्यमातून आपण सर्वांनी पुढे यायचे आहे आपला पक्ष कसा वाढेल हे बघायचे येणाऱ्या नगरपालिकेमध्ये आपले लोक जास्तीत जास्त कसे निवडून येतील त्याचा विचार सगळ्यांनी करायचं आपण खरोखरच खूप छान कार्यक्रम घेतला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार मानतो , आपण जो कार्यक्रम तालुका अध्यक्ष शिवराज पवार,शहराध्यक्ष अशोक देवकर यांनी उत्कृष्ट घेतला याकार्यक्रमाला गणेश घुगे सागर सरोदे उमेश म्हस्के संतोष वाळके कार्यक्रमाचे आयोजक शिवराज पवार , व अशोक देवकर यांनी लोकांचे प्रश्न सुटावा म्हणून सुरुवात करण्यासाठीच जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन निकाळजे यांच्या हस्ते करून घेतलं सर्वसामान्यांना न्याय देत, जातीच्या पलीकडे जाऊन आपल्या लोकांचे काम करायचे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा फक्त एका जातीच्या पक्ष नाही, तो सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन लोकांच्या प्रश्नासाठी आपल्याच नेतृत्वाखाली आपण कशा पद्धतीने निवडणूक लढवणार आहेत त्या आतापासूनच तयारीला लागला आणि त्या पद्धतीने नियोजन करा मी तुमच्या बरोबर आहे आसे दिपक भाऊ निकाळजे म्हणाले, त्यांचे इंदापूर तालुक्यात जंगी स्वागत करण्यात आले,
टिप्पण्या