मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

लक्ष्मी वैभव न्यूज, शिवसृष्टी न्यूज

जागतिक कोरोना महामारी मृत्यूदराच्या तुलनेत भारतातील कोरोनाआयुर्वेदामुळे मृत्युदर कमी इंदापूर,   जागतिक कोरोना महामारी मृत्यूदराच्या  तुलनेत भारतातील कोरोना मृत्युदरफारचकमी असून त्याचे श्रेय केंद्रीयआयुषमंत्रालयनिर्देशित पंचतुलसी, हळदी काढयास जाते. त्यामुळे आयुर्वेद ही सुखी जीवन जगण्याची आदर्श गुरुकिल्ली आहे असे प्रतिपादन इंटर नॅशनल मार्केटिंग कार्पोरेशन कंपनीचे क्राऊन प्रेसिडेंट डॉ. प्रताप पवार यांनी केले.  अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या  पुणे जिल्हा व इंदापूर तालुका मराठीपत्रकार संघ, आरोग्य संदेश बहुद्देशीय समाजसेवी प्रतिष्ठानच्या वतीने राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत इंदापूर विद्या प्रतिष्ठान सभागृहात आयोजित मोफत आरोग्य कार्यशाळेततेबोलत होते. कार्यशाळेस पुणे, सांगली, सोलापूर, नगर जिल्ह्यातून १३५ प्रतिनिधी उपस्थितहोते . विद्या प्रतिष्ठान पॉलीटेकनीक कॉलेजचे प्राचार्य राजकुमार वीर,  आरोग्यसंदेशप्रतिष्ठान कार्याध्यक्ष तुषार रंजनकर, पत्रकार संघाचे शहराध्यक्ष सुरेश जकाते यावेळी उपस्थित होते. यावेळी अजिनाथ कळसाईत, सुजाता चां...

लक्ष्मी वैभव न्यूज, शिवसृष्टी न्यूज

कृषी विधेयके शेतकरी हिताची- हर्षवर्धन पाटील इंदापूर // केंद्र सरकारची तीन कृषी विधेयके शेतकऱ्यांच्या हिताची आहेत. या विधेयकांतील तरतुदी शेतकऱ्यांसाठी फायदेशीर असून या संदर्भातील शेतकऱ्यांचे काही गैरसमज चर्चेतून निश्चितपणे दूर होतील, असा विश्वास राज्याचे माजी सहकार व पणन मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी पुणे येथे भाजपच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना सोमवारी (दि.14) व्यक्त केला.      ते पुढे म्हणाले, कृषी कायद्यासंदर्भात राजकीय हेतूने जाणून-बुजून शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण केला जात आहेत.सदरचे कृषी विधेयक तयार करण्याची प्रक्रिया सन 2003 पासून सुरू झाली.  कोणतेही सरकार असो मग ते राज्य किंवा केंद्र सरकार असो कायदे तयार करताना ते शेतकरी हिताचे केले जातात, असे हर्षवर्धन पाटील यांनी नमूद केले. कृषी कायद्यातील सुधारणांमुळे ( एम.एस.पी.) किमान आधारभूत किंमत बंद होणार नाही. पूर्वीची शेती, आजची शेती आणि उद्याच्या 25 वर्षातमधील आधुनिक शेती याची कास सरकारला धरावी लागणार आहे.त्यादृष्टीने  पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्रीय कृषिमंत्री...

लक्ष्मी वैभव न्यूज, शिवसृष्टी न्यूज

इंदापूर तालुक्यातील तरंगवाडी ग्रामपंचायतीचा अजब कारभार,दलिताच्या घरावर जेसिबी फिरवूनही नुकसानभरपाई देण्यास टाळाटाळ केल्याचा प्रकार उघडकीस     इंदापूर   दलितांना विकासाचे गाजर दाखवून, बंदिस्त गटारीचे काम करताना दलिताच्या घरावर जेसिबी फिरवून केलेल्या नुकसानीची भरपाई देण्यास टाळाटाळ केल्याचा धक्कादायक प्रकार तरंगवाडी (ता. इंदापूर ) येथील ग्रामपंचायतीमध्ये उघडकीस आला आहे. याबाबत सविस्तर हकिकत अशी की, दलित वस्ती सुधारणा योजनेअंतर्गत तरंगवाडी ग्रामपंचायतीने दलित नागरिकांना विकासाचे गाजर दाखवून दलितांच्या सोईकरिता बंदिस्त गटारीचे काम मे.मिसाळ ठेकेदाराकरवी करण्यात आले.हे काम करत असताना संबंधित ग्रामपंचायतीने सिमेंटचे पाईप गाडत असताना आम्हाला रस्ता खोदायची परवानगी नाही असे तोंडी कारण देत दलिताच्या घरावर जेसिबी फिरवून संबंधित सिमेंट पाईप गाडण्यात आला. यादरम्यान संबंधित ग्रामसेवक, सरपंच तसेच ठेकेदार यांनी नुकसानग्रस्त कुटुंबाला तुमचे झालेले नुकसान आम्ही भरुन देवू असे तोंडी आश्वासन संबंधित कुटुंबाला दिले. आशी माहीती दिपकराव खिलारे यांनी दिली,  मात्र या तोंडी आश्वासना...

लक्ष्मी वैभव न्यूज, शिवसृष्टी न्यूज

मा. शदचंद्रजी पवार यांच्या ८०व्या वाढदिवसा निमित्ताने रक्तदान शिबिराचे आयोजन इंदापुरात उस्फूर्त प्रतिसाद इंदापूर: भारत देशाचे माजी केंद्रीय कृषी मंत्री शदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते,  या वेळी ना.मा. श्री.दत्तात्रय ( मामा) भरणे म्हणाले की              संपूर्ण राज्यभरात रक्ताचा मोठा तुटवडा निर्माण झाल्याने जास्तीत जास्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्याचे आवाहन  श्री.भरणे यांनी करून इंदापूर तालूका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी श्री.शरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवसानिमित्त चांगले सामाजिक उपक्रम राबविल्याबद्दल जाहिर कौतुक करून आज मी मंत्री म्हणून काम करत असताना कुठेही असलो तरी माझ्या इंदापूर तालुक्यातील सर्वसामान्य जनता व सर्व कार्यकर्ते तसेच पदाधिकारी यांच्यावरती माझे विशेष लक्ष असल्याचे सांगून उदाहरण म्हणून भरणे म्हणाले की   महिलांनी तोंड  बांधले तरी मी विद्या कोण आहे हे ओळखतो  आसे सांगून ग्रामपंचायत निवडणुकी...

लक्ष्मी वैभव न्यूज, शिवसृष्टी न्यूज

आज पासून सुरु झालेल्या पेट्रोल पंपामुळे शेतकऱ्यांची सोय -हर्षवर्धन पाटील        शहाजीनगर (ता.इंदापूर) येथे निरा भिमा सहकारी साखर कारखान्याच्या पेट्रोल पंपाचा शुभारंभ माजी सहकार मंत्री व कारखान्याचे संस्थापक हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते आज  शनिवारी (दि.12) करण्यात आला.  कारखान्यावरती पूर्वीपासून डिझेलचा पंप कार्यान्वित आहे. आज पासून सुरु झालेल्या पेट्रोल पंपामुळे शेतकऱ्यांची सोय आज पासून सुरु झालेल्या पेट्रोल पंपामुळे शेतकऱ्यांची सोय झाली आहे,असे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.              नीरा भीमा कारखान्याने आजअखेर 234703 मे. टन ऊसाचे गाळप केले आहे . आसवणी प्रकल्पातून आजपर्यंत इथेनॉलचे 1287543 लि. व अल्कोहोलचे 2243715 लि.चे उत्पादन घेतले आहे.तर सह-वीजनिर्मिती प्रकल्पामधून 10600801 युनिट वीज विक्री करण्यात आलेली आहे, असे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले. यावेळी अध्यक्ष लालासाहेब पवार, उपाध्यक्ष कांतिलाल झगडे, विलासराव वाघमोडे, उदयसिंह पाटील, राजवर्धन पाटील, कृष्णाजी यादव, दत...