इंदापूर,
जागतिक कोरोना महामारी मृत्यूदराच्या तुलनेत भारतातील कोरोना मृत्युदरफारचकमी असून त्याचे श्रेय केंद्रीयआयुषमंत्रालयनिर्देशित पंचतुलसी, हळदी काढयास जाते. त्यामुळे आयुर्वेद ही सुखी जीवन जगण्याची आदर्श गुरुकिल्ली आहे असे प्रतिपादन इंटर नॅशनल मार्केटिंग कार्पोरेशन कंपनीचे क्राऊन प्रेसिडेंट डॉ. प्रताप पवार यांनी केले.
अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या पुणे जिल्हा व इंदापूर तालुका मराठीपत्रकार संघ, आरोग्य संदेश बहुद्देशीय समाजसेवी प्रतिष्ठानच्या वतीने राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत इंदापूर विद्या प्रतिष्ठान सभागृहात आयोजित मोफत आरोग्य कार्यशाळेततेबोलत होते. कार्यशाळेस पुणे, सांगली, सोलापूर, नगर जिल्ह्यातून १३५ प्रतिनिधी उपस्थितहोते . विद्या प्रतिष्ठान पॉलीटेकनीक कॉलेजचे प्राचार्य राजकुमार वीर,
आरोग्यसंदेशप्रतिष्ठान कार्याध्यक्ष तुषार रंजनकर, पत्रकार संघाचे शहराध्यक्ष सुरेश जकाते यावेळी उपस्थित होते. यावेळी अजिनाथ कळसाईत, सुजाता चांदणे, ज्ञानेश्वर देशमुख, प्रणव चांदणे,डॉ. जयप्रकाश खरड, राजू फलफले, जनार्धन क्षीरसागर, राजेंद्र शेलार, अजित शिंगाडे,
संतोष कोरके, स्वप्नाली बोबडे, अमोलराजे गायकवाड, अश्विनी नलवडे, सचिन घोरपडे , स्नेहल गानबोटे, अपर्णा उपरे, प्रशांत जवंजाळ आदींचा सेंद्रिय प्रचाराबद्दल सत्कार करण्यात आला.
डॉ.पवार पुढे म्हणाले, कोरोना महामारीमुळे औषधी वनस्पती व भारतीय आयुर्वेदाचेमहत्व सर्वाना समजले असून तुळस, हळद,च्यवन प्राश, संजीवनी वनस्पती लेह बेरीचे महत्व घरोघरी पोहोचले आहे. त्यामुळे आयर्वेदास जनाश्रय प्राप्त झाला असून याशास्त्राचेमहत्व सर्वाना पटले आहे. त्यामुळे या शास्त्रास जागतिक राजाश्रय मिळवूनदेण्यासाठीनियोजन बद्ध प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्यासाठी जास्तीतजास्त लोकांनी स्वदेशी, केमिकल विरहित सेंद्रिय औषधे, पशुधन दूध वाढीची औषधे, सौंदर्य प्रसाधने, घरगुती वापराच्या वस्तू खरेदी करण्यास प्राधान्य दिले पाहिजे.
यावेळी इंदापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नारायण सारंगकर म्हणाले, कोरोना कालावधीत पोलीस कर्मचारी व त्यांचे कुटुंब ,कैदी तसेच हितचिंतकाना केंद्रीय आयुष मंत्रालयाने सुचवलेला तुलसी व हळदी काढा वापरला असता त्यांना चांगला फरक पडला. काही कोरोना पोजीटिव्ह रुग्ण निगेटिव्ह झाले यावेळी प्राचार्य राजकुमार वीर,चेअरमन स्टार डॉ.उदय फडतरे, डॉ.संदेश शहा, अर्चना झरकर, नामदेव गानबोटे, डॉ. जय शहा, प्रियंका शहा यांची भाषणे झाली.
प्रास्ताविक पंकज तांबोळी, सूत्रसंचालन डॉ. आरती फडतरे व डॉ. श्राविका शहा तर आभार ब्रह्मदेव थोरात यांनी मानले.
फोटो १)इंदापूर - मोफत आरोग्यकार्यशाळेत मार्गदर्शन करताना डॉ. प्रताप पवार.
२) इंदापूर - मोफत आरोग्य कार्यशाळेस चार जिल्ह्यातून उपस्थित मान्यवर.
टिप्पण्या