शहाजीनगर (ता.इंदापूर) येथे निरा भिमा सहकारी साखर कारखान्याच्या पेट्रोल पंपाचा शुभारंभ माजी सहकार मंत्री व कारखान्याचे संस्थापक हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते आज शनिवारी (दि.12) करण्यात आला.
कारखान्यावरती पूर्वीपासून डिझेलचा पंप कार्यान्वित आहे. आज पासून सुरु झालेल्या पेट्रोल पंपामुळे शेतकऱ्यांची सोय आज पासून सुरु झालेल्या पेट्रोल पंपामुळे शेतकऱ्यांची सोय झाली आहे,असे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.
नीरा भीमा कारखान्याने आजअखेर 234703 मे. टन ऊसाचे गाळप केले आहे
. आसवणी प्रकल्पातून आजपर्यंत इथेनॉलचे 1287543 लि. व अल्कोहोलचे 2243715 लि.चे उत्पादन घेतले आहे.तर सह-वीजनिर्मिती प्रकल्पामधून 10600801 युनिट वीज विक्री करण्यात आलेली आहे, असे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले. यावेळी अध्यक्ष लालासाहेब पवार, उपाध्यक्ष कांतिलाल झगडे, विलासराव वाघमोडे, उदयसिंह पाटील, राजवर्धन पाटील, कृष्णाजी यादव, दत्तात्रय शिर्के, दत्तू सवासे, प्रतापराव पाटील, दादासो घोगरे, संजय बोडके, प्रकाश मोहिते, हरिदास घोगरे, मच्छिंद्र वीर, बबनराव देवकर, भागवत गोरे, चंद्रकांत भोसले, संगिता पोळ, बापुराव जामदार उपस्थित होते. प्रारंभी प्र.कार्यकारी संचालक सुधीर गेंगे-पाटील यांनी प्रास्ताविक केले
टिप्पण्या