मुख्य सामग्रीवर वगळा

लक्ष्मी वैभव न्यूज, शिवसृष्टी न्यूज

मा.शदचंद्रजी पवार यांच्या ८०व्या वाढदिवसा निमित्ताने रक्तदान शिबिराचे आयोजन इंदापुरात उस्फूर्त प्रतिसाद


इंदापूर: भारत देशाचे माजी केंद्रीय कृषी मंत्री शदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते,  या वेळी ना.मा. श्री.दत्तात्रय ( मामा) भरणे म्हणाले की 


            संपूर्ण राज्यभरात रक्ताचा मोठा तुटवडा निर्माण झाल्याने जास्तीत जास्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्याचे आवाहन  श्री.भरणे यांनी करून इंदापूर तालूका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी श्री.शरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवसानिमित्त चांगले सामाजिक उपक्रम राबविल्याबद्दल जाहिर कौतुक करून आज मी मंत्री म्हणून काम करत असताना कुठेही असलो तरी माझ्या इंदापूर तालुक्यातील सर्वसामान्य जनता व सर्व कार्यकर्ते तसेच पदाधिकारी यांच्यावरती माझे विशेष लक्ष असल्याचे सांगून उदाहरण म्हणून भरणे म्हणाले की  महिलांनी तोंड बांधले तरी मी विद्या कोण आहे हे ओळखतो आसे सांगून ग्रामपंचायत निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर इंदापूर तालुक्यातील प्रत्येक गावागावात विकास काय असतो ते कृतीतून दाखवणार असल्याचे श्री.भरणे मामा यांनी उपस्थितांना सांगितले.


          यावेळी इंदापूर तालूका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष श्री.शुभम निंबाळकर,तालूकाध्यक्ष श्री.हनुमंतराव कोकाटे पाटील,पुणे जिल्हा सरचिटणीस वसंतराव आरडे,  पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्री. प्रदिदादा गारटकर यांनी कार्यक्रमाच्य श्री, शरदचंद्रजी पवार यांच्या जिवनाचे विविध पैलू आपल्या मनोगतात सांगितले.या कार्यक्रमाच्या प्रसंगी मा.जिल्हा परिषद सदस्य श्री.प्रतापराव पाटील, जिल्हा परिषद सदस्य श्री हनुमंत बंडगर, कामगार नेते श्री शिवाजीराव खटकाळे, इंदापूर तालूका राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष श्री हनुमंत कोकाटे पाटील, माजी तालूकाध्यक्ष श्री महारूद्र पाटील, माजी नगराध्यक्ष श्री विठ्ठलराव ननवरे, माजी उपनगराध्यक्ष श्री दिलिप वाघमारे,जेष्ठ नेते श्री.डी.एन.जगताप, श्री विजयराव शिंदे,श्री दत्तात्रय घोगरे, श्री बाळासाहेब करगळ, श्री बाळासाहेब व्यवहारे, श्री अमोल भिसे,कार्याध्यक्ष श्री अतुल झगडे, जिल्हा परिषद सदस्य श्री अभिजित तांबिले, श्री तात्यासाहेब वडापुरे,श्री नवनाथ रूपनवर, श्री सचिन बोगावत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला अध्यक्षा सौ.छायाताई पडसळकर,माजी शहराध्यक्ष श्री अनिल राऊत, शहराध्यक्ष श्री बाळासाहेब ढवळे, इंदापूर नगरपालिकेचे नगरसेवक श्री दादासाहेब सोनवने,  श्री अशोक मखरे सर, श्री स्वप्निल राऊत,  शहराध्यक्षा ऊमाताई इंगोले,मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष श्री राहुल गुंडेकर, यांच्यासह इंदापूर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.या रक्तदान शिबिरात अनेक युवा कार्यकर्त्यानी सहभाग घेतला होता, पण संकलन करणारेे काही ढिसाळ पतपेढीतील कामगार,व दलाली करणा-या लोकांंमुळे अनेकांचा नाराजी चा सुर होता, कार्यक्रमाचे  प्रास्ताविक इंदापूर तालुका कार्याध्यक्ष अतुल झगडे यांनी केले.



□□□●●●●चौकट ●●●●●□□

या कार्यक्रमात शासकीय नियमांना फाट्यानेच हाणले, एकीकडे कोरोणा चे सावट म्हणून राज्यमंत्री दत्तात्रय भरणे प्रत्येक वेळी इतर कार्यक्रमात घसा कोरडा पडेपर्यंत सांगतात आणि दुसरीकडे स्वतःच या नियमांना फाट्यावर आदळतात वारे मंत्री महोदय....कारण ज्या वेळी मा.भरणे राज्यमंत्री भाषण करण्यासाठी उभे राहिले, तेंव्हा मात्र त्यांच्या पाठीशी आम्ही आहोत, हे दाखवण्यासाठी युवा तालुका अध्यक्ष शुभम निंबाळकर, शहराध्यक्ष बाळा ढवळे, यांनी मात्र दाखवून दिले,जबाबदार मंत्री महोदय भाषण करण्यासाठी उभे आणि मागे मात्र पोरखटपणा, चेष्टामस्करी, बाळा ढवळे यांनी मात्र स्टेज जवळ आपल्या अनेक  कार्यकर्त्याला उभा करून पत्रकारांना काही दिसणार नाही याचा चोख बंदोबस्त ठेवला होता, पण पत्रकार बंधू ने आपली जबाबदारी व्यवस्थित पार पडली,  सॅॅनिटाय झर व मास्कचा वापर अपवादात्मक परिस्थितीत होता


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्याच्या राजकारणातील तल्लख बुद्धिमत्तेचे रत्न हरपले - हर्षवर्धन पाटील

- प्रतापराव भोसले यांना वाहिली श्रद्धांजली  इंदापूर : प्रतिनिधी दि.19/5/24                  ज्येष्ठ नेते आदरणीय प्रतापराव भोसले उर्फ भाऊ आमचे मार्गदर्शक होते. प्रचंड बुद्धिमत्तेची देणगी लाभलेले हे व्यक्तिमत्व होते.  सध्याच्या संगणकीय युगात नव्या पिढीचा विश्वास बसणार नाही, एवढी अदभूत स्मरणशक्ती भाऊंजवळ होती. त्यांच्या निधनामुळे राज्याच्या राजकारणातील सुसंस्कृत, स्वाभिमानी व अतिशय तल्लख बुद्धिमत्तेचे रत्न हरपले आहे, या शब्दात राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष, भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली.            राज्याचे जेष्ठ नेते, सातारा मतदारसंघाचे 3 वेळा खासदार राहिलेले, वाई मतदार संघाचे 4 वेळा आमदार असलेले माजी मंत्री, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष प्रतापराव भोसले (वय -90) यांचे वृद्धपकाळाने भुईंज निवासस्थानी रविवारी (दि.19) निधन झाले.  त्यांच्या निधनाने अनेक आठवणींना उजाळा देत हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली.       ...

कै.विष्णुपंत बाब्रस यांना आजी-माजी नेत्यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली, तर अजित पवार यांची संतवन पर भेट

इंदापूर :तालुक्यातील माजी नायब तहसीलदार कै.विष्णुपंत (भाऊसाहेब) बाब्रस यांचे नुकतेच दुःखद निधन झाले ते मा.नगरसेवक विनायक बाब्रस यांचे ते वडील होते,राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार ,मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कन्या खा.सुप्रियाताई सुळे,आमदार.दत्तात्रय भरणे भाजपची ज्येष्ठ नेते हर्षवर्धनजी पाटील  पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांनी बाब्रस कुटुंबीयांचे सांत्वन केले   त्यांच्या  आत्म्यास चिरशांती लाभो असे मत यावेळी अजित दादा पवार यांनी व्यक्त केले याप्रसंगी   मा.उपनगराध्यक्ष धनंजय बाब्रस  मा.नगरसेवक श्रीधर बाब्रस  अॅड विलास बाब्रस निखिल बाब्रस, अथर्व बाब्रस व शिवाजी इजगुडे सह इंदापूर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बाब्रस भाऊसाहेब यांनी त्यांच्या शासकीय सेवेतील३५वर्षातील कळात,यशस्वी कामगिरी केली, गोरगरीब जनतेचे प्रमाणीक पणे काम केले, अडलेल्या जनसामान्य जनतेला सहकार्य केले, सलाम त्यांच्या कार्याला आशा शब्दात, बाब्रस...

*जेबिव्हीपीतील बालचमुंचा पक्षी संवर्धनासाठी एक अनोखा उपक्रम* - *

 इंदापूर: - जय भवानी गड विकास प्रतिष्ठान मध्ये विद्यार्थ्यांनी पक्षांना होणारा त्रास व पक्षांप्रती असलेली भावना समजून प्रशालेतील विद्यार्थी रोज चिऊचा घास, काऊचा घास या उक्तीप्रमाणे रोज पक्षांना चारा पाणी देत होते.परंतु पक्षांना खाण्यासाठी पाण्यासाठी लागलेली आशेची निराशा होऊ नये म्हणून ज्याप्रमाणे मानव आपल्या उदरनिर्वाहासाठी कार्य करतो आपले पोट भरतो आपली तृष्णा भागवतो परंतु हेच पक्षांना आपली भावना व्यक्त करता येत नाही हीच भावना समजून ; 5 मे 2024 रोजी शालेय विद्यार्थ्यांचा चालू वर्षातील अखेरचा दिवस असल्यामुळे विद्यार्थ्यांना उन्हाळ्याच्या लागणाऱ्या सुट्ट्यांमुळे आपल्या या कार्यात खंड पडू नये म्हणून संस्थेचे अध्यक्ष श्रीमंत ढोले सर यांच्या संकल्पनेतून या पक्षांची अन्नधान्याची, पाणी पिण्याची गैरसोय होऊ नये यासाठी प्रशालेतील विद्यार्थ्यांनी ट्विंकल देशमुखे  पूनम धांडोरे  ,ज्योती वाघमारे , प्रियंका यादव  यांनी विद्यार्थ्यांना कृत्रिम घरटे बनवण्यासाठी मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांनी बॉटल नारळाचे करवंटी डबे इत्यादी साहित्याचा वापर करून अतिशय सुंदर कृत्रिम घरटे...