इंदापूर तालुक्यातील तरंगवाडी ग्रामपंचायतीचा अजब कारभार,दलिताच्या घरावर जेसिबी फिरवूनही नुकसानभरपाई देण्यास टाळाटाळ केल्याचा प्रकार उघडकीस
इंदापूर दलितांना विकासाचे गाजर दाखवून, बंदिस्त गटारीचे काम करताना दलिताच्या घरावर जेसिबी फिरवून केलेल्या नुकसानीची भरपाई देण्यास टाळाटाळ केल्याचा धक्कादायक प्रकार तरंगवाडी (ता. इंदापूर ) येथील ग्रामपंचायतीमध्ये उघडकीस आला आहे.
याबाबत सविस्तर हकिकत अशी की, दलित वस्ती सुधारणा योजनेअंतर्गत तरंगवाडी ग्रामपंचायतीने दलित नागरिकांना विकासाचे गाजर दाखवून दलितांच्या सोईकरिता बंदिस्त गटारीचे काम मे.मिसाळ ठेकेदाराकरवी करण्यात आले.हे काम करत असताना संबंधित ग्रामपंचायतीने सिमेंटचे पाईप गाडत असताना आम्हाला रस्ता खोदायची परवानगी नाही असे तोंडी कारण देत दलिताच्या घरावर जेसिबी फिरवून संबंधित सिमेंट पाईप गाडण्यात आला. यादरम्यान संबंधित ग्रामसेवक, सरपंच तसेच ठेकेदार यांनी नुकसानग्रस्त कुटुंबाला तुमचे झालेले नुकसान आम्ही भरुन देवू असे तोंडी आश्वासन संबंधित कुटुंबाला दिले. आशी माहीती दिपकराव खिलारे यांनी दिली,
मात्र या तोंडी आश्वासनानंतर संबंधित कुटुंबांनी नुकसानभरपाईची मागणी ग्रामपंचायत, ठेकेदार यांचे कडे केली असता संबंधित ग्रामसेवकाने मी तुम्हाला ओळखतही नाही, तर ठेकेदाराने सांगितले की, तुमचे बांधकाम हे अतिक्रमणात आहे. त्यामुळे आम्ही ते काढून टाकले आहे. तुम्हाला नुकसानभरपाई देण्याचा प्रश्नच येत नाही. अशी उडवाउडवीची दिली.
परंतु दरम्यान नुकसानग्रस्त कुटुंबाने संबंधित ग्रामपंचायतीकडे झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी याकरीता लेखी अर्ज दिला होता.
मात्र या अर्जाकडे साफ दुर्लक्ष करुन गेल्या वर्षापासून या दलित नुकसानग्रस्त कुटुंबाला नुकसानभाईपासून वंचीत ठेवले.
□□□□□□ चौकट □□□□□□□
वास्तविक पाहता तरंगवाडी येथील दलित नागरिकांची संख्या अवघी ३९ आहे. हे गाव अवर्षणग्रस्त गाव आहे.या गावामध्ये वेळोवेळी टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो. अश्या परिस्थितीमध्ये गावाला पिण्याला पाणी नाही. त्याठिकाणी गटार योजना राबविणे म्हणजे केवळ ग्रामपंचायत पदाधिकारी, ग्रामसेवक तसेच ठेकेदार यांना जगण्याचा उद्योग आहे. असे म्हणण्यास वाव आहे.म्हणजे पिण्यास पाणी नाही. परंतु सांडपाणी वाहण्याची व्यवस्था शासनाकडून करण्यात येत आहे.आडातच नाही तर पोहऱ्यात कोठून येणार? हा प्रश्न वास्तविक पाहता संबंधित विभागाला पडण्याची गरज आहे.
टिप्पण्या