मुख्य सामग्रीवर वगळा

बिहार राज्यातील साखर कारखानदारीमध्ये सामंजस्य करारामुळे विकासाचे नवे पर्व - हर्षवर्धन पाटील

 इंदापूर:- बिहार राज्यातील साखर कारखानदारीला सामंजस्य करारामुळे शाश्वतता, कार्यक्षमता तसेच शेतकऱ्यांसाठी समृद्धी व विकासाचे नवे पर्व सुरु होत आहे. नवी दिल्ली येथील राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाशी झालेल्या सामंजस्य करारामुळे बिहार राज्यातील साखर कारखानदारीची प्रगतीकडे वाटचाल सुरू झाली आहे, असे गौरवोद्गार राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी पाटणा येथे सोमवारी (दि. 30) काढले.
   बिहारची राजधानी पाटणा येथे बिहार सरकारचा ऊस उद्योग विभाग आणि राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ नवी दिल्ली यांच्यामध्ये झालेल्या सामंजस्य कराराच्या स्वाक्षरी कार्यक्रमामध्ये हर्षवर्धन पाटील बोलत होते. यावेळी बिहारचे ऊस उद्योग विकास मंत्री संजय कुमार, अप्पर मुख्य सचिव के. सेंथिल कुमार, जयप्रकाश नारायण सिंह, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे उपाध्यक्ष केतनभाई पटेल, व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे, मुख्य ऊस सल्लागार आर. बी डाॅले व राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे संचालक मंडळ उपस्थित होते.
     बिहार सरकारच्या ऊस उद्योग विभागाच्या "समृद्ध उद्योग - सशक्त बिहार" या योजनेअंतर्गत राज्यात ऊस विकास आणि विस्तारासाठी तसेच ऊसावर आधारित उद्योग उभारण्यासाठी करण्यात आलेल्या या करारामुळे प्रगतीचा पुढील टप्पा सुरु होत असल्याचे हर्षवर्धन पाटील यांनी भाषणाच्या प्रारंभी नमूद केले.
   ते पुढे म्हणाले, राष्ट्रीय साखर कारखाना महासंघाकडे बिहार राज्यातील प्रस्तावित 2 नवीन साखर युनिट्सच्या स्थापनेसाठी ऊस व्यवहार्यता अहवाल (CFR) आणि सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) तयार करण्याचे काम सोपवण्यात आले होते. आमच्या टीमने हे काम विक्रमी वेळेत पूर्ण केले आहे.
  हर्षवर्धन पाटील पुढे म्हणाले, राष्ट्रीय सहकारी साखर महासंघ ही भारतातील सहकारी साखर कारखान्यांची सर्वोच्च राष्ट्रीय संस्था असून, तिच्याकडे ऊस विकास, तंत्रज्ञान आणि संस्थात्मक ज्ञानाचा अनेक दशकांचा अनुभव आहे. बिहारच्या साखर उद्योगाच्या शाश्वत ऊस विकास कार्यक्रमासाठी मार्गदर्शक संस्था म्हणून काम करण्याची महत्त्वाची जबाबदारी राष्ट्रीय महासंघावर सोपवण्यात आली आहे. राष्ट्रीय महासंघ बिहारमधील सर्व साखर कारखान्यांमधील ऊस विकास कामांसाठी तज्ज्ञ नोडल एजन्सी म्हणून काम करणार आहे.  
     राष्ट्रीय साखर महासंघ मार्गदर्शक संस्था म्हणून संपूर्ण साखर मूल्य साखळीमध्ये बिहार राज्य सरकारला व्यापक तांत्रिक मार्गदर्शन आणि धोरणात्मक सहाय्य करेल. आमच्या कामकाजामध्ये ऊस विकास, उत्पादकता वाढ आणि साखर उद्योगाचे आधुनिकीकरण या प्रमुख क्षेत्रांचा समावेश राहणार आहे. आमचा दृष्टिकोन शेतकरी-केंद्रित असेल, ज्यामुळे विकास प्रक्रिया शाश्वत आणि आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य राहील. बिहार सरकारच्या दूरदर्शी नेतृत्वामुळे ऊस लागवडीचा विस्तार करणे तसेच बंद पडलेल्या साखर कारखान्यांचे पुनरुज्जीवित करणे याकरिता राबविलेल्या धोरणांचा हर्षवर्धन पाटील यांनी भाषणात उल्लेख केला. देशाचे गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांच्या सक्षम नेतृत्वाखालील देशातील सहकारी साखर कारखानदारी क्षेत्रातील या महत्त्वपूर्ण उपक्रमाच्या यशासाठी राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी याप्रसंगी शुभेच्छा देत बिहार सरकारला धन्यवाद दिले.
•चौकट :-
--------
मुख्यमंत्री नितीश कुमार यांचे हर्षवर्धन पाटील यांनी मानले आभार!
-------------------------------
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या सक्षम आणि दूरदर्शी नेतृत्वाची प्रशंसा राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ नवी दिल्लीचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी केली. मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील बिहार सरकारने साखर उद्योगाचे पुनरुज्जीवन करणेसाठी आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांना सक्षम करणेसाठी सक्रिय पावले उचलली आहेत, त्याबद्दलही हर्षवर्धन पाटील यांनी मुख्यमंत्री नीतीश कुमार व बिहार सरकारचे आभार मानले.
•चौकट:-
=====
हर्षवर्धन पाटील यांची बिहारच्या मुख्य सचिवांशी चर्चा !
 ---------------------------------
राजधानी पाटणा येथे बिहारचे मुख्य सचिव प्रत्यय अमृत यांच्या निमंत्रणाचा स्वीकार करीत राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ नवी दिल्लीचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी त्यांची भेट घेतली व साखर उद्योग संदर्भात चर्चा केली. याप्रसंगी बिहार राज्यातील ऊस उत्पादन, सहकारी संस्था व नवीन सहकारी साखर कारखाने सुरू करणे आदी संदर्भात चर्चा झाली. तसेच बिहार सरकारला साखर उद्योगाचा विकासासाठी सर्व सहकार्य करण्याची ग्वाही या भेटीमध्ये हर्षवर्धन पाटील यांनी दिली.
दरम्यान, पाटणा दौऱ्यामध्ये बिहारचे सहकार व ऊस विकास मंत्रालय आणि राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने साखर व ऊस उद्योगासंदर्भात बैठक झाली. या बैठकीला हर्षवर्धन पाटील यांनी मार्गदर्शन केले.
____________________________
फोटो:-पाटणा येथे राष्ट्रीयसहकारी साखर कारखाना महासंघ व बिहार सरकार यांच्यातील सामंजस्य कराराच्या कार्यक्रमात बोलताना हर्षवर्धन पाटील. यावेळी व्यासपीठावर बिहारचे ऊस उद्योग विकास मंत्री संजय कुमार व मान्यवर.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जय भवानीगड विकास प्रतिष्ठान मधील बालचिमुकल्यानी घेतला आठवडा बाजाराचा आनंद

  इंदापूर जय भवानी गड विकास प्रतिष्ठान संचलित, विद्या निकेतन स्कूल अ‍ॅण्ड जुनियर कॉलेज व प्रेसिडेंसी इंटरनॅशनल स्कूल, विद्या निकेतन कॉलेज ऑफ फार्मसी व विद्यानिकेतन इन्स्टिटय़ूट ऑफ इंजिनिअरिंग अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 05/12/2025 रोजी आठवडा बाजाराचे नियोजन करण्यात आले होते.  विद्यार्थ्यांंना बाजारातल्या व्यवहाराची माहिती देण्यासाठी आणि त्यांना प्रत्यक्ष अनुभव देण्यासाठी प्रशाले मध्ये आठवडा बाजार भरवला होता. बाजारातील खरेदी विक्रीची माहिती मिळावी, पैश्याचा वापर कसा करावा याची जाणीव असावी, या उद्देशाने या आठवडे बाजाराचे नियोजन करण्यात आले होते.विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढावा पैश्याचे महत्त्व समजावे . भाजीपाला विक्री सोबत फळभाज्या विविध फळे, विविध खाद्यपदार्थ यांच्या खवय्यांनी विद्यार्थ्यांनी मनसोक्त आनंद लुटला.  फळे , भाजीपाला विक्री करताना विद्यार्थ्यांच्या चेहर्‍यावरचा आनंद ओसंडून वहात होता.  बाजारातील उत्साह आणि लगबग पाहून संस्थेच्या उपाध्यक्षा चित्रलेखा ढोले यांनी विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले. सदर कार्यक्रमा...

कै.विष्णुपंत बाब्रस यांना आजी-माजी नेत्यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली, तर अजित पवार यांची संतवन पर भेट

इंदापूर :तालुक्यातील माजी नायब तहसीलदार कै.विष्णुपंत (भाऊसाहेब) बाब्रस यांचे नुकतेच दुःखद निधन झाले ते मा.नगरसेवक विनायक बाब्रस यांचे ते वडील होते,राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार ,मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कन्या खा.सुप्रियाताई सुळे,आमदार.दत्तात्रय भरणे भाजपची ज्येष्ठ नेते हर्षवर्धनजी पाटील  पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांनी बाब्रस कुटुंबीयांचे सांत्वन केले   त्यांच्या  आत्म्यास चिरशांती लाभो असे मत यावेळी अजित दादा पवार यांनी व्यक्त केले याप्रसंगी   मा.उपनगराध्यक्ष धनंजय बाब्रस  मा.नगरसेवक श्रीधर बाब्रस  अॅड विलास बाब्रस निखिल बाब्रस, अथर्व बाब्रस व शिवाजी इजगुडे सह इंदापूर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बाब्रस भाऊसाहेब यांनी त्यांच्या शासकीय सेवेतील३५वर्षातील कळात,यशस्वी कामगिरी केली, गोरगरीब जनतेचे प्रमाणीक पणे काम केले, अडलेल्या जनसामान्य जनतेला सहकार्य केले, सलाम त्यांच्या कार्याला आशा शब्दात, बाब्रस...

*जय भवानीगड विकास प्रतिष्ठान लाखेवाडीमध्ये वार्षिक क्रिडा सप्ताहाचे आयोजन*

 इंदापूर जय भवानीगड विकास प्रतिष्ठान संचलित, विद्यानिकेतन स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज व प्रेसिडेन्सी इंटरनॅशनल स्कूल लाखेवाडी यांच्या संयुक्त विद्यमानाने दिनांक 17 /11/ 2025 ते 22/11/2025 रोजी क्रिडा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.   खेळ ही शारीरिक व मानसिक कला आहे. खेळामुळे शारीरिक  चपळता वाढते.खेळाचे प्रामुख्याने मैदानी खेळ व बैठे खेळ असे दोन प्रकार मानले जातात. प्रशालेमध्ये क्रिकेट, कबड्डी, खो-खो,लंगडी, रस्सीखेच,रिले 100 मी ,रिले 400 मी, थालीफेक इ खेळाचे आयोजन करण्यात आले.  विद्यार्थ्यांचा सर्वागीण विकास व्हावा या उद्देशानेच प्रशालेमध्ये क्रिडा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.  क्रिडा सप्ताहाच्या निमित्ताने प्रशालेतील मैदानावर विविध खेळाची जयंत तयारी करण्यात आली.  क्रिडा सप्ताहाच्या उद्घाटनप्रसंगी मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे तसेच मैदान पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.  मशाल फेरी काढून विविध खेळांच्या सामन्यांची सुरवात करण्यात आली.   कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्या निकेतन स्कूल जुनियर कॉलेजचे प्राचार्य गणेश पवार...