भगवान महावीर जन्म कल्याणक महोत्सवा निमित्त प्रतिमेची सवाद्य पालखी मिरवणूक, मिरवणुकीत तिन्ही जैन मंदिरचे पदाधिकारी सहभागी,
टाईम्स 45 न्यूज मराठी सहसंपादक मो. ९९२२४१९१५९
भारतीय श्रमण संस्कृतीचे प्रतीक असलेल्या प्राचीन जैन धर्माचे चोवीसावे तीर्थंकर भगवान महावीर यांच्या २६२५ व्या जन्म कल्याणक महोत्सवानिमित्त इंदापूर मध्ये त्यांच्या प्रतिमेची पारंपरिक पद्धतीने सवाद्य पालखी मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत श्री १००८ पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर, श्री १००८ शांतीनाथ दिगंबर जैन मंदिर, श्री १००८ वासुपूज्य श्वेतांबर जैन मंदिर चे पदाधिकारी तसेच स्थानकवासी जैन संप्रदायाचे श्रावक श्राविका मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
श्री १००८ शांतीनाथ दिगंबर जैन मंदिर महतीनगर येथून सवाद्य पालखी मिरवणुकीस प्रारंभ झाला. त्यानंतर जुना पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्ग, बाबा चौक, कांबळे गल्ली, खडकपूरा शिवाजी चौक, मुख्य बाजारपेठ, नेहरू चौक, संभाजी चौक ते मिरवणुकीचा समारोप श्री १००८ पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर प्रांगणात करण्यात आला. मिरवणुकीत महिलांनी फुगडी तसेच गरबा खेळण्याचा आनंद लुटला. यावेळी जैन भजनावर देखील नृत्य करण्यात आले. ही मिरवणूक शिस्तबद्ध तसेच मोठ्या उत्साहात संपन्न झाली. यावेळी भगवान महावीर, अहिंसा तसेच जैन धर्माचा जयघोष करण्यात आला.
यावेळी इंदापूर नगरपरिषदेचे नगराध्यक्ष भरतशेठ शहा, माजी नगराध्यक्षा सौ. अंकिताताई शहा,,शहा ग्लोबल स्कूलचे विश्वस्त मुकुंदशेठ शहा , इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मधुकर भरणे, भाजप नेते प्रदीपदादा गारटकर, नगरसेवक अक्षय सूर्यवंशी, विरोधी पक्ष नेते व आपले मेंबर ग्रुपचे नगरसेवक अनिल पवार, व अंगद शहा, उद्योजक संजय दोशी, मूकबधिर विद्यालयाचे प्राचार्य डॉ. अमोल उन्हाळे, सामाजिक कार्यकर्ते हरिदास सामसे यांनी महावीर जन्म कल्याणक महोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमानंतर शहा सांस्कृतिक भवन मध्ये महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी नगराध्यक्ष भरत शहा व मुकुंद शहा यांनी कार्यालय उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. श्री १००८ शांतीनाथ दिगंबर जैन मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष
डॉ. श्रेणीक शहा, श्री १००८ पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर चे विश्वस्त मिलिंद दोशी, भारतीय जैन संघटनेचे इंदापूर शहराध्यक्ष धरमचंद लोढा, श्री १००८ वासुपूज्य श्वेतांबर जैन मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष नरेंद्र गांधी, पारस बागरेचा, प्रकाश बलदोटा, महेंद्र गुंदेचा, संजय बोरा, जवाहर बोरा, हुकुमचंद बोरा, वीरेन दोशी, निलेश मोडासे, अरुण दोशी, सागर दोशी, संजय दोशी, साजन चंकेश्वरा, शिरीन दोशी, संदीप शहा, संदीप शहा सन्मती, डॉ. सागर दोशी, चंद्रशेखर दोशी, महावीर शहा, भारत दोभाडा, डॉ. अनंग मेहता, डॉ. आशिष दोभाडा, आदीकुमार गांधी, सुकुमार गांधी, अरविंद गांधी, धीरज गांधी, पवन भालेराव, परेश दोशी आदींनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रयत्न केले.
टिप्पण्या