मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

*शाई पुसून गैरकृत्य करणाऱ्यास पुन्हा मतदान करता येणे शक्य नाही*

मुंबई, दि. 15 : बोटावर लावण्यात आलेली शाई पुसण्याचा प्रयत्न करून मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करणे हे गैरकृत्य आहे. त्याचबरोबर बोटावरची शाई पुसून एखादी व्यक्ती पुन्हा मतदान करण्यासाठी आल्याचे आढळल्यास त्यावर योग्य ती कायदेशीर कार्यवाही केली जाईल, असे स्पष्टीकरण राज्य निवडणूक आयोगाने केले आहे. बोटावरची शाई पुसून कोणी गैरकृत्य करण्याचा प्रयत्न केला तरी संबंधित मतदाराला पुन्हा मतदान करता येत नाही, याबाबतची दक्षता यापूर्वीच घेण्यात आली आहे. मतदाराने मतदान केल्यानंतर त्याबाबत नोंद घेण्यात आलेली असते. त्यामुळे केवळ शाई पुसून गैरकृत्य केलेल्या मतदाराला पुन्हा मतदान करता येत नाही. याबाबत सतर्कता बाळगण्याच्या सूचना पुन्हा एकदा सर्व संबंधिताना देण्यात आल्या आहेत.  मतदाराच्या बोटाला शाई लावण्याकरिता मार्कर पेनच्या वापराबाबत राज्य निवडणूक आयोगाने 19 नोव्हेंबर 2011 रोजी आणि 28 नोव्हेंबर 2011 रोजी आदेश निर्गमित केले आहेत. तेव्हापासून स्थानिक स्वराज्‍य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मतदाराच्या बोटाला शाई लावण्यासाठी मार्कर पेनचा वापर केला जात आहे. या आदेशानुसार मतदाराच्या...

इंदापूरच्या आश्रमशाळेत जिजाऊ जयंती उत्साहात साजरी.

इंदापूर*: (*दि.१२*) येथील मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्ट संचलित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक आश्रमशाळा, मुलांचे व मुलींचे अनुदानित वसतिगृह यांच्या संयुक्त विद्यमाने जिजाऊ माँसाहेबांच्या जयंतीचे आयोजन संस्थेच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर शैक्षणिक संकुलात करण्यात आले होते. यावेळी आश्रमशाळेतील मुलींनी जिजाऊंची वेशभूषा परिधान करून त्यांचा त्याग, कर्तृत्व आणि संस्कारांचे दर्शन घडवले. विद्यार्थ्यांनी तथागत गौतम बुद्ध, जिजाऊ माँसाहेब,संस्थेचे तत्कालीन अध्यक्ष दिवंगत रत्नाकर मखरेंच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.कार्यक्रमात जिजाऊंच्या जीवनकार्यावर आधारित विद्यार्थ्यांकडून भाषणे, अभिवाचन, पोवाडे व गीतं यांचे सादरीकरण करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांच्या या उपक्रमातून जिजाऊंच्या आदर्श विचारांची प्रेरणा मिळाल्याचे प्राचार्या अनिता साळवे यांनी नमूद केले. कार्यक्रमास संस्थेचे सचिव ॲड. समीर मखरे, संचालक गोरख तिकोटे, मुख्याध्यापक साहेबराव पवार, अधीक्षक, शिक्षक - शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यश कांबळे,संचित का...

लाखेवाडीच्या लोकनियुक्त सरपंच डॉ. सौ. चित्रलेखा श्रीमंत ढोले यांना पीएचडी पदवी प्रदान

 लाखेवाडी गावच्या लोकनियुक्त सरपंच व जय भवानीगड विकास प्रतिष्ठानच्या उपाध्यक्ष डॉ. सौ. चित्रलेखा श्रीमंत ढोले यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू मा. श्री विजय फुलारी यांच्या हस्ते विद्यावाचस्पती (पीएचडी) पदवी प्रदान करण्यात आली. जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षिका म्हणून कार्यरत असताना डॉ. सौ. ढोले यांनी अनेक विद्यार्थ्यांच्या जीवनाला नवी दिशा देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले. शिक्षणासोबतच राजकारण व समाजकारणाची यथायोग्य सांगड घालून त्यांनी समाजात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. मात्र ज्ञानग्रहणाची तळमळ त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. आपल्या ज्ञानाचा उपयोग समाजातील महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी व्हावा, या उद्देशाने त्यांनी पीएचडी अभ्यासास सुरुवात केली. चार वर्षांच्या अथक परिश्रमातून मा. डॉ. साहेबराव हिवाळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली “ग्रामीण महिलांच्या सामाजिक, आर्थिक व आरोग्यविषयक समस्यांचा समाजशास्त्रीय अभ्यास (विशेष संदर्भ : इंदापूर तालुका, जिल्हा पुणे)” या विषयावर संशोधन करून त्यांनी पीएचडी पदवी प्राप्त केली. त्यांच्या या शैक्षणिक यशामुळे तालुक्या...

जय भवानीगड विकास प्रतिष्ठान लाखेवाडीच्या वतीने इंदापूर तालुक्यातील गुणवंत शिक्षकांचा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न

 इंदापूर जय भवानीगड विकास प्रतिष्ठान संचलित, विद्या निकेतन स्कूल अ‍ॅण्ड जुनियर कॉलेज व प्रेसिडेंसी इंटरनॅशनल स्कूल, विद्या निकेतन कॉलेज ऑफ फार्मसी व विद्यानिकेतन इन्स्टिटय़ूट ऑफ इंजिनिअरिंग अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 10/01/2026 इंदापूर तालुका स्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.  कार्यक्रम प्रसंगी तालुक्यातील 16 गावातील 250 गुणवंत आदर्श शिक्षकांचा सन्मान करण्यात आला.  आदर्श गुणवंत शिक्षक म्हणजे केवळ शिक्षण देणारा नाही तर चांगले संस्कार, नीतिमत्ता, सहानुभूती आणि शिकण्याची आवड निर्माण करणारा, विद्यार्थ्यांच्या सर्वागीण विकासासाठी झटणारा, आणि चांगला माणूस घडविणार्‍या शिक्षकांच्या गुणांना प्रोत्साहन देणार्‍या कार्यक्रमाचे आयोजन प्रशालेमध्ये करण्यात आले. संस्थेच्या उपाध्यक्षा चित्रलेखा ढोले यांनी सांगितले की, सर्व घटकातील मुलांना घडविण्याचे काम करणारे, नवीन पिढी घडविण्याचे काम करणारे शिक्षक करीत आहेत. कोणत्याही पदावर जाण्यासाठी शिक्षक महत्त्वाचा असतो म्हणुन या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे असे सांगितले.  क...

कॉट्रक्ट बेसवर काम करणा-या नगरपरिषद कर्मचार-यांना नोकरीत कायम करण्यासाठी कर्मचाऱ्यांकडून निवेदन

इंदापूर:- आपल्या इंदापूर नगरपरिषदेचे गेल्या अनेक वर्षापासुन काम करत आहेत. आम्ही कॉट्रक्ट बेसवर काम करत असुन मागील १५ वर्षापासुन आम्ही परमनंट होण्याची वाट पाहत आहोत. ऐवढी वर्ष प्रमाणीक पणे काम केले आहे हे सर्वानी पाहिलेले आहे. इंदापूर नगरपरिषदेला मिळालेल्या स्वच्छतेच्या पुरस्कारामध्ये आमचे योगदान अतुलनिय आहे. इंदापूरच्या स्वच्छतेसाठी आम्ही फार कष्ट घेतले आहेत. वाढत्या महागाईमुळे सदर कॉट्रक्ट बेसवर मिळणा-या पगारामध्ये आमचे घरखर्च भागत नाही. त्यामुळे आम्हाला कायम करण्याची कार्यवाही होईपर्यंत प्रतिदिवस ५०० रूपये या प्रमाणे पगार मिळावा अशी आमची मागणी आहे. आम्हाला इंदापूर नगरपरिषदेमध्ये कायम करून येथुन पुढे अखंडीत आपली सेवा करण्याची संधी द्यावी आसे निवेदन . मा.मुख्यमंत्री साो. महाराष्ट्र राज्य, मा. उपमुख्यमंत्री साो. महाराष्ट्र राज्य,मा. दत्तात्रय भरणे साो. कृषीमंत्री महाराष्ट्र राज्य,मा. भरतशेठ शहा, नगराध्यक्ष इंदापूर नगरपालिका यांना देण्यात आले,या निवेदनावर एकूण तीस कामगारांच्या सह्या आहेत, हे निवेदन मुख्याधिकारी यांच्यानावाने देण्यात आल...

इंदापूरात ३१ डिसेंबरला दारू नको दूध प्या हा अनोखा उपक्रम

देशातील युवा पिढी व्यसनमुक्त व सामर्थ्यवान बनावी या उदात्त हेतूने जेष्ठ किर्तनकार युवक मित्र ह.भ.प.बंडातात्या कराडकर यांच्या मार्गदर्शनाखाली व्यसनमुक्त युवक संघाच्या वतीने सलग १५व्या वर्षी विधायक ३१ डिसेंबर-दारू नको दूध प्या हा अनोखा उपक्रम राबविण्यात आला.        यावेळी इंदापूर शहर आणि परिसरातील गलांडवाडी, वरकुटे,वडापुरी, नरुटवाडी त्याच बरोबर इतर गावातील ५५० युवक व नागरीकांनी सहभाग घेतला. कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या नागरिकांना लोणी देवकर येथील रचना देशी गो संवर्धन केंद्र यांच्या वतीने मोफत सुगंधी दुधाचे वाटप करण्यात आले तसेच गलांडवाडी नं१येथील राजीवप्रताप निसर्गोपचार केंद्राचे संचालक प्रताप कदम यांच्या वतीने व्यसनमुक्त युवक संघाची शिवतेज दिनदर्शिका मान्यवरांना भेट देण्यात आली.      कार्यक्रमाचे अध्यक्ष इंदापूर नगरपालिकेचे नगराध्यक्ष भरत शेठ शहा म्हणाले 'घरातील, समाजातील ज्येष्ठांचे अनुकरण करत शालेय मुलंही व्यसनाच्या आहारी जात आहेत म्हणून शालेय जीवनात विद्यार्थ्यांना व्यसनमुक्तीचे प्रबोधन होणे गरजेचे आहे. कोणत्याही देशाची ...

जय भवानीगड विकास प्रतिष्ठान लाखेवाडीमध्ये भव्य ,दिव्य असा मल्हार महोत्सव आनंदमय वातावरणात संपन्न.

* सलग तीन दिवसीय मल्हार महोत्सवाचे भव्य असे आयोजन* जय भवानीगड विकास प्रतिष्ठान संचलित, विद्यानिकेतन स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज,प्रेसिडेन्सी इंटरनॅशनल स्कूल व विद्यानिकेतन कॉलेज ऑफ फार्मसी,विद्या निकेतन इन्स्टिटय़ूट ऑफ इंजिनिअरिंग अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी व JBVP  अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 28/डिसेंबर,2025,29/डिसेंबर 2025,30 डिसेंबर 2025 अशा सलग तीन दिवसीय मल्हार महोत्सव कार्यक्रमाचे आयोजन, नियोजन करण्यात आले.  विद्यार्थ्यांच्या अंगी असणाऱ्या सुप्त गुणांना वाव मिळावा,पुस्तकी ज्ञानाबरोबर सुसंस्कार ही मिळायला हवेत म्हणून प्रशालेमध्ये श्री महाकाल थीम मल्हार महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते नटराज मूर्तीचे पूजन व सरस्वती पूजन तिन्ही दिवस करण्यात आले. स्नेहसंमेलन म्हणजेच मुलांना घडवण्याची संधी आहे.स्नेहसंमेलन हा कार्यक्रम केवळ मनोरंजन म्हणून नाही तर एक संस्कार करण्याची संधी आहे म्हणूनच प्रशालेमध्ये अशा संस्कार महोत्सवाचेच आयोजन करण्यात आले. भारतात संस्कृती विकासाच्या सर्व अडथळ्यावर मात करत वेगवेगळ्या जाती-जमातींना एकत्र आणण्याचे काम नृत्य आण...