प्रतिनिधी - सिकंदर नदाफ संपूर्ण भारतात बहुचर्चित असलेल्या भारतीय पत्रकार संघाच्या बारामती तालुक्याची मासिक सभा वाणेवाडी येथे उत्साही वातावरणात पार पडली. यावेळी सभेचे अध्यक्षस्थान पत्रकार संघाचे जिल्हा सचिव काशिनाथ पिंगळे यांना भूषविण्यात आले होते.या सभेत त्यांनी नूतन कार्यकारिणीच्या पदाधिकाऱ्यांना संबोधित करताना पत्रकार संघाच्या जवाबदारीची जाणीव करून दिली. तर पत्रकारांच्या कल्याणाहेतू विविध विषयांवर चर्चा करून पत्रकार संघाच्या वतीने आगामी काळात विविध सामाजिक उपक्रम देखील राबविण्यात येणार असल्याची माहिती बारामती तालुक्याचे नवनिर्वाचित अध्यक्ष मधुकर बनसोडे यांनी दिली . याप्रसंगी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष महंमद शेख सचिव शरद भगत सहसचिव माधव झगडे संघटक प्रमुख निखिल नाटकर माजी अध्यक्ष विनोद गोलांडे खजिनदार सोमनाथ लोणकर हल्लाकृती समिती प्रमुख अजय पिसाळ,प्रेस फोटो फोटोग्राफर जितेंद्र काकडे तसेच सोमनाथ जाधव यांसह आदी मान्यवर उपस्थित होते.
SHIVSRUSTHI NEWS