मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

*हर्षवर्धन पाटील यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करून मुंबईला पाठवा - शरद पवार*

भरणे यांना मी सर्व पदे दिली, भरणेचा रुपया खोटा निघाला. त्यांना पडायचं - शरद पवार -इंदापूरच्या इतिहासात विक्रमी गर्दीची सभा! इंदापूर :                   महाराष्ट्रामध्ये शेती, शिक्षण व इतर ठिकाणी परिवर्तन करायचे आहे, त्यासाठी हर्षवर्धन पाटील यांच्या सारख्या सहकाऱ्यांची गरज असल्याने त्यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करा. उद्या महाराष्ट्राची सत्ता आंम्हा लोंकाची हाती आल्यानंतर हर्षवर्धन पाटील  यांचा मुक्काम इंदापूरला राहणार नाही मुंबईला राहील, असे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी भाषणात नमूद करीत आ.दत्तात्रय भरणे यांना मी सर्व काही दिले मात्र गडी कुठे गेला हे कळलं नाही.. ही कसली माणसे.. यांच्या पाठीला कणा  नाही...भरणेचा रुपया खोटा निघाल्याने त्यांना निवडणूकीत पाडायचं.. पाडायचं.. पाडायचं... असा नारा देत शरद पवारांनी भाषणात आ. भरणेवर जोरदार टीकास्त्र सोडले.              इंदापूर येथे वाघ पॅलेस शेजारील भव्य मैदानावरती सोमवारी (दि.18)  राष्ट्रवादी काँग्...

*हर्षवर्धनभाऊंसह जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांचा विजय निश्चित : खा.सुप्रिया सुळे*

• भाऊंबद्दल जनतेमध्ये सहानुभूतीची लाट!  •बावडा येथील सभेस विक्रमी गर्दी!  *धैर्यशील मोहिते-पाटील यांचीही फटकेबाजी. इंदापूर : प्रतिनिधी दि.17/11/24            भाऊ सांगत होते मी एकटा पडलोय, पण नाही भाऊ तुमची ही बहीण आहे ना ? तुम्ही माझ्याबरोबर थोरले भाऊ म्हणून उभे राहीलात, तुमची लहान बहिणी तुमच्या पाठीशी आहे. तसेच पवार साहेबांचे आशीर्वाद आपले पाठीशी आहेत. त्यामुळे हर्षवर्धनभाऊसह पुणे जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांचा विजय निश्चित आहे, असे प्रतिपादन खा.सुप्रिया सुळे यांनी केले.       बावडा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे इंदापूर विधानसभा मतदारसंघातील उमेदवार हर्षवर्धन पाटील यांच्या प्रचारार्थ शनिवारी (दि.16) रात्री आयोजित सभेत खा.सुप्रियाताई सुळे बोलत होत्या. बावडा येथील सभेला विक्रमी गर्दी झाली होती.       सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या, बाजार तळावर लावलेला विरोधी पक्षाचा बॅनर मी आता पाहिला आहे. आयुष्यातली पहिली लढाई या बॅनर वरील पक्षाचे नाव व चिन्हा संदर्भात आह...

निमगाव-केतकीमध्ये खा.अमोल कोल्हे यांची शनिवारी 2.30 वा. सभा

 इंदापूर विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष, काँग्रेस, शिवसेना (उबाठा) यांच्या महाविकास आघाडीचे उमेदवार, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या प्रचारार्थ खा.अमोल कोल्हे यांची जाहीर प्रचार सभा निमगाव केतकी येथे कर्मयोगी कारखाना रोडवरती शनिवार (दि.16) रोजी दुपारी 2.30 वा. होणार आहे.           खा.अमोल कोल्हे यांचा सभांचा धडाका राज्यात जोरात सुरू आहे. निमगाव केतकी येथे होणाऱ्या खा.अमोल कोल्हे यांच्या सभेची वेळ यापूर्वी सायंकाळी 4 वा. अशी जाहीर करण्यात आली होती. मात्र सदर वेळेस बदल झाला असून, खा.अमोल कोल्हे सभा दुपारी 2.30 वा. होणार आहे. तरी सदरच्या सभेस दुपारी 2.30 वा. वेळेवर उपस्थित राहावे, अशी आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे.

*मोदी शहांच्या विचारांचा महाराष्ट्र होऊ देऊ नका - प्रज्ञा सातव*

वाल्हे प्रतिनिधी- सिकंदर नदाफ बटोगे तो कटोगे असा नारा देणाऱ्यांनी राज्यात जातीय अराजकता निर्माण केली आहे मात्र या प्रकाराला आळा घालायचा असेल तर मोदी शहांच्या विचारांचा महाराष्ट्र होऊ देऊ नका असे प्रतिपादन विधानपरिषदेच्या आमदार प्रज्ञा सातव यांनी केले. वाल्हे ( ता. पुरंदर) येथे महाविकास आघाडीचे उमेदवार संजय जगताप यांच्या प्राचारार्थ घेण्यात आलेल्या महासभेत प्रज्ञा सातव ह्या बोलत होत्या.त्या पुढे म्हणाल्या महायुतीच्या माध्यमातून राज्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ,ग्रामीण कामगार योजना अशा अनेक योजनांच्या नावाखाली गोरगरीब जनतेची अप्रत्यक्ष रित्या लयलुट केली जाते आहे. त्यातच जाती पातीचे राजकारण करून केवळ सत्तेसाठी सामाजिक सलोखा बिघडविण्याचा देखील अतोनात प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे मतदारांनी देखील महायुतीतून निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराच्या भूलथापांना बळी न पडता पारदर्शक विकासासाठी महाविकास आघाडीलाच साथ द्यावी असे आवाहनही त्यांनी केले. या दरम्यान संजय जगताप म्हणाले गुंजवणी प्रकल्प तसेच विमानतळाबद्दल विजय शिवतारे यांनी वेळोवेळी जनतेची दिशाभूल करून विकास कामात व्य...

*चेतना कॉलेज ऑफ फार्मसी सरडेवाडी विद्यार्थ्यांचे धुळे येथील अंतर महाविद्यालय कुस्ती स्पर्धेमध्ये यश*

धुळे येथे झालेल्या अंतर महाविद्यालयास कुस्ती स्पर्धेमध्ये चेतना कॉलेज ऑफ फार्मसी चे विद्यार्थी पै. हर्षवर्धन गुरव 74 किलो वजनगटातून तसेच पै . निलेश यादव 79 किलो वजन गटातून प्रथम क्रमांक मिळवून दिल्ली येथे होणाऱ्या नॅशनल कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष उदयशेठ देशपांडे, सचिव विलास भोसले, खजिनदार सोमनाथ माने तसेच प्राचार्य डॉ महेश जाधव अभिनंदन व सत्कार केला त्या विद्यार्थ्यांना प्रा . भैरव व्यवहारे यांनी मार्गदर्शन केले

*हर्षवर्धन पाटील यांच्या प्रचारार्थ इंदापूर शहरातील महिलांच्या पदयात्रेस उत्स्फूर्त प्रतिसाद*

इंदापूर    - जिजाऊ फेडरेशनच्या अध्यक्षा भाग्यश्री पाटील आणि माजी जिल्हा परिषद सदस्या अंकिता पाटील ठाकरे यांच्या समवेत महिलांनी महिला सक्षमीकरणाचा नारा देत  साधला इंदापूरकरांशी संवाद         महाविकास आघाडीचे विधानसभेचे उमेदवार मा. मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या प्रचारार्थ जिजाऊ फेडरेशनच्या अध्यक्षा भाग्यश्री पाटील व माजी जिल्हा परिषद सदस्या अंकिता पाटील ठाकरे यांच्या समवेत महिलांनी पदयात्रेमध्ये उस्फूर्त सहभाग नोंदवीत माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांना विधानसभेत मोठ्याधिक्याने मतदान करून निवडून देण्याचे आवाहन करीत पदयात्रेच्या माध्यमातून नागरिकांशी त्यांनी संवाद साधला.     महिलांची संख्या मोठी असून त्यांची सुरक्षितता आणि त्यांच्या सक्षमीकरणासाठी देशाचे नेते शरद पवार आणि हर्षवर्धन पाटील यांना जनतेने साथ द्यावी यासाठी महिलावर्गाने मोठ्या प्रमाणात सहभागी होत या यात्रेमध्ये इंदापूर शहरातील नागरिकांशी त्यांनी संवाद साधला तसेच यावेळी त्यांनी हर्षवर्धन पाटील यांना मतदान करण्याचे आवाहन केले .     यावेळी अने...

*विद्येचे माहेर असलेल्या पुणे शहरात दिगंबर जैन हुमड समाज संस्कृती, शिक्षण व संस्कार संवर्धनाचे सुसज्ज केंद्र व्हावे : मुनी अमोघकीर्ती महाराज*

इंदापूर, डॉ. संदेश शहा. पुणे हे विद्येचे माहेरघर असून शहरात भारत वर्षीय दिगंबर जैन हुमड समाज संस्कृती, शिक्षण व संस्कार संवर्धनाचे महत्वपूर्ण केंद्र होणे ही काळाची गरज आहे असे प्रतिपादन श्री १०८ मुनी अमोघकीर्ती महाराज यांनी केले. फेडरेशन ऑफ हुमड जैन समाज आंतरराष्ट्रीय संघटनेच्या वतीने पुणे माणिकबाग येथील श्री १००८ भगवान महावीर दिगंबर जैन मंदिर सभागृहात आयोजित पुणे विभागस्तरीय मेळाव्यात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी फेडरेशनचे नूतन शिरोमणी संरक्षक तथा फेडरेशनचे प्रदेश महामंत्री डॉ. रविकिरण शहा यांचा फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष विपीन गांधी व महामंत्री महेंद्र बंडी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. अमोघकिर्ती महाराज पुढे म्हणाले, हुमड समाजाची निर्मिती आचार्य माघनंदी महाराज यांचे शिष्य हेमचंद्र मुनी महाराज यांच्या मुळे झाली. हुमड चा अर्थ हुशार, मनन शील आणि धाडशी गुण असलेला समाज असा असून वालचंद हिराचंद सारखा कृषीऔद्योगिक क्रांती करणारा दृष्ट्रा उद्योगपती या समाजाने देशाला दिला आहे. समाजाची लोकसंख्या फक्त १ लाख २० हजार असून समाजात दसा व बिसा हुमड असे पंथ भेद आहेत. मात्र त...