मुख्य सामग्रीवर वगळा

*हर्षवर्धन पाटील यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करून मुंबईला पाठवा - शरद पवार*

-इंदापूरच्या इतिहासात विक्रमी गर्दीची सभा!
इंदापूर : 
                 महाराष्ट्रामध्ये शेती, शिक्षण व इतर ठिकाणी परिवर्तन करायचे आहे, त्यासाठी हर्षवर्धन पाटील यांच्या सारख्या सहकाऱ्यांची गरज असल्याने त्यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करा. उद्या महाराष्ट्राची सत्ता आंम्हा लोंकाची हाती आल्यानंतर हर्षवर्धन पाटील  यांचा मुक्काम इंदापूरला राहणार नाही मुंबईला राहील, असे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी भाषणात नमूद करीत आ.दत्तात्रय भरणे यांना मी सर्व काही दिले मात्र गडी कुठे गेला हे कळलं नाही.. ही कसली माणसे.. यांच्या पाठीला कणा  नाही...भरणेचा रुपया खोटा निघाल्याने त्यांना निवडणूकीत पाडायचं.. पाडायचं.. पाडायचं... असा नारा देत शरद पवारांनी भाषणात आ. भरणेवर जोरदार टीकास्त्र सोडले.
             इंदापूर येथे वाघ पॅलेस शेजारील भव्य मैदानावरती सोमवारी (दि.18)  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे व व महाविकास आघाडीचे उमेदवार हर्षवर्धन पाटील यांच्या प्रचाराच्या सांगता सभेत खा.शरद पवार यांनी मार्गदर्शन केले. या सभेला खा.सुप्रिया सुळे उपस्थित होत्या.
         शरद पावर पुढे म्हणाले, पक्षातील निर्णय मी घेत होतो. भरणेला सगळं दिलं आणि प्रसंग आला त्यावेळी कुठं गेला याचा पत्ताच नाही. निघून गेला. ही कसली माणसं आहेत? दम नाही ह्यांच्यात. ह्यांच्या पाठीला कणा नाही. संकटं येतात, त्याच्यावर मात करून उभं राहायचं, आणि भागातील जनतेचे जीवन सुधारेल यासाठी कष्ट करायचं, ह्याला म्हणतात नेतृत्व! पण भरणे हे खोटं नेतृत्व निघालं. हा रुपया खोटा निघाला. आणि रुपया खोटा असेल तर आता तो घेऊन चालणार नाही. उद्याच्या निवडणुकीत निकाल घ्यावा लागेल. काय निकाल घ्यायचा? भरणेला पाडायचं. हा निकाल तुम्ही घ्या, मी तुम्हाला खात्री देतो, इंदापूर तालुक्याचे चित्र बदलेल, असे शरद पवार यांनी भाषणात स्पष्ट केले.
           आपल्या भाषणात हर्षवर्धन पाटील म्हणाले होते की, इंदापूरच्या कुस्तीला मला आशीर्वाद द्या. त्यावर बोलताना शरद पवार म्हणाले की, कुस्ती कुणाशीही करायची नसते, कुस्ती योग्य अशाच पैलवानाची करायची असते, असे नमूद करीत विरोधी उमेदवार आ.भरणे यांची पवार यांनी खिल्ली उडविली. 
            शरद पवार पुढे म्हणाले, इंदापूरचे चित्र बदलण्यासाठी स्व.शंकररावभाऊ पाटील त्यानंतर हर्षवर्धन पाटील यांना सरकारमध्ये काम करण्याचे संधी मिळाल्यानंतर त्यांनी महाराष्ट्राच्या कल्याणासाठी शेतकरी, कष्टकरी, कामगार यांच्यासाठी काम केले.
                राज्यात लोकांना बदल परिवर्तन पाहिजे. या मागणीला तुम्ही साथ द्या व हर्षवर्धन पाटलांना तुम्ही निवडून द्या. हर्षवर्धन हे वेगळ्या पक्षात होते मी वेगळ्या पक्षात होतो, मात्र महाराष्ट्राच्या हिताचा निर्णय घेताना आम्ही दोघांनी कधीही राजकारण आणलं नाही. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचा मी अध्यक्ष व समितीत हर्षवर्धन पाटील आहेत. आम्ही विविध प्रश्नावर चर्चा करतो. जबाबदारी कोणावर टाकायची असा प्रश्न पडतो त्यावेळेस दोन-तीन जणांचे नाव येते त्यामध्ये हर्षवर्धन पाटलांची नाव येते. हर्षवर्धन पाटील यांच्यामध्ये कोणतेही काम करण्याची दृष्टी आणि कुवत आहे, असे शरद पवार यांनी भाषणात स्पष्ट केले.
                 डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिली त्या घटनेवर देश एकसंध आहे. त्यात बदलाव करावा असा विचार केंद्रातील सत्तारूढ पक्षाच्या मनात होता. मात्र देशातील सर्व पक्षांनी एकत्र येऊन हा विचार म्हणून पडला. महाराष्ट्रातून अनेक उद्योग गुजरातला जात आहेत, त्यामुळे राज्यात बेरोजगारी वाढली आहे. राज्याला सर्व क्षेत्रात आघाडीवर नेण्यासाठी महाविकास आघाडी सरकारला निवडून द्या, असे आवाहनही शरद पवार यांनी यावेळी केले.
              हर्षवर्षन पाटील म्हणाले, समाजातील शेवटच्या घटकापर्यंत चांगला विचार पोहोचेल असे नाव म्हणजे शरद पवार. 84 वयातही एखाद्या 21 वयाच्या युवकाला लाजवेल असा उत्साह त्यांच्यात आहे. राज्यात त्यांच्या सभेला प्रचंड गर्दी होतेय. आता नवीन फ्याड आले आहे रडायचं... जाता जाता त्यांना आपण दहा वर्षात वाईट केलं याची जाणीव झाली असावी, त्यामुळे रडायला आले असावे, असा टोला लगावला.
              ते पुढे म्हणाले, आमचे बरोबर इंदापूर तालुक्यातील सर्व समाजाचे लोक आहेत. आमच्यातील काही त्यांच्या पक्षात जाऊन मलिदा नंबर बी झाली आहे. आयाराम गयाराम किती आले गेले तरी हर्षवर्धन पाटील एकता पडलेला नाही, जनता माझ्या पाठीशी आहे. 
        शरद पवारांचा विश्वास इंदापूरच्या जनतेवर आहे म्हणून मला पार्लमेंटरी बोर्डात घेतले. इंदापूर तालुका परिवर्तन करण्याच्या भूमिकेत आला आहे. ही सांगता सभा विरोधकांची राजकारणात मी सांगता करणारी सभा आहे. निवडणुकीनंतर शेतीच्या पाण्याचा प्रश्न सोडवायचा आहे. आर्थिक बदल घडवायचा आहे. तालुक्यासाठी पंचसूत्री कार्यक्रम राबवणार असून, प्रत्येक वर्षाला काय करणार याचा मास्टर प्लॅन तयार करणार असून 
पुढच्या चार पिढ्यांचा शेतीचा प्रश्न सोडवल्याशिवाय हर्षवर्धन पाटील शांत बसणार नाही हा शब्द देतो. येत्या 23 तारखेला निकाल लागू द्या एक महिन्यात प्रशासन कसं सुधारायचा ती जबाबदारी हर्षवर्धन पाटील स्विकारायला  तयार आहे, असे हर्षवर्धन पाटील यांनी नमूद करताच टाळ्यांचा कडकडाट झाला.
         यावेळी खा.सुप्रियाताई सुळे यांनी भाषण सांगितले की, इंदापूर-बारामतीतील दडपशाही आपणास मोडून काढायची आहे. मला आजींनी शिकवले रडायचं नसतं तर लढायचं असतं, ते कॉन्टॅक्टर साठी रडले असतील. चालु निवडणुक ही अस्मिता व स्वाभिमानाची लढाई आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी, दुधाला भाव मिळालाच पाहिजे यासाठी मी आग्रही राहणार आहे.  आपले संस्कारक्षम उमेदवार हर्षवर्धन पाटील यांना निवडून द्या, असे आवाहन सुप्रियाताई सुळे यांनी भाषण केले. यावेळी अनेक मान्यवरांची भाषणे झाली. या सभेला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरचंद्र पवार पक्ष, काँग्रेस, शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) या पक्षाचे इंदापूर तालुक्यातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. इंदापूर तालुक्याच्या इतिहासातील विक्रमी सभा झाल्याची चर्चा सभेनंतर सुरु होती. 
----------------------------------------
भरणे यांनी वाहतुकीच्या धंद्यामध्ये काम करण्याची इच्छा आहे मला मदत करा असे  सांगितले, त्यावर मी फोन उचलून गुजरातच्या उद्योजकाला सांगितले व त्यांच कल्याण झालं. तसेच निवडणुकीला उभे राहताना मदत केली. जिल्हा परिषदेला, विधानसभेमध्ये मदत केली,  मंत्रिमंडळात घेतलं. इंदापूर बरोबरच महाराष्ट्रामध्ये या प्रवृत्तीचे जे जे लोक आहेत त्यांना बाजूला करा, असे आवाहनही शरद पवार यांनी भाषणात केले.
-----------------------------------
 शरद पवार व सुप्रियाताई सुळे यांच्या आजच्या सभेला मार्केट कमिटीची जागा मुद्दाम देण्यात आली नाही. मी संबंधितांना 3 वेळा फोन केले, एकदा जाऊन भेटलो मात्र सभेसाठी जाणून-बुजून जागा दिली नाही. या घटनेचा मी निषेध करतो असे भाषणात पक्षाचे तालुकाध्यक्ष  अँड. तेजसिह पाटील यांनी सांगितले.  

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्याच्या राजकारणातील तल्लख बुद्धिमत्तेचे रत्न हरपले - हर्षवर्धन पाटील

- प्रतापराव भोसले यांना वाहिली श्रद्धांजली  इंदापूर : प्रतिनिधी दि.19/5/24                  ज्येष्ठ नेते आदरणीय प्रतापराव भोसले उर्फ भाऊ आमचे मार्गदर्शक होते. प्रचंड बुद्धिमत्तेची देणगी लाभलेले हे व्यक्तिमत्व होते.  सध्याच्या संगणकीय युगात नव्या पिढीचा विश्वास बसणार नाही, एवढी अदभूत स्मरणशक्ती भाऊंजवळ होती. त्यांच्या निधनामुळे राज्याच्या राजकारणातील सुसंस्कृत, स्वाभिमानी व अतिशय तल्लख बुद्धिमत्तेचे रत्न हरपले आहे, या शब्दात राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष, भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली.            राज्याचे जेष्ठ नेते, सातारा मतदारसंघाचे 3 वेळा खासदार राहिलेले, वाई मतदार संघाचे 4 वेळा आमदार असलेले माजी मंत्री, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष प्रतापराव भोसले (वय -90) यांचे वृद्धपकाळाने भुईंज निवासस्थानी रविवारी (दि.19) निधन झाले.  त्यांच्या निधनाने अनेक आठवणींना उजाळा देत हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली.       ...

कै.विष्णुपंत बाब्रस यांना आजी-माजी नेत्यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली, तर अजित पवार यांची संतवन पर भेट

इंदापूर :तालुक्यातील माजी नायब तहसीलदार कै.विष्णुपंत (भाऊसाहेब) बाब्रस यांचे नुकतेच दुःखद निधन झाले ते मा.नगरसेवक विनायक बाब्रस यांचे ते वडील होते,राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार ,मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कन्या खा.सुप्रियाताई सुळे,आमदार.दत्तात्रय भरणे भाजपची ज्येष्ठ नेते हर्षवर्धनजी पाटील  पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांनी बाब्रस कुटुंबीयांचे सांत्वन केले   त्यांच्या  आत्म्यास चिरशांती लाभो असे मत यावेळी अजित दादा पवार यांनी व्यक्त केले याप्रसंगी   मा.उपनगराध्यक्ष धनंजय बाब्रस  मा.नगरसेवक श्रीधर बाब्रस  अॅड विलास बाब्रस निखिल बाब्रस, अथर्व बाब्रस व शिवाजी इजगुडे सह इंदापूर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बाब्रस भाऊसाहेब यांनी त्यांच्या शासकीय सेवेतील३५वर्षातील कळात,यशस्वी कामगिरी केली, गोरगरीब जनतेचे प्रमाणीक पणे काम केले, अडलेल्या जनसामान्य जनतेला सहकार्य केले, सलाम त्यांच्या कार्याला आशा शब्दात, बाब्रस...

*जेबिव्हीपीतील बालचमुंचा पक्षी संवर्धनासाठी एक अनोखा उपक्रम* - *

 इंदापूर: - जय भवानी गड विकास प्रतिष्ठान मध्ये विद्यार्थ्यांनी पक्षांना होणारा त्रास व पक्षांप्रती असलेली भावना समजून प्रशालेतील विद्यार्थी रोज चिऊचा घास, काऊचा घास या उक्तीप्रमाणे रोज पक्षांना चारा पाणी देत होते.परंतु पक्षांना खाण्यासाठी पाण्यासाठी लागलेली आशेची निराशा होऊ नये म्हणून ज्याप्रमाणे मानव आपल्या उदरनिर्वाहासाठी कार्य करतो आपले पोट भरतो आपली तृष्णा भागवतो परंतु हेच पक्षांना आपली भावना व्यक्त करता येत नाही हीच भावना समजून ; 5 मे 2024 रोजी शालेय विद्यार्थ्यांचा चालू वर्षातील अखेरचा दिवस असल्यामुळे विद्यार्थ्यांना उन्हाळ्याच्या लागणाऱ्या सुट्ट्यांमुळे आपल्या या कार्यात खंड पडू नये म्हणून संस्थेचे अध्यक्ष श्रीमंत ढोले सर यांच्या संकल्पनेतून या पक्षांची अन्नधान्याची, पाणी पिण्याची गैरसोय होऊ नये यासाठी प्रशालेतील विद्यार्थ्यांनी ट्विंकल देशमुखे  पूनम धांडोरे  ,ज्योती वाघमारे , प्रियंका यादव  यांनी विद्यार्थ्यांना कृत्रिम घरटे बनवण्यासाठी मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांनी बॉटल नारळाचे करवंटी डबे इत्यादी साहित्याचा वापर करून अतिशय सुंदर कृत्रिम घरटे...