वाल्हे प्रतिनिधी- सिकंदर नदाफ
बटोगे तो कटोगे असा नारा देणाऱ्यांनी राज्यात जातीय अराजकता निर्माण केली आहे मात्र या प्रकाराला आळा घालायचा असेल तर मोदी शहांच्या विचारांचा महाराष्ट्र होऊ देऊ नका असे प्रतिपादन विधानपरिषदेच्या आमदार प्रज्ञा सातव यांनी केले.
वाल्हे ( ता. पुरंदर) येथे महाविकास आघाडीचे उमेदवार संजय जगताप यांच्या प्राचारार्थ घेण्यात आलेल्या महासभेत प्रज्ञा सातव ह्या बोलत होत्या.त्या पुढे म्हणाल्या महायुतीच्या माध्यमातून राज्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ,ग्रामीण कामगार योजना अशा अनेक योजनांच्या नावाखाली गोरगरीब जनतेची अप्रत्यक्ष रित्या लयलुट केली जाते आहे. त्यातच जाती पातीचे राजकारण करून केवळ सत्तेसाठी सामाजिक सलोखा बिघडविण्याचा देखील अतोनात प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे मतदारांनी देखील महायुतीतून निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराच्या भूलथापांना बळी न पडता पारदर्शक विकासासाठी महाविकास आघाडीलाच साथ द्यावी असे आवाहनही त्यांनी केले.
या दरम्यान संजय जगताप म्हणाले गुंजवणी प्रकल्प तसेच विमानतळाबद्दल विजय शिवतारे यांनी वेळोवेळी जनतेची दिशाभूल करून विकास कामात व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला आहे.प्रत्येक निवडणुकीत तोच तमाशा खडा करायचा आणि मतांचा जोगवा मागायचा ही त्यांची जुनी पद्धत आहे. मात्र आगामी वर्षात महाविकास आघाडीच्या माध्यमातून गुंजवणी सह इतर बहुआयामी प्रकल्प हे निश्चितच मार्गी लागणार असल्याने विरोधकांची नौटंकी लवकरच बंद पडणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले .
या प्रसंगी महाविकास आघाडीचे प्रचार प्रमुख सुदामराव इंगळे यांसह संजय टिळेकर काँग्रेसचे प्रवक्ते विजय भालेराव ठाकरे गटाचे अभिजित जगताप माजी सभापती गिरीश पवार तसेच पुष्कराज जाधव समदास भुजबळ राजेंद्र पवार फत्तेसिंग पवार सागर भुजबळ राजेंद्र गायकवाड निखिल पवार संभाजी पवार ,श्रीकांत लक्ष्मी शंकर, बाळासाहेब भुजबळ प्रवीण कुमठेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
टिप्पण्या