मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

*गोरगरिबांना हक्काचे शिक्षण अन् महिलांना स्वतःच्या पायावर उभं करणारी मायमावली भाग्यश्रीताई पाटील*

इंदापूर मध्ये गेल्या अनेक वर्षांत हर्षवर्धनभाऊ पाटील यांनी वेगवेगळ्या संस्थांचे जाळ उभा केलं आहे. यामध्ये सहकारी कारखाने असतील, शिक्षण संस्था असतील, दूधसंघ असेल. यातून त्यांनी भविष्यातील संधी आताच उपलब्ध करून दिल्या. मंत्रीपदावर काम करत असताना त्यांच्याकडे अनेक मंत्रीपदे होती. यामुळे दौरे देखील तसेच होते.  कधी इंदापूरच्या बाहेर असताना तालुक्यातील कामांची धुरा त्यांच्या पत्नी सौ.भाग्यश्री पाटील (वहिणीसाहेब) यांनी खांद्यावर घेतली आणि ती अखंडपणे सुरू आहे. विशेष करून महिला बचत गट आणि शिक्षण संस्थेत त्यांनी लक्ष घालून यामध्ये विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण देण्याचा निर्णय त्यांनी घेतला.  यामुळे अनेक विद्यार्थीनी यामध्ये आज शिक्षण घेत आहेत. महिला बचत गटाच्या माध्यमातून त्यांनी महिलांना एकत्र आणत त्यांना बचतीचे महत्व आणि संसारात हातभार लावण्यासाठी अनेक छोटेमोठे व्यवसाय सुरू करून दिले. यामुळे अनेक महिला आज स्वतःच्या पायावर उभा आहेत.  मुली शिकल्या किंवा महिलांना रोजगार दिला की त्यांच्या घरात समृद्धी येते हे त्यांनी जाणले होते. त्यानुसार त्यांनी शिक्षण संस्थेत अनेक चांगल...

कै.विष्णुपंत बाब्रस यांना आजी-माजी नेत्यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली, तर अजित पवार यांची संतवन पर भेट

इंदापूर :तालुक्यातील माजी नायब तहसीलदार कै.विष्णुपंत (भाऊसाहेब) बाब्रस यांचे नुकतेच दुःखद निधन झाले ते मा.नगरसेवक विनायक बाब्रस यांचे ते वडील होते,राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार ,मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कन्या खा.सुप्रियाताई सुळे,आमदार.दत्तात्रय भरणे भाजपची ज्येष्ठ नेते हर्षवर्धनजी पाटील  पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांनी बाब्रस कुटुंबीयांचे सांत्वन केले   त्यांच्या  आत्म्यास चिरशांती लाभो असे मत यावेळी अजित दादा पवार यांनी व्यक्त केले याप्रसंगी   मा.उपनगराध्यक्ष धनंजय बाब्रस  मा.नगरसेवक श्रीधर बाब्रस  अॅड विलास बाब्रस निखिल बाब्रस, अथर्व बाब्रस व शिवाजी इजगुडे सह इंदापूर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बाब्रस भाऊसाहेब यांनी त्यांच्या शासकीय सेवेतील३५वर्षातील कळात,यशस्वी कामगिरी केली, गोरगरीब जनतेचे प्रमाणीक पणे काम केले, अडलेल्या जनसामान्य जनतेला सहकार्य केले, सलाम त्यांच्या कार्याला आशा शब्दात, बाब्रस...

श्रीसंत रोहिदास महाराज यांची ६४७ वी जयंती इंदापूरात मोठ्या उत्साहात साजरी- विठ्ठलराव ननवरे

 इंदापुर  श्रीसंत रोहिदास महाराज यांची ६४७ वी जयंती इंदापूर येथील श्री.संत रोहिदास नगर येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली._   _सुरुवातीला कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मा.मधुकर  भरणे व इंदापूर नगरपरिषदेचे मा.नगराध्यक्ष श्री.विठ्ठल आप्पा ननवरे यांच्या हस्ते प्रतिमेचे पुजन करण्यात आले.याप्रसंगी कवयत्री श्रीमती प्रतिभाताई प्रभाकर गारटकर यांनी  श्रीसंत रोहिदा महाराज जिवनकाव्य पुस्तकाचे प्रकाशन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.ह.भ.प.ॲड.श्री.शेपांगर बोबडे महाराज यांचे स रोहिद महारा यांच्या जन्म उत्साहाचे सुश्रावे किर्तन झाले.याप्रसंगी मा.जिल्हा कृषी अधिकारी श्री.दतात्रय राजपुरे, मा.नगराध्यक्ष सुरेश(नाना) गवळी,मा.उपनगराध्यक्ष राजेश शिंदे, डॉ . प्राचार्य अमोल उन्हाळे, आर,पी,आय,तालुका अध्यक्ष बाळासाहेब सरवदे,प्रा.अशोक मखरे (सर )मा.नगरसेवक दादासाहेब सोनवणे,गटनेते कैलास कदम,मा.नगरसेवक सुनिल अरगडे,समता परिषद जिल्हा अध्यक्ष पांडूरंग तात्या शिंदे,मा.नगराध्यक्षा सुनंदाताई ननवरे,नगरसेविका राजश्रीताई मखरे,तानाजी धोत्रे,अल्पसंख्यांक ...

स्वाभिमानी कट्ट्याच्या फेसबुक व युट्यूबचे लोकार्पण

● इंदापूर : प्रतिनिधी इंदापूर तालुका स्वाभिमानी पत्रकार संघातर्फे स्थापन करण्यात आलेल्या 'स्वाभिमानी कट्टा' च्या फेसबुक पेज व युट्यूबचे लोकार्पण माजी उपनगराध्यक्ष भरत शहा, प्रगतशील व्यावसायिक मुकुंद शहा व स्वाभिमानी पत्रकार संघाचे अध्यक्ष शैलेश काटे यांच्या हस्ते शुक्रवारी (दि.२३) करण्यात आले. स्वाभिमानी पत्रकार संघाची स्थापना झाल्यानंतर या संघात अनेक दैनिके, वृत्तवाहिन्या, साप्ताहिकांचे संपादक व युट्युब, पोर्टल चे पत्रकार सामील झाले. संघाच्या सदस्यांच्या विचारविनिमयातून 'स्वाभिमानी कट्टा' ची स्थापना करण्यात आली. कट्ट्याच्या माध्यमातून सामाजिक, राजकिय, आर्थिक, शैक्षणिक, औद्योगिक,क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या महाराष्ट्रातील नामवंत व्यक्तींना आमंत्रित करण्यात येणार आहे. त्यांच्याशी संघटनेतील पत्रकार सदस्य समाजहिताच्या दृष्टीने साधक-बाधक चर्चा करणार आहेत. यावेळी मान्यवरांना अनेक प्रश्नांना तोंड द्यावे लागणार आहे.  समाजहिताच्या गोष्टी, माहिती आणि घडामोडी वाचक, प्रेक्षक व नागरिकांपर्यंत सहजरित्या व जलद गतीने पोहोचवण्यासाठी 'स्वाभिमानी कट्टा...

निरनिमगाव व सुरवड येथे हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते आज उद्घाट समारंभ व भूमिपूज धुमधडाक्यात होणार

इंदापुर :-तालुक्यातील  निरनिमगाव व सुरवड येथे ग्रामपंचायतींच्या विविध विकास कामांची उद्घाटने व भूमिपूजनाचे कार्यक्रम भाजप नेते व माजी मंत्री, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांचे हस्ते आज शुक्रवारी (दि.23) संपन्न होणार आहेत. निरनिमगाव येथे 4 वा. तर सुरवड येथे 5.30 वा. हे कार्यक्रम होणार आहेत.                   नीरनिमगाव येथे जल जीवन मिशन अंतर्गत नळ पाणी पुरवठा योजना, ग्रामपंचायत कार्यालय उद्घाटन, आंगणवाडी केंद्र इमारत उद्घाटन आदि कार्यक्रम हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते होणार आहेत. या कार्यक्रमांच्या अध्यक्षस्थानी निरा भिमा कारखान्याचे अध्यक्ष लालासाहेब पवार हे असणार आहेत. तरी कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन ग्रामपंचायतीचे सरपंच व निरा भिमा कारखान्याचे संचालक प्रतापराव पाटील व ग्रामस्थांनी केले आहे.            तर सुरवड येथे ग्रामपंचायत कार्यालय व व्यापारी गाळे यांचा उद्घाटन समारंभ हर्षवर्धन पाटील यांचे संपन्न होणार आहे. इंदापूर पंचायत समितीचे माजी सभापती विलासब...

नीरा भीमा कारखान्याव शहाजी केसरी कुस्ती आखाड्याचे रविवारी आयोजन - हर्षवर्धन पाटील

 -पै.सिकंदर शेख व पै.गौरव मच्छिवारा यांच्या कुस्तीकडे राज्याचे लक्ष! इंदापूर :शहाजीनगर (ता.इंदापूर) येथे निरा भिमा सहकारी साखर कारखान्यावरती प्रसिद्ध शहाजी आखाड्यामध्ये लोकनेते कै.शहाजीराव  पाटील यांच्या पुण्यतिथी दिनानिमित्त शहाजी केसरी कुस्त्यांच्या जंगी मैदानाचे रविवारी (दि.25) दुपारी 2 वा. आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती कारखान्याचे संस्थापक, माजी मंत्री व राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी दिली.       या कुस्ती आखाड्यामध्ये सध्या देशात गाजत असलेला महाराष्ट्र केसरी पै.सिकंदर शेख विरुद्ध भारत केसरी पै.गौरव मच्छिवारा यांच्या लक्षवेधी लढत होणार आहे. तसेच महाराष्ट्र चॅम्पियन पै. माऊली कोकाटे विरुद्ध महाराष्ट्र केसरी पै. पृथ्वीराज पाटील, पै. प्रकाश बनकर विरुद्ध पै. महेंद्र गायकवाड, पै. दादा मुलाणी विरुद्ध पै. सुहास गोडगे, पै. मनीष रायते विरुद्ध पै. विक्रम भोसले, पै. कालीचरण सोनटक्के विरुद्ध पै. समीर शेख, पै.सतपाल सोनटक्के विरुद्ध पै.प्रशांत जगताप, पै.रवी चव्हाण विरुद्ध पै.विजय शिंदे, पै.विक्रम घोरपडे विरुद्ध प...

*परीक्षार्थी विद्यार्थ्यांसह पालकांना माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी दिल्या शुभेच्छा* - हर्षवर्धन पाटील यांनी इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधत मार्गदर्शन करीत इंग्रजीचा तणाव न घेण्याचा सल्ला देत दिला मानसिक आधार*

 इंदापुर:- महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक विभागाची इयत्ता 12 वीची परीक्षा 21 फेब्रुवारी पासून सुरू होत आहे. या विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यासाठी राज्याचे माजी मंत्री व संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी श्री. नारायणदास रामदास हायस्कूल व ज्युनियर कॉलेज तसेच कला , विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय या ठिकाणी  विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प देऊन शुभेच्छा दिल्या तसेच त्यांच्याशी परीक्षेसंदर्भाने संवाद साधत इंग्रजी विषयाचा तणाव न घेण्याचा सल्ला देत त्यांना मानसिक आधार दिला.यावेळी विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी सोडवण्यासाठी आलेल्या पालकांना देखील माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी गुलाब पुष्प देत त्यांचे स्वागत करीत विद्यार्थ्याप्रती पालकांना निश्चिंत राहण्यासाठीचा आधार दिला. विद्यार्थ्यांनी देखील उत्स्फूर्त प्रतिसाद देत तणावमुक्त राहत हर्षवर्धन पाटील यांच्याकडून आशीर्वाद घेत ते आनंदी वातावरणात परीक्षाकक्षाकडे जात होते.  हर्षवर्धन पाटील म्हणाले की ,'माझ्याकडून व संस्थेकडून सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा. आनंदी वातावरणात व कोणत्याही प्रकारचा तणाव न...