इंदापूर मध्ये गेल्या अनेक वर्षांत हर्षवर्धनभाऊ पाटील यांनी वेगवेगळ्या संस्थांचे जाळ उभा केलं आहे. यामध्ये सहकारी कारखाने असतील, शिक्षण संस्था असतील, दूधसंघ असेल. यातून त्यांनी भविष्यातील संधी आताच उपलब्ध करून दिल्या. मंत्रीपदावर काम करत असताना त्यांच्याकडे अनेक मंत्रीपदे होती. यामुळे दौरे देखील तसेच होते.
कधी इंदापूरच्या बाहेर असताना तालुक्यातील कामांची धुरा त्यांच्या पत्नी सौ.भाग्यश्री पाटील (वहिणीसाहेब) यांनी खांद्यावर घेतली आणि ती अखंडपणे सुरू आहे. विशेष करून महिला बचत गट आणि शिक्षण संस्थेत त्यांनी लक्ष घालून यामध्ये विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण देण्याचा निर्णय त्यांनी घेतला.
यामुळे अनेक विद्यार्थीनी यामध्ये आज शिक्षण घेत आहेत. महिला बचत गटाच्या माध्यमातून त्यांनी महिलांना एकत्र आणत त्यांना बचतीचे महत्व आणि संसारात हातभार लावण्यासाठी अनेक छोटेमोठे व्यवसाय सुरू करून दिले. यामुळे अनेक महिला आज स्वतःच्या पायावर उभा आहेत.
मुली शिकल्या किंवा महिलांना रोजगार दिला की त्यांच्या घरात समृद्धी येते हे त्यांनी जाणले होते. त्यानुसार त्यांनी शिक्षण संस्थेत अनेक चांगले निर्णय घेतले. तसेच याचा लाभ जास्तीक जास्त मुलांना मिळवून दिला.
यामुळे इंदापूरच्या अनेक विद्यार्थीनी आज अनेक वेगवेगळ्या मोठ्या पदावर कार्यरत आहेत. यामागे वहिनीसाहेबांचा दृष्टिकोन महत्वाचा आहे. एस. बी पाटील सारख्या नावाजलेल्या शिक्षण संस्थेत काम करत असताना त्यांनी विद्यार्थीहिताचे अनेक निर्णय घेतले.
यामध्ये विद्यार्थ्यांना मोफत निवासी शिक्षण, शिष्यवृत्ती योजना, विशेष प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांना विशेष प्रशिक्षण अशा अनेक गोष्टींवर त्यांनी लक्ष केंद्रित करून आपले काम सुरूच ठेवले आहे.
टिप्पण्या