मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

राज्यमंत्री मा.ना.श्री. दत्तात्रय (मामा)भरणे यांच्या माध्यमातुन इंदापूर तालुक्यात २५/१५ अंतर्गत: १० कोटी ५लाख रुपये निधी मंजुर  इंदापूर तालुक्‍याचे विकासरत्न मा.ना..दत्तात्रय (मामा) भरणे सो यांच्या राज्य शासनाच्या २५/१५ अंतर्गत १० कोटी ५लाख रुपये निधी खालील गावांना मंजुर झाला आहे. नेहमीच इंदापूर तालुक्‍याच्या विकासासाठी अहोरात्र झटणारे, आपल्या सर्वांचे लाडके नेतृत्व तालुक्‍याचे आमदार ना.श्री.दत्तामामा भरणे यांच्या माध्यमातुन हा निधी प्राप्त झालेला आहे.प्रत्येक गावामध्ये.वाडी वस्तीवर सर्वसामान्य मानसाला कशा पध्दतीने  कामांचा फायदा होईल याची आखणी करुन दत्तात्रय भरणे हे ही कामे मंजुर केलेली आहेत.यामुळे गावातील रस्ते पक्के होऊन जोडले जाणार आहेत.त्यामुळे दळणावळणाची क्रिया जलद होईल.तसेच अनेक गावांमध्ये हायमास्ट दिवे बसवण्यात येणार आहेत.  २५/१५ सारख्या फंडातुन पहिल्यांदाच एवढा मोठा निधी तालुक्याला प्राप्त झालेल आहे.त्यामुळे तालुक्यातील या गावांमध्ये समाधानाचे बातावरण आहे.अशी माहिती तालुकाध्यक्ष हनुमंतराव कोकाटे-पाटील व ...

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

अंकिता पाटील यांच्या प्रयत्नातून लाखेवाडी-खाराओढा रस्त्यासाठी 25 लाख रुपये मंजूर      इंदापूर तालुक्‍यातील लाखेवाडी-खाराओढा रस्त्याचे भूमिपूजन अंकिता पाटील यांच्या हस्ते संपन्न लाखेवाडी येथील लाखेवाडी- खराओढा रस्त्याचे भूमिपूजन पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्या व इसमा कायदेशीर समितीच्या सह अध्यक्षा कु. अंकिता हर्षवर्धनजी पाटील यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. या रस्त्यासाठी लेखाशिर्ष 30-54 निधीतून रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण करण्यात येणार आहे व त्यासाठी 25 लक्ष रुपये निधी कु.अंकिता हर्षवर्धनजी पाटील यांनी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून मंजूर केलेला आहे.     यावेळी यावेळी नीरा-भीमा सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक तानाजीराव नाईक, वसंत नाईक, सखाराम थोरवे, प्रभाकर खाडे, किसन जाधव, विष्णू जाधव, माजी उपसरपंच आप्पासो ढोले, रवींद्र पानसरे, पोलीस पाटील रामचंद्र निंबाळकर, माजी ग्रामपंचायत सदस्य महेश निंबाळकर, वामन निंबाळकर, शिवाजी घोगरे, बापूराव ढोले, रामचंद्र नाईक, पांडुरंग माने, काशिनाथ अनपट, धनंजय गिरमे व ग्रामस्थ उपस्थित होते.

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

इंदापूर तालुक्‍यातील निमसाखर गावात कृषी दिन साजरा  इंदापूर :-कृषी दिनानिमित्त वृक्षारोपण आणि प्रमुख गावातील विविध समस्या वर चर्चासत्र प्रमुख उपस्थिती ग्रामपंचायत सदस्य श्री शेखर संतोष पानसरे पांडुरंग विठ्ठल पानसरे व ग्रामस्थ आणि शेतकरी कार्यक्रमांमध्ये कृषी महाविद्यालय बारामती विद्यार्थी गणेश महानवर किरण पानसरे यांनी गावातील विवीध समस्यावर चर्चा केली व शेतीसंबंधी कार्यक्रमाचे आयोजन केले व मार्गदर्शन केले

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

प्रुथ्वीराज खरात याचा वाढदिवस अनावश्यक खर्चाला फाटा देऊन आगळा वेगळा साजरा  इंदापूर:-  चि.प्रुथ्वीराज नानासाहेब खरात याचा वाढदिवस हारतुरे, फटाके, इतर अनावश्यक खर्चाला फाटा देऊन   वैदु समाजाच्या पाला वरती कपडे, गहू, ज्वारी, तांदूळ, लहान मुलांना खाऊ वाटप करून तेजपृथ्वी ग्रुपच्या वतीने साजरा करण्यात आला, यावेळी बोलताना तेजप्रुथ्वी ग्रुपचे मार्गदर्शक नानासाहेब खरात म्हणाले की पाठीमागील 14 ते पंधरा महिन्यापासून कोरोना काळात या लोकांना यांच्या वस्तू विकण्यासाठी लोक कोरोना च्या भीतीने घरी येऊन देत नाहीत,त्यामुळे या लोकांचे खाण्यापिण्याचे खुप हाल होत,आहेत अशा परिस्थितीत तेजप्रुथ्वी ग्रुपचे उपाध्यक्ष गणेश शिंगाडे, हनुमंत यमगर, महेश शिंदे, दिलीप कुंभार, प्रसाद पाध्ये,रूपेश वाघमोडे, यांनी पृथ्वीराज खरात यांच्या वाढदिवसानिमित्त आज या लोकांना जे धान्य वाटप साडी वाटप व लहान मुलांना खाऊ वाटप  गुलाब पुष्प देऊन केले ही गोष्ट खूप अनमोल आहे. महेंद्र दादा रेडके ,पांडुरंग मारकड यांच्या मार्गदर्शनाखाली या ग्रुपच्या माध्यमातून सतत सामाजिक उपक्रम राबवले जातात यावेळेस तेजप्रु...

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

पांडुरंग शिंदे सर्वसामान्यांसाठी लढणारे कार्यकर्ते- हर्षवर्धन पाटील  इंदापूर:- नगरपरिषदेचे माजी विरोधी पक्षनेते पांडुरंग हरिभाऊ शिंदे यांच्या 55 व्या वाढदिवसानिमित्त तसेच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला 7 वर्षपूर्ती निमित्त (दि.4 जुलै) आयोजित रक्तदान शिबिर, कोविड योद्धा सन्मान कार्यक्रमाचे आयोजन संत सावतामाळी मंगल कार्यालयामध्ये करण्यात आले यावेळी माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी पांडुरंग शिंदे सर्वसामान्यांसाठी लढणारे कार्यकर्ते आहेत असे मत व्यक्त केले.    कार्यक्रमाचे उदघाटन प्रसिद्ध हृदयरोगतज्ञ डॉ. एम.के. इनामदार यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन इंदापूर तालुका भारतीय जनता पार्टी, क्रांतीज्योती विचार मंच महाराष्ट्र राज्य ,राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले बहुउद्देशीय सेवाभावी संस्था पुणे जिल्हा यांच्यावतीने करण्यात आले.     यावेळी गोरगरीब 70 महिलांना साडी वाटप करण्यात आले.माजी नगराध्यक्ष अशोक इजगुडे, डॉ. संदेश शहा, कृष्णा सातपुते, ऐजाज कुरेशी, राधा खुडे यांचा यावेळी सन्मान करण्यात आला...

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

तेजप्रुथ्वी ग्रुपच्या अध्यक्षा, सौ.अनिताताई नानासाहेब खरात यांचा आगळा वेगळा वाढदिवस इंदापूर:-तेजप्रुथ्वी ग्रुपच्या अध्यक्षा व सतत सामाजिक कार्यात आग्रेसर आसणा-या, सौ.अनिताताई नानासाहेब खरात यानीं त्यांचा वाढदिवस हा हाँटेल किंवा पार्टी हार तुरे, केक कापुन न करता गंगा तारा वृद्धाश्रम येथे दोन दिवस राहुन वृद्धांची सेवा करून त्यांना खाण्यापिण्यासाठी लागणारे किराणा व भाजीपाला देऊन वाढदिवस वृद्धाश्रमात वृद्धा बरोबर साजरा केला दरवर्षी सौ.आनिताताईनीं आपला वाढदिवस वृद्ध लोकांची सेवा करून वृद्धाश्रमात करतात तेजपृथ्वी ग्रुपचे मार्गदर्शक नानासाहेब खरात महिंद्र (दादा) रेडके या व इतर लोकांच्या मार्गदर्शनातून आपण नेहमी सामाजिक काम करण्याचा प्रयत्न करत असतो  तसेच कोरोनो  काळात वृद्धाश्रम बालाश्रम अनाथ आश्रम यांना मदत करणे आपले कर्तव्य आहे आणि आपण ते पूर्ण केले पाहिजे या सामाजिक भावनेतून मी आज येते येऊन माझ्या या वृद्ध मायबापांची सेवा करण्यासाठी दोन दिवस राहणार आहे व त्यांना लागणारे सर्व किराणा किट भेटदेत आहे यावेळेस वृद्धाश्रम चालक नीताताई  भोसले म्हणाल्या की सौ.अ...

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने पेट्रोल डिझेल व गॅस, खाद्य तेलासहीत इतर जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या दरवाढीविरोधात आज इंदापूर तहसील कचेरीवर भव्य मोर्चा इंदापूरः- तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने केंद्र सरकारने वाढविलेल्या पेट्रोल डिझेल व गॅस दरवाढ तसेच खाद्य तेलासहीत इतर जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या दरवाढीविरोधात आज इंदापूर तहसील कचेरीवर भव्य मोर्चा,जनतेला खोटी आश्वासने देत सात वर्षापूर्वी सत्तेत आलेल्या मोदी सरकारने आज देशाच्या अर्थव्यवस्थेची पूर्णपणे वाट लावली असून पेट्रोल डिझेल व गॅसच्या किमती प्रचंड प्रमाणात वाढवून सर्वसामान्य जनतेचे जीवन मुश्किल केले आहे अशा जनतेप्रती असंवेदनशील असणाऱ्या मोदी सरकारचा इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने जाहीर निषेध करत आहोत अशी माहिती तालुकाध्यक्ष हनुमंतराव कोकाटे पाटील व कार्याध्यक्ष अतुल शेठ झगडे यांनी दिली. मोदी सरकारने पेट्रोल डिझेल व गॅस वर अव्वाच्या सव्वा कर लावून प्रचंड दरवाढ केलेली आहे सोबतच खाद्यतेल तसेच इतर जीवनावश्यक वस्तूंच्या किमती ही मोठ्या प्रमाणावर ती वाढवून...