इंदापूर:-
चि.प्रुथ्वीराज नानासाहेब खरात याचा वाढदिवस हारतुरे, फटाके, इतर अनावश्यक खर्चाला फाटा देऊन
वैदु समाजाच्या पाला वरती कपडे, गहू, ज्वारी, तांदूळ, लहान मुलांना खाऊ वाटप करून तेजपृथ्वी ग्रुपच्या वतीने साजरा करण्यात आला, यावेळी बोलताना तेजप्रुथ्वी ग्रुपचे मार्गदर्शक नानासाहेब खरात म्हणाले की पाठीमागील 14 ते पंधरा महिन्यापासून कोरोना काळात या लोकांना यांच्या वस्तू विकण्यासाठी लोक कोरोना च्या भीतीने घरी येऊन देत नाहीत,त्यामुळे या लोकांचे खाण्यापिण्याचे खुप हाल होत,आहेत अशा परिस्थितीत तेजप्रुथ्वी ग्रुपचे उपाध्यक्ष गणेश शिंगाडे, हनुमंत यमगर, महेश शिंदे, दिलीप कुंभार, प्रसाद पाध्ये,रूपेश वाघमोडे, यांनी पृथ्वीराज खरात यांच्या वाढदिवसानिमित्त आज या लोकांना जे धान्य वाटप साडी वाटप व लहान मुलांना खाऊ वाटप गुलाब पुष्प देऊन केले ही गोष्ट खूप अनमोल आहे. महेंद्र दादा रेडके ,पांडुरंग मारकड यांच्या मार्गदर्शनाखाली या ग्रुपच्या माध्यमातून सतत सामाजिक उपक्रम राबवले जातात यावेळेस तेजप्रुथ्वी ग्रुपच्या अध्यक्षा अनिता ताई खरात म्हणाल्या की आज या लोकांच्या चेहऱ्यावरील भाव पाहून खरंच मन भरून आले
या लोकांना या वस्तूची कपड्यांची खूप गरज होती आणि ते तेजप्रुथ्वी ग्रुपने फुल नाही फुलाची पाकळी या म्हणी प्रमाणे यांना मदत देऊन खूप महान कार्य केले आज पाऊस चालू असताना ही तेजप्रुथ्वी ग्रुपचे सर्व कार्यकर्ते चिकलातून पाला वरती येऊन त्या लोकांच्यात मिसळून त्यांना साहित्य वाटप करत होते हे पाहून तेथील महिलांच्या डोळ्यातून आनंदाश्रू आले व त्यांनी पृथ्वीला मनापासून आशीर्वाद दिले या वेळेस मोनिका कुंभार,पूजा पाध्ये,संतोष कुंभार, सपंत पुणेकर, हे व इतर तेज पृथ्वी ग्रुपचे कार्यकर्ते उपस्थित होते,हा कार्यक्रम शोसल डिस्टंन्स ठेवून, मास्क व सॅनिटायझरचा वापर करून पार पडला,
टिप्पण्या