इंदापूरः- तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने केंद्र सरकारने वाढविलेल्या पेट्रोल डिझेल व गॅस दरवाढ तसेच खाद्य तेलासहीत इतर जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या दरवाढीविरोधात आज इंदापूर तहसील कचेरीवर भव्य मोर्चा,जनतेला खोटी आश्वासने देत सात वर्षापूर्वी सत्तेत आलेल्या मोदी सरकारने आज देशाच्या अर्थव्यवस्थेची पूर्णपणे वाट लावली असून पेट्रोल डिझेल व गॅसच्या किमती प्रचंड प्रमाणात वाढवून सर्वसामान्य जनतेचे जीवन मुश्किल केले आहे अशा जनतेप्रती असंवेदनशील असणाऱ्या मोदी सरकारचा इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने जाहीर निषेध करत आहोत अशी माहिती तालुकाध्यक्ष हनुमंतराव कोकाटे पाटील व कार्याध्यक्ष अतुल शेठ झगडे यांनी दिली.
मोदी सरकारने पेट्रोल डिझेल व गॅस वर अव्वाच्या सव्वा कर लावून प्रचंड दरवाढ केलेली आहे सोबतच खाद्यतेल तसेच इतर जीवनावश्यक वस्तूंच्या किमती ही मोठ्या प्रमाणावर ती वाढवून जनतेच्या हातातील घास ओढण्याचे पाप केले आहे. त्यामुळे अशा लबाड व मग्रूर केंद्र सरकारचा आम्ही जाहीर धिक्कार करत आहोत.तसेच मोदी सरकारने ही दरवाढ लवकरात लवकर कमी करावी अन्यथा आम्ही सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री माननीय नामदार श्री.दत्तात्रय (मामा) भरणे सो व जिल्हाध्यक्ष माननीय श्री.प्रदिप दादा गारटकर सो यांच्या नेतृत्वाखाली इंदापूर तालुक्यामध्ये सर्वत्र निषेध मोर्चा व आंदोलने करणार आहोत याची सर्वस्वी जबाबदारी केंद्र सरकारची असेल असा इशाराही यावेळी देण्यात आला.
या निषेध मोर्चाला, वसंत आरडे सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस पुणे जिल्हा, श्रीधर बाब्रस माजी नगरसेवक इंदापूर,तालुकाध्यक्ष हनुमंतराव कोकाटे पाटील, कार्याध्यक्ष अतुल शेठ झगडे, ,मार्केट कमिटीचे संचालक सचिनभाऊ देवकर,इंदापूरचे शहराध्यक्ष बाळासाहेब ढवळे-पवार,संजय गांधी निराधार योजना समितीचे तालुकाध्यक्ष सागरबाबा मिसाळ, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष अनिल राऊत,माजी उपनगराध्यक्ष दिलीप वाघमारे, बारामती लोकसभा मतदारसंघाचे युवक राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष दिनेश भैय्या थोरात,राष्ट्रवादी युवकचे तालुकाध्यक्ष शुभमभैय्या निंबाळकर, राजेश शिंदे माजी उपनगराध्यक्ष इंदापूर, कार्याध्यक्ष सचिनकाका खामगळ,विद्यार्थी तालुकाध्यक्ष सागर व्यवहारे, राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस वसंतराव मारकड,तालुका उपाध्यक्ष नवनाथ आबा रुपनवर,पिंपरीचे माजी सरपंच नानासाहेब नरूटे,राष्ट्रवादी युवकचे जिल्हा उपाध्यक्ष गणेश भोंग,ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष तुकाराम तात्या करे,वसंत आरडे,तालुका उपाध्यक्ष तुकाराम बापू गोलांडे, अण्णासाहेब धोत्रे,युवा नेते रमेशतात्या पाटील,विष्णू पाटील,सुभाष डरंगे,धनाजी देवकाते,प्रकाश निकम,हणुमंत जमदाडे उप सरपंच सरडेवाडी,शिवाजी जगताप, तानाजी पिंगळे, शिवाजी तरंगे,उपाध्यक्ष नंदकुमार कांबळे,वासिमभाई बागवान,सागर पवार यांच्यासह अनेक पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
टिप्पण्या