शैक्षणिक क्षेत्रातील बहुमूल्य योगदानाबद्दल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने राजेंद्र बरकडे व त्यांच्या पत्नी सविता राजेंद्र बरकडे यांना "शिक्षण रत्न" पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
पुण्यातील हिंजवडी येथे महाराष्ट्र काँग्रेस कमिटीच्या वतीने संविधान अमृत वर्षानिमित्त विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींसाठी सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमात पुरंदर तालुक्यातील विशेषतःनीरा कोळविहिरे गटात वास्तव्यास असणाऱ्या डोंबारी समाजासह पारधी ऊस तोड कामगार तसेच नंदीवाला समाजातील असंख्य मुलांना शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी राजेंद्र बरकडे व त्यांच्या पत्नी सविता राजेंद्र बरकडे यांचे खूप मोठे योगदान असल्याने त्यांच्या कार्याची दखल घेऊनच काँग्रेस कमिटीचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या हस्ते बरकडे दाम्पत्यास "शिक्षण रत्न" २०२५ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
या प्रसंगी पुणे जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्रीरंग चव्हाण पिंपरी चिंचवडचे अध्यक्ष कैलास कदम प़देश सरचिटणीस यशराज पारखी यांसह आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महाराष्ट्र शिक्षक काँग्रेस सेलचे उपाध्यक्ष सचिन दुर्गाडे यांनी केले तर उपस्थितांचे आभार काँग्रेस कमिटी मुळशीचे तालुकाध्यक्ष सुरेश पारखी यांनी मानले.
टिप्पण्या