वाल्हे प्रतिनिधी- सिकंदर नदाफ वारकरी संप्रदायासह धार्मिक क्षेत्रातील बहुमूल्य योगदानाबद्दल अनुसया चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने सुकलवाडी ( ता. पुरंदर ) येथील जेष्ठ कीर्तनकार ह. भ. प. अशोक महाराज पवार यांना सांप्रदायिक तथा अध्यात्मिक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
सासवड येथे अनुसया चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने सांप्रदायिक तसेच धार्मिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींसाठी सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी ह. भ.प. अशोक महाराज पवार यांच्या कार्याची दखल घेऊनच अनुसया चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने पुरंदर हवेलीचे माजी आमदार अशोक टेकवडे यांच्या हस्ते त्यांना सांप्रदायिक तथा अध्यात्मिक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
या प्रसंगी अनुसया चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष अजिंक्य टेकवडे यांसह भाजपचे गंगाराम जगदाळे संजय निगडे पिंटूशेठ जगदाळे संदीप कटके निखिल जगताप बाळासाहेब काळे गोरख मेमाणे आदी मान्यवर उपस्थित होते.
टिप्पण्या