दिव्यांगाप्रती समाजामध्ये स्नेहभाव वाढीस लागावा तसेच समाजातील एक उपयुक्त घटक म्हणून पुढे येण्यास त्यांना प्रेरणा मिळावी या उदात्त हेतूने वाल्हे ( ता. पुरंदर ) ग्रामपंचायतीच्या वतीने जागतिक दिव्यांग दिन उत्साहात साजरा करण्यात आला .
यावेळी पुरंदर हवेलीचे माजी आमदार संजय जगताप यांच्या हस्ते दिव्यांग बांधवांचा सत्कार करून त्यांना स्थानिक ग्रामपंचायतीच्या वार्षिक उत्पन्नातून ५℅ निधीचे वाटप करण्यात आले.
या दरम्यान माजी आमदार संजय जगताप म्हणाले, दीर्घकालीन शारीरिक मानसिक तसेच बौद्धिक दुर्बलतेवर एक प्रकारे मात करून यशस्वीरित्या जीवन जगण्याचा प्रयत्न करणाऱ्या दिव्यांग बांधवांचा आदर्श प्रत्येकाने घेतला पाहिजे. तसेच शासन स्तरावर दिव्यांगांसाठी विविध कल्याणकारी योजना कार्यान्वित असून दिव्यांग बांधवांना अशा योजनांचा सुलभतेने लाभ घेता यावा यासाठी शर्तीचे प्रयत्न देखील करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
याप्रसंगी वाल्हे गावचे सरपंच अतुल गायकवाड उपसरपंच सागर भुजबळ भाजपचे सचिन लंबाते माजी सभापती गिरीश पवार यांसह दत्तात्रय पवार महादेव चव्हाण अमित पवार सम्राज्ञी लंबाते दादासाहेब मदने सुनील पवार आरपीआयचे शैलेंद्र भोसले प्रहार संघटनेच्या सुरेखा ढवळे निलेश कुदळे सुभाष शिंदे सचिन खवले देवराम सातपुते महादेव भुजबळ आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक दीपक कुमठेकर यांनी केले तर उपस्थितांचे आभार तेजस दुर्गाडे यांनी मानले.
टिप्पण्या