मुख्य सामग्रीवर वगळा

कर्मयोगी शंकररावजी पाटील कारखान्याचा रु. 3350 प्रमाणे ऊस दर - हर्षवर्धन पाटील -शेतकरी हितास सर्वोच्च प्राधान्य

इंदापूर : प्रतिनिधी दि.8/12/25 महात्मा फुलेनगर (बिजवडी) येथील कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखाना व सहयोग मा.बाबुराव बोत्रे पाटील चेअरमन ओंकार शुगर अँड डिस्टिलरीने चालु सन 2025-26 च्या गळीत हंगामामध्ये गाळपास येणाऱ्या उसाला प्रति टन रु. 3350 प्रमाणे उच्चांकी दर देण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये पहिला हप्ता रु. 3200/- प्रमाणे असून, उर्वरित रु. 150 प्रमाणे रक्कम शेतकऱ्यांना दिवाळीला अदा केली जाईल, अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी दिली. कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखाना उत्कृष्टपणे चालू असून आज अखेर कारखान्याने 1,65,000 मे. टन ऊसाचे गाळप पूर्ण केले आहे. कर्मयोगी शंकररावजी पाटील कारखान्याच्या माध्यमातून व ओंकार शुगरचा सहयोगातून सहकार टिकविण्याचा हा महाराष्ट्रातील नव्हे तर देशातील पहिलाच नाविन्यपूर्ण उपक्रम आहे. या सहयोगातून सहकारातील शेतकरी, कामगार टिकवण्याचे काम यशस्वीपणे केले जात आहे. ओंकार शुगर ग्रुपचे चेअरमन बाबुराव बोत्रे पाटील यांचे माध्यमातून प्रति टन रु. 3350 प्रमाणे उच्चांकी दर देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तरी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आपला सर्व ऊस हा कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखाना सहयोग ओंकार शुगर अँड डिस्टिलरीस देऊन सहकार्य करावे, असे आवाहनही हर्षवर्धन पाटील यांनी केले आहे. कर्मयोगी शंकररावजी पाटील कारखाना हा गेले 8-10 वर्षापासून आर्थिक अडचणीला सामोरे जात होता. तरीही शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन येणाऱ्या आर्थिक अडचणीवर मात करून प्रत्येक गळीत हंगाम यशस्वी व्हावेत, असे प्रयत्न अडचणीत काळातही ऊस उत्पादक शेतकरी, ऊस तोडणी वाहतूक ठेकेदार, अधिकारी कर्मचारी यांच्या सहकार्याने सुरू होते. मात्र बदलत्या परिस्थितीनुसार शेतकऱ्यांचे सर्वोच्च हित लक्षात घेऊन कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी कारखाना व ओंकार शुगरचा सहयोग हा (कोलाब्रेशन ) सहकारातील सेक्शन 20 नुसार सहकार टिकवण्यासाठीचा पहिलाच नावीन्यपूर्ण प्रयोग यशस्वी होत आहे. सदरच्या संयुक्त तत्वाच्या निर्णयासाठी सभासदांचे सहकार्य लाभले आहे. श्रद्धेय शंकररावजी पाटील उर्फ भाऊंनी उभारलेल्या या संस्थेमुळे तालुक्यातील शेतकऱ्यांचे गेली 35 वर्षे संसार प्रपंच यशस्वीरित्या मार्गी लागले आहेत. त्यातून शेतकऱ्यांची सर्वांगीण प्रगती झाली आहे. त्यामुळे कर्मयोगी शंकररावजी पाटील कारखान्यास गत वैभव प्राप्त करून देणेसाठी आपण सर्वांनी एकत्रित मिळून काम करू या, असे प्रतिपादनही याप्रसंगी हर्षवर्धन पाटील यांनी केले. यावेळी कारखान्याचे संचालक मंडळ तसेच कार्यकारी संचालक विजय शिर्के उपस्थित होते.__________________________

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जय भवानीगड विकास प्रतिष्ठान मधील बालचिमुकल्यानी घेतला आठवडा बाजाराचा आनंद

  इंदापूर जय भवानी गड विकास प्रतिष्ठान संचलित, विद्या निकेतन स्कूल अ‍ॅण्ड जुनियर कॉलेज व प्रेसिडेंसी इंटरनॅशनल स्कूल, विद्या निकेतन कॉलेज ऑफ फार्मसी व विद्यानिकेतन इन्स्टिटय़ूट ऑफ इंजिनिअरिंग अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 05/12/2025 रोजी आठवडा बाजाराचे नियोजन करण्यात आले होते.  विद्यार्थ्यांंना बाजारातल्या व्यवहाराची माहिती देण्यासाठी आणि त्यांना प्रत्यक्ष अनुभव देण्यासाठी प्रशाले मध्ये आठवडा बाजार भरवला होता. बाजारातील खरेदी विक्रीची माहिती मिळावी, पैश्याचा वापर कसा करावा याची जाणीव असावी, या उद्देशाने या आठवडे बाजाराचे नियोजन करण्यात आले होते.विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढावा पैश्याचे महत्त्व समजावे . भाजीपाला विक्री सोबत फळभाज्या विविध फळे, विविध खाद्यपदार्थ यांच्या खवय्यांनी विद्यार्थ्यांनी मनसोक्त आनंद लुटला.  फळे , भाजीपाला विक्री करताना विद्यार्थ्यांच्या चेहर्‍यावरचा आनंद ओसंडून वहात होता.  बाजारातील उत्साह आणि लगबग पाहून संस्थेच्या उपाध्यक्षा चित्रलेखा ढोले यांनी विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले. सदर कार्यक्रमा...

कै.विष्णुपंत बाब्रस यांना आजी-माजी नेत्यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली, तर अजित पवार यांची संतवन पर भेट

इंदापूर :तालुक्यातील माजी नायब तहसीलदार कै.विष्णुपंत (भाऊसाहेब) बाब्रस यांचे नुकतेच दुःखद निधन झाले ते मा.नगरसेवक विनायक बाब्रस यांचे ते वडील होते,राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार ,मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कन्या खा.सुप्रियाताई सुळे,आमदार.दत्तात्रय भरणे भाजपची ज्येष्ठ नेते हर्षवर्धनजी पाटील  पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांनी बाब्रस कुटुंबीयांचे सांत्वन केले   त्यांच्या  आत्म्यास चिरशांती लाभो असे मत यावेळी अजित दादा पवार यांनी व्यक्त केले याप्रसंगी   मा.उपनगराध्यक्ष धनंजय बाब्रस  मा.नगरसेवक श्रीधर बाब्रस  अॅड विलास बाब्रस निखिल बाब्रस, अथर्व बाब्रस व शिवाजी इजगुडे सह इंदापूर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बाब्रस भाऊसाहेब यांनी त्यांच्या शासकीय सेवेतील३५वर्षातील कळात,यशस्वी कामगिरी केली, गोरगरीब जनतेचे प्रमाणीक पणे काम केले, अडलेल्या जनसामान्य जनतेला सहकार्य केले, सलाम त्यांच्या कार्याला आशा शब्दात, बाब्रस...

*जय भवानीगड विकास प्रतिष्ठान लाखेवाडीमध्ये वार्षिक क्रिडा सप्ताहाचे आयोजन*

 इंदापूर जय भवानीगड विकास प्रतिष्ठान संचलित, विद्यानिकेतन स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज व प्रेसिडेन्सी इंटरनॅशनल स्कूल लाखेवाडी यांच्या संयुक्त विद्यमानाने दिनांक 17 /11/ 2025 ते 22/11/2025 रोजी क्रिडा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.   खेळ ही शारीरिक व मानसिक कला आहे. खेळामुळे शारीरिक  चपळता वाढते.खेळाचे प्रामुख्याने मैदानी खेळ व बैठे खेळ असे दोन प्रकार मानले जातात. प्रशालेमध्ये क्रिकेट, कबड्डी, खो-खो,लंगडी, रस्सीखेच,रिले 100 मी ,रिले 400 मी, थालीफेक इ खेळाचे आयोजन करण्यात आले.  विद्यार्थ्यांचा सर्वागीण विकास व्हावा या उद्देशानेच प्रशालेमध्ये क्रिडा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.  क्रिडा सप्ताहाच्या निमित्ताने प्रशालेतील मैदानावर विविध खेळाची जयंत तयारी करण्यात आली.  क्रिडा सप्ताहाच्या उद्घाटनप्रसंगी मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे तसेच मैदान पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.  मशाल फेरी काढून विविध खेळांच्या सामन्यांची सुरवात करण्यात आली.   कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्या निकेतन स्कूल जुनियर कॉलेजचे प्राचार्य गणेश पवार...